सांगलीत वायू सेनेची भरती, बारावी पास तरुणांना संधी

2017-05-08

सांगलीत वायू सेनेची भरती, बारावी पास तरुणांना संधी

सांगली: भारतीय वायू सेनेतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून तासगावमध्ये सुरुवात झाली आहे. तासगावातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं ही भरती प्रक्रिया होत आहे. वायूसेना सुरक्षा सेवा आणि वैद्यकीय सहायक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून, त्यासाठी बारावी पास ही पात्रता अट आहे.
8 मे आणि 10 मे या कालावधीत ही प्रक्रिया होईल.  या मेळाव्यामध्ये शारीरिक आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांची जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी. तासगावात पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी तासगाव इथं भेट देऊन भरती प्रक्रियेच्या तयारीची पाहणी केली.
वायूसेना सुरक्षा सेवा  – एअरमन – ग्रुप Y (नॉन टेक्निकल) – इंडियन एअरफोर्स सिक्युरिटी
वैद्यकीय सहायक – मेडिकल असिस्टंट ग्रुप Y (नॉन टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता
पहिल्या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 50 टक्के गुणांसह बारावी पास असावा.
वैद्यकीय सहायक पदासाठी – उमेदवार विज्ञान शाखेतून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. यामध्ये फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांचा समावेश असावा.
वयाची मर्यादा –
इच्छुक उमेदवारांचा जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी.
भरतीविषयी माहिती
8 ते 9 मे – ग्रुप Y IAF (S) ट्रेड – लेखी परीक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी
10 ते 11 मे 2017 – ग्रुप Y वैद्यकीय सहाय्यक – लेखी परिक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी,
12 मे  2017 – राखीव दिवस


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
Ganesh hanmant bote
Form bharne

महत्वाच्या बातम्या

मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका करत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील कार्यपध्दती अनुषंगाने चार न्यायमुर्तींनी घेतलेली भूमिका समर्थनीय असून त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालय ही संस्था असून त्यातील अशा प्रकारामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगत गप्प राहणे पसंद केल्याने त्यांचे मौनच सर्वकाही सांगून जात असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सील ऑफ इंडियाचे माजी चेअरमन ऍड. डी.व्ही.पाटील यांनी व्यक्त केले.

येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये महिंद्रा अण्ड महिंद्रा या नामांकित कंपनीसाठी मुलाखती होणार आहेत. टेक्निकल अपरेंटिस आणि डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी या मुलाखती होणार असून मुलाखतींसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसोबतच सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांनी केले आहे.

पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक, फोर्स मोटर्सचे प्रमुख डॉ.अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स तर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. हा सोहळा आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

सातारा, जकातवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा आणि विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय जकातवाडी वाचनालयाच्या वतीने विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई जयंती कार्यक्रम संपन्न करणेत आला. यावेळी सागर पवार हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांचा जन्मदिन हा आपणा सर्वांना प्रेरणादायी स्त्रोत आहे. विवेकानंदांच्या कार्यातून आणि राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारातून नित्य प्रेरणा घेऊन जीवन उन्नत करावयाचे आहे. त्याचप्रमाणे रोज किमान एक तास प्रेरणादायी पुस्तकाचे वाचनासाठी दिला पाहिजे. गावातील विद्यावर्धिनी वाचनालय आणि शाळा हे नक्कीच वाचकांची वाचनाची भूक वाढवेल व पूर्ण करेल. प्रतिमा पूजन मान्यवरांनी केले

नोकरी बातम्या

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

.
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, सातारा येथे दि. 11 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

.
भारतीय वायू सेना दलामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारुन (ग्रुप एव्स ट्रेड व ग्रुप वाय ट्रेड ) भरती होणार आहे. ग्रुप एक्स ट्रेड 10 +2 पास गणित,भौतिकशास्त्र, इंग्रजी विषयास 50 टक्के गुण किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिीकी डिप्लोमा कोर्स 50 टक्के गुण. जर डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय नसेल तर 10 वी मध्ये विषयात 50 टक्के गुण आवश्यक. तर ग्रुप वाय ट्रेड:-10+2पास,प्रत्येक विषयात 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.