'कॉमेडी शो'वरून कोर्टाने सिद्धूला खेचले

2017-05-11

'कॉमेडी शो'वरून कोर्टाने सिद्धूला खेचले

चंदीगड: पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूला टीव्ही शो करणं महागात पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कॉमेडी शोमध्ये सहभागी का होता? असा प्रश्न विचारत चंदीगड कोर्टाने सिद्धूला फटकारलं. सोनी टीव्हीवर प्रसारीत होत असलेल्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये सिद्धू पुढे बसलेला असतो. 
मंत्रीपदावर असतानाही टीव्ही शोमध्ये सहभागी असल्यावरून सिद्धूविरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 'टीव्ही शोमधील आपले काम हे कायद्यानुसारच आहे', असा तर्क सिद्धूने मांडला होता. पण 'फक्त कायदा सर्व काही नाही नैतिकतेचा विचार केला का? असा प्रश्न या आधी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सिद्धूला केला होता.
'टीव्ही उद्योगातील ७० ते ८० टक्के काम सोडले आहे. तसंच सकाळपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मी रोज काम करतो. यामुळे संध्याकाळी ६ वाजेनंतर मी काय करतो याच्याशी कुणाला काय करायचंय? हा काही पदाच्या लाभाचा मुद्दा नाहीए', असं या प्रकरणावर सिद्धूने यापूर्वी स्पष्ट केलं होतं.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या झगमगाटात जिल्ह्यात पाऊस सुरू असून, अनेक गावांच्या तलाव आणि बंधाजयात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकजयांत आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र, अधूनमधून व अनेक ठिकाणी सतत पडणाजया पावसामुळे पिकांचे नुकसानही होऊ लागले आहे. लिंब, गोवे परिसरात ढगफुटीने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरणही दिसून येत आहे.

कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.

अंदोरी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा अंदोरी या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गाचे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 32 इंची एलसीडी व दोन साऊंड असा एकूण 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

सातार्‍यातील सावकारीप्रकरणी महेश तपासे याला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर जप्त केलेल्या त्याच्या घरातील कागदपत्रांचे मूल्य प्राथमिक माहितीनुसार 10 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले असून, आकडेमोड करताना त्यांनाही घाम फुटू लागला आहे. दरम्यान, या घटनेतील इतर पाच संशयितांची नावे तपासात स्पष्ट झाली असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना झाली आहेत.

पेज3 बातम्या

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.

.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तिने एक आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘फुकरे रिटर्न्स’ ट्रेलर लॉन्च प्रसंगी ती उपस्थित होती. मास्क लावलेला एक फोटो रिचाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आप नेता कुमार विश्वास यांना कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.



Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.