अपघात : मदतीचा हात

2017-05-01

अपघात : मदतीचा हात

अपघात : मदतीचा हात
परवा सज्जनगड परिसरातील प्रवासात दुचाकी घसरली. मागच्या सीटवरच्या श्रीमती रस्त्यावर पडल्या. या अगोदर असं पडणं-झडणं सुरु होतेच. तेव्हा किरकोळ इजा पोहोचल्या होत्या. आज मात्र नियती रुसली आणि पत्नी कोसळली. क्षणभर काही कळालेच नाही... तिची किंकाळी कानावर आली. ब्रेक घेवून मागे फिरलो आणि धीराचाही धीर खचला. ती तडफडत होती. हातपाय वेडेवाकडे होत होते आणि बाजूला रक्त सांडले होते. तिला उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा श्‍वास कोंडल्याचे जाणवले. प्रवासात डोक्याला रुमाल (स्टोल) बांधलेला होता. तो मोकळा केला. केसांमुळे रक्तस्त्राव नेमका कोठून होतोय हे कळत नव्हते. नेहमीप्रमाणे पाण्याची बाटली शोधली, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.
त्याक्षणी अवघं आयुष्य डोळ्यासमोरुन उभारले. आपल्या हतबल अगतिकतेचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. तरीही उपजत धैर्य कामी आले. त्याही स्थितीत ङ्ग देवा माझी लाज राख म अशी आर्त हाक काळजातून प्रकटली. दरम्यान मस्तकावरुन हलकेच हात फिरवताना काहीतरी बिलबिलीत स्पर्श जाणवला आणि काळजाचा ठोकाच चुकला.
आता बघ्यांची गर्दी होऊ लागली होती. काही महिला रक्त बघुन करवादायच्या. पण त्याने अर्धवट शुद्धीवर असलेल्या जखमीची अधिक पंचाईत होऊ शकते. पहिला अपघाताचा धक्का अजून विरलेला नसतो. अशाप्रसंगी धीर देणे, हाकेला धावून जाणे महत्त्वाचे. क्रियाशून्य कोरडी सहानुभूती व्यर्थच. काहींना काही घडले, कसे घडले, यातच जास्त रस असतो. मूळ हेतू जखमीच्या प्रथमोपचाराचा आणि उपचारार्थ दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा. तो बाजूलाच राहतो. विशेषत: आडमार्गावर अपघात झाल्यास ही समस्या जास्त तीव्रतेने जाणवते.
मलाही दवाखान्यापर्यंत अर्धांगिनीला कसे पोहोचवायचे, हा प्रश्‍न पडलेला. चारचाकीशिवाय हे शक्य नव्हते. काहीजण बघून पुढे निघून जायचे. आपण गयावयाही करु शकत नाही, याची लाज वाटू लागली. शिवाय या स्थितीत पत्नीला धरुन ठेवणे, तिला धीर देणे क्रमप्राप्त होते. प्रसंग बाका होता.
काही क्षणांत एक मारुती ओम्नी जवळ येऊन थांबली. चालकाने स्वत:हून चौकशी करुन दवाखान्यापर्यंत सोडतो म्हटले, अन् जीव भांड्यात पडला नव्हे तर साक्षात देव भेटला असेच वाटले. परस्पर सहचर्य हेच मानवतेचं खरं लक्षण, याची प्रचिती आली. गाडी मागे रिकामी असल्यामुळे जखमी पत्नीला घेऊन बसणे सोपे गेले. सातार्‍यात ओम्नीवाल्याचा निरोप घेताना पैशाचा प्रश्‍न मनात उमटला. मात्र कारवाल्याने चला, लवकर दवाखान्यात पोहोचा, असे म्हटले. त्याचा हात हातात घेऊन अगदी मनापासून आभारी आहे म्हटले आणि तोच हात एकदा कपाळाला लावला आणि कारवाला आपल्या वाटेने निघून गेला.
या धांदलीत गाडीचा नंबर पाहणे अथवा त्या देवमाणसाच्या नावागावाची चौकशी करणे राहून गेले. त्या अवस्थेत हे सूचलेही नाही. विशेष म्हणजे मदत करणारानेही अभिनिवेष दाखविला नाही, की उगाचच चौकशाही केल्या नाहीत. वेळेची मागणी आणि प्रसंगाचे गांभीर्य त्या देवदूताने जाणले आणि माणुसकीचा दाखला दिला. त्याच्या या कृतीला माझे मनस्वी वंदन...
एरवी बोलणे फार सोपे, उपदेश देणे त्याहून सुलभ. प्रसंगी चिरफाड करणारे अथवा त्या प्रसंगालाच संधी मानून फायदा शोधणारे खूप भेटतील. निरपेक्ष भावनेने कोणताही (अविर्भाव) अभिनिवेष न बाळगता मदत करणारे फारच थोडे भेटतात. अशावेळी माणसाची प्रतिष्ठा नव्हे तर निष्ठा कामास येते.
यानंतरचा भाग अर्थातच उपचारांचा येतो. रुग्णासाठी दवाखाना हिच त्याची महत्त्वाची गरज असते. कारण डॉक्टर हा जन्म आणि मृत्यूच्या मध्ये उभा असतो. त्याच्या प्रयत्नांवरच सर्व अवलंबून असते. जखमीला वाचविण्यासाठी त्याच्या परिवाराला उपचारांसाठी पैसा उभा करणे हीसुद्धा परिक्षाच असते. आपल्या माणसासाठी हे कष्ट सर्वचजण सोसतात. अडचणीच्या वेळी समस्यांची जंत्री वाढतच जाते. अगदी साध्या सहज उपलब्ध होणार्‍या गोष्टींचीही वानवा भासते. अशा समयी माणसाची खरी ओळख होते आणि त्याच्या धैर्याची-संयमाची कसोटी लागते. वैद्यकीय कर्मचार्‍यासाठी रुग्ण, त्याची सेवा हा नित्याचा भाग असतो. पण रुग्णाच्या परिवारासाठी हे क्षण अत्यंत घालमेलीचे, अतिसंवेदनशील ठरतात. त्यातून मग समजुतींचे घोटाळे निर्माण होतात. या सर्वाला सामोरे जावेच लागते.
सद्यस्थितीत सर्वसामान्यांना दवाखान्याची पायरी चढणे ही मोठी आपत्ती वाटते. रुग्णाच्या हिताची बाब इतरांसाठी चिंतेचा विषय ठरते. याला आर्थिक कुवत आणि एकूण पाठबळ हे कारण असते. रुग्ण वेदनेने त्रस्त असतो, तर त्याचा परिवार या अनुषंगाने येणार्‍या तणावाने संभ्रमित असतो. कर्त्याधर्त्यासाठी ही तारेवरची कसरत असते. एकीकडे रुग्णाला सांभाळणे, परिवार, रोजगार-व्यवसाय, आर्थिक नियोजन, जबाबदार्‍या यांची सांगड घालत वेळ निभावणे क्रमप्राप्त असते.
रुग्णालयातील वातावरणाची एक वेगळीच तर्‍हा असते. रुग्णांची तडफड, नातेवाईकांची धावपळ, कर्मचारी वृंदाची रुटीन (कामाचे) सांभाळण्याची नेहमीची तर्‍हा, डॉक्टरांच्या व्हिजिट असा मामला एकीकडे. तर आजाराची व्याप्ती, आर्थिक स्थिती, उपचारांची उपलब्धता, वेगवेगळ्या चाचण्या, संभाव्य धोके, रुग्णाचा प्रतिसाद याबाबी दुसरीकडे. यासार्‍याची सांगड घालताना होणारी घालमेल आणि इतके व्याप करुन शेवटी रुग्णाच्या आजाराचे संपूर्ण निवारण होणार की नाही, याची चिंता... या विश्‍वात जनन-मरणाची अशी कसरत पहावयास मिळते. आयुष्याचा एक वेगळा आयाम जाणवतो. प्रश्‍न आहे तो पाहणार्‍याच्या नजरेचा आणि जीवनविषयक तत्वज्ञानाचा!
जीवन नश्‍वर आहे, याची साक्ष पटते दोन ठिकाणी. एक स्मशानभूमीत (कोणाला तरी पोहोचविण्यासाठी गेल्यावर) आणि रुग्णालयात. माणसाचं काही खरं नाही. जीवनाचा भरवसा नाही, याचा बोध होतो. एरवी माणूस डिंग्या मारत राहतो. स्वप्रतिष्ठेच्या, कर्तृत्वाच्या भ्रामक कल्पनांनाच खरे जीवन मानत राहतो. या अफाट दुनियेतील दु:ख, दारिद्य्र, पीडा याची जाण असतेच पण त्या वेदनांची सल आणि तीव्रता अशाठिकाणी गेल्यावर जाणवतात. दृष्टांतच म्हणा तो...
आकाशाशी स्पर्धा करु पाहणार्‍या जीवनाला मातीशी आपले घट्ट नाते आहे याचा साक्षात्कार होतो. नैसर्गिक आपत्ती या माणसाच्या हातात नाहीत, मात्र अपघात (आपत्ती) हे बरेचदा मानवनिर्मित असतात. या युगात वाहन अपघात ही नित्याची बाब झाली आहे. रोज हजारो जीव अपघातग्रस्त होतात. यामुळे लाखोजणांना जीव गमवावा लागतो. कित्येकांना जन्माचे अपंगत्व येते. कर्त्या जीवाच्या जाण्याने अवघ्या कुटूंबाची वाताहत होते.
एका क्षणात होत्याचे नव्हते करणारे ते क्षण... केवळ शरीरानेच नव्हे तर मनाने-धनाने अपरिमित हानी निर्माण करणारे ते क्षण... ते कोणाच्याही वाटेला येवू नयेत... तरीही जीवनात अपघातांची मालिका सुरु राहते. अशावेळी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात.
 * प्रवासात गतीचा (वेगाचा) सोस, मोबाईलचा वापर नको.
* वाहतूक नियमांचे पालन करा.
* वादविवाद, विचारांची तंद्री, ईर्षा या गोष्टींचा त्याग करावा.
* वाहनांची देखभाल-दुरुस्ती वेळच्यावेळी करावी.
* व्यर्थ चौकशा, जिज्ञासा टाळाव्यात.
* जखमींना तत्काळ योग्य मदत करण्याचा प्रयत्न करावा.
* अपघातग्रस्तांच्या साहित्य सामग्री आदीबाबत जागरुकता.
* अपघातग्रस्त लहानगे, महिला यांची गरज म्हणून महिलावर्गातून मदतीची अपेक्षापूर्ती व्हावी.
* अशाप्रसंगी लागलीच प्रथमोपचारांची गरज भासते. प्रथमोपचाराचे किमान ज्ञान असलेल्या लोकांनी अपघातग्रस्ताच्या मदतीला पुढे यावे.
* जखमींपेक्षा वाहन मालमत्तेच्या नुकसानीचाच वितंडवाद घालत राहणे टाळावे.
* वैद्यकीय सेवांची तत्परता हवी. त्याचे नियोजन करावे.
या उप्पर शासकीय पातळीवर सोयीसुविधांची वानवाच आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पथदर्शक फलक नसल्याने अपघातांची शक्यता बळावत आहे. वाहतूक नियंत्रण कक्षावर कामाचा ताण वाढत आहे.
शेवटी माणुसकी टिकून राहते. अशा अपघातप्रसंगी सामान्य माणूस उगाच पोलीस चौकशा नकोत, दप्तर दिरंगाईत अडकायला नको, असे मानून मदतकार्यातून अंग काढून घेतात. परंतू आता शासकीय पातळीवरही नियमांचा बाऊ केला जात नाही. जखमींना उपचार मिळणे हा जखमीचा हक्क आहे. अशा तरतुदी प्रशासकीय पातळीवर केल्या जात आहेत. त्यामुळे आपला बहुमूल्य वेळ अपघातग्रस्तासाठी खर्च करण्यास हरकत नसावी. काळ आणि वेळ कोणावरही सांगून येत नाही. असे प्रसंग येऊ नयेत, अशी व्यवस्था अस्तित्वात असावी. आलाच असा बाका प्रसंग तर मदतीला धावणारांची गाठ पडावी. तसेही समाजात अपघातग्रस्तांना उपयोगी पडणारांची संख्या खूप कमी आहे. आर्थिक, भावनिक आणि वैद्यकीय उपचार या तिनही पातळ्यांवर ही मदत व्हावी इतकेच...
- नंदकुमार ढमाळ


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका करत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील कार्यपध्दती अनुषंगाने चार न्यायमुर्तींनी घेतलेली भूमिका समर्थनीय असून त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालय ही संस्था असून त्यातील अशा प्रकारामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगत गप्प राहणे पसंद केल्याने त्यांचे मौनच सर्वकाही सांगून जात असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सील ऑफ इंडियाचे माजी चेअरमन ऍड. डी.व्ही.पाटील यांनी व्यक्त केले.

येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये महिंद्रा अण्ड महिंद्रा या नामांकित कंपनीसाठी मुलाखती होणार आहेत. टेक्निकल अपरेंटिस आणि डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी या मुलाखती होणार असून मुलाखतींसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसोबतच सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांनी केले आहे.

पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक, फोर्स मोटर्सचे प्रमुख डॉ.अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स तर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. हा सोहळा आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

सातारा, जकातवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा आणि विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय जकातवाडी वाचनालयाच्या वतीने विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई जयंती कार्यक्रम संपन्न करणेत आला. यावेळी सागर पवार हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांचा जन्मदिन हा आपणा सर्वांना प्रेरणादायी स्त्रोत आहे. विवेकानंदांच्या कार्यातून आणि राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारातून नित्य प्रेरणा घेऊन जीवन उन्नत करावयाचे आहे. त्याचप्रमाणे रोज किमान एक तास प्रेरणादायी पुस्तकाचे वाचनासाठी दिला पाहिजे. गावातील विद्यावर्धिनी वाचनालय आणि शाळा हे नक्कीच वाचकांची वाचनाची भूक वाढवेल व पूर्ण करेल. प्रतिमा पूजन मान्यवरांनी केले

सातारा लिक्स बातम्या

.
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.

.
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

.
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

.
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!

.
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशाल दिशा देण्याचे काम केले आहे. राज्य व केंद्र शासन लोकांच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. शासनच्या योजना राबविण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो, प्राथमिक शिक्षण यासह अनेक योजनांमध्ये सातारा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यात जलसंधारण, शिक्षण, स्वच्छतेत जिल्ह्याने विकासाचा नवा आयाम निर्माण केला आहे. यावर टाकलेला थोडक्यात प्रकाश…


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.