नव्या पिढीच्या कलाकारांवर संतापला ऋषी कपूर

2017-04-28

नव्या पिढीच्या कलाकारांवर संतापला ऋषी कपूर

मुंबईः अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी बॉलिवूडच्या नव्या पिढीतीली एकही कलाकार उपस्थित नव्हता. त्यांनी ट्विट करुन लिहिले, की नव्या पिढीचा एकही अभिनेता किंवा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता, हे लाजीरवाणं आहे.
ऋषी कपूर यांनी आपला संताप ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यांनी लिहिले, ''नव्या पिढीचा एकही अभिनेता वा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता ... हे लाजिरवाणं आहे... काहींनी तर त्यांच्यासोबत कामही केलं आहे... दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे... असं का? 
पुढे ते म्हणतात, ''माझ्यावेळेसही कुणी खांदा देण्यास येणार नाही अशी मी स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी....''
''स्वतःला स्टार म्हणवून घेणा-यांचा आज खूप राग आला आहे... काल रात्री प्रियंका चोप्राच्या पार्टीमध्ये कितीतरी 'चमचा' लोकांना भेटलो... इथे मात्र त्यातले काहीच जणं होते...'', असे ऋषी कपूर म्हणाले.
विनोद खन्नांच्या मृत्यूच्या एकदिवस आधी प्रियांका चोप्राच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत, कंगना रनोट, तमन्ना भाटिया, सोफी चौधरी, फरहा अली खान, सुष्मिता सेन, ईशा गुप्ता, कुणाल कोहली, अब्बास-मस्तान, ओमंग कुमार, ऋषी कपूर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने, आशुतोष गोवारीकर, रमेश तौरानी, सुभाष घई आणि विधू विनोद चोप्रा हे कलाकारांनी उपस्थिती लावली होती.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

पेज3 बातम्या

.
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.

.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.