स्वस्त iPhone चं गणित अन् कामगारांचा छळ

2017-05-10

स्वस्त iPhone चं गणित अन् कामगारांचा छळ

बीजिंग: आयफोन ५ एस आणि आयफोन एसई या दोन हँडसेटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. या दरकपातीनंतर आयफोन ५ एस १५ हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 'अॅपल'नं हालचाली सुरू केल्या आहेत. 
पुढील काळात आयफोन '५ एस'ची विक्री फक्त ऑनलाइन स्टोअरवरूनच करणार असल्याचे कंपनीने रिटेल विक्रेत्यांना सांगितले आहे. 
अॅपल कंपनी चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी असे करत असल्याचे स्पष्ट असले तरी खुद्द अॅपलचा उत्पादन मात्र स्वस्तात व्हावं यासाठी कंपनी चीनमध्ये करते. चीनमध्ये उत्पादन करून तेथील कंपन्यांना टक्कर देण्यास अॅपल सज्ज झालं असलं तरी तेथील कामगारांची फारच करुण स्थिती आहे. अॅपलचे महागडे उत्पादन बनवणा-या कामगारांना शांघायमधील हॉस्टलमध्‍ये लहानशा रुममध्‍ये आठ ते बारा कामगारांना ठेवले जाते. प्रसाधानगृहाच्या भिंतींमधून पाणी टपकत असते. आंघोळीसाठी एकाच ठिकाणी २०-२० शॉवर एकापाठोपाठ लागले आहे. अशा रुममध्‍ये राहण्‍यासाठी कामगार १ हजार ५०० रुपये भाडे देतात.
प्रत्येक मजल्यावर ६०२ लोकांची राहण्‍याची व्यवस्था करण्‍यात आली आहे. मात्र त्यांच्यासाठी ३० शौचालय, ३० शॉवर आणि ५० वॉश बेसिन आहे. आयफोन ५s चे उत्पादनावेळी ६ हजार कामगार या हॉस्टलमध्‍ये राहत होते. यातील हजारेक कामगार म्हणाले होते, की ते सुट्ट्यांनंतर परतणार आहेत. 
भिंतींवर ठिकठिकाणी कामाचे तासांदरम्यान ब्रेक घेण्‍याच्या वेळा लिहिल्या आहेत. सोबतच कामाचा पॅटर्नही लिहिला आहे. या इमारती फेब्रुवारीपर्यंत हॉस्टेलसाठी वापरली गेली. आता कामगारांना फॅक्ट्री कॅम्पसमधील इमारतीत शिफ्ट करण्‍यात आले आहे. 
या हॉस्टेलमध्‍ये स्थलांतरित कामगार राहतात. जी अॅपल कॉन्ट्रॅक्टर पेगाट्रॉनने भरती केले होते.पेगाट्रॉन तैवानमधील इलेक्ट्रॉनिक्सची प्रसिध्‍द कंपन्यांपैकी एक आहे. ती आपल्या कर्मचा-यांना आठवड्यातील सहा दिवस १२-१२ तास कामाच्या मोबदल्यात २४ हजार रुपये पगार म्हणून देते. यात काम करणारे बहुतेक लोक चीनमधील गरीब प्रांतात राहणारे आहेत. 
२०१५ मधील बीबीसीच्या एका अहवालात पेगाट्रन कमगारांशी अमानुष पध्‍दतीने वर्तणूक करत असल्याचे सांगितले होते.
मेन फॅक्ट्रीजवळ असलेल्या हॉस्टेलमध्‍ये राहणा-या २५ वर्षांच्या कामगाराने सांगितले, की येथे घाण आणि गर्दीपेक्षा मोठी समस्या सुरक्षेची आहे. सुरक्षा कर्मचा-यांचे येथे कोणतेही नियंत्रण नाही. वेगवेगळ्या प्रांतातून येथे भिन्न स्वभावाचे लोक येतात. अशा स्थितीत मौल्यवान वस्तूंची चोरी मोठ्या प्रमाणावर होते. एकदा एका कामगाराची पूर्ण पगार पहिल्याचे दिवशी गायब झाली होती. बॉस पैसे कमवण्‍यासाठी रोबोटप्रमाणे वापर करतात, असे एका दुस-या कामगाराने सांगितले.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यासह साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वरकुटे-मलवडी येथील सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी टोळी जमवून, दहशत माजवून खंडणी मागितल्याप्रकरण व इतर गुन्ह्यांसह कारवाई करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती.आता राष्ट्रवादीच्या नेत्यावर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने राष्ट्रवादी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. तर शेखर गोरे यांच्या चारही साथीदारांना अटक करण्यात आली असून आता शेखर गोरे यांना केव्हा अटक होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अरेरावी व मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यातील रणरागिणींसह महाराष्ट्र सैनिकांनी नुकतेच निसरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.

कट्टर हिंदूत्ववादी व शाकाहाराचा पुरस्कार करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सातार्‍यातील कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी चक्क भगवे कारपेट अंथरल्यामुळे कट्टर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, जेवणासाठी खास मांसाहार विभाग निर्माण करुन भाजपच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन सातार्‍यात झाल्याची टीका आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्ते करु लागले आहेत.

टेक-गॅजेट बातम्या

.
सध्या व्हॉटस् अ‍ॅपशिवाय अनेकांचे पान हलत नाही. जगभर लोकप्रिय असलेल्या या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक नवे फिचर्स आणले जातात. व्हिडीओ कॉलिंगसारख्या अशाच काही वैशिष्ट्यांमुळे व्हॉटस् अ‍ॅप दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आहे. आता आणखी एक नवं फिचर व्हॉटस् अ‍ॅपने यूजरसाठी आणलं आहे. या फिचरमुळे आता व्हॉटस् अ‍ॅपवरून लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहे. अनेक द‍ृष्टीने हे फिचर महत्त्वाचं ठरणार आहे.


.
मुंबई : गेल्या दोन महिन्यात व्हॉट्सअॅपवरील गोपनीय व्हिडिओ, फोटो आणि फाईल्स हॅक करुन त्यांचा गैरवापर झाल्याच्या 50 हून जास्त तक्रारी मुंबई सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोडचा अॅक्सेस मिळवून व्हॉट्सअॅप अकाऊण्ट सहजरित्या हॅक करता येतं, असा दावा सायबर पोलिसांनी केला आहे.

.
मुंबई: रिलायन्स जिओ प्राइम ऑफर 15 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या यूजर्सनं प्राइम मेंबरशीप घेतली नव्हती. त्यांना ती घेता येणार आहे. याबरोबरच जिओनं आपल्या ग्राहकांसाठी समर सरप्राइज ऑफरही आणली आहे.

.
मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि Mi.comवर या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. पहिल्याच दिवशी विक्रीमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोन एक नवा विक्रम रचला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.