व्यवसाय ही उत्तम संधी

2017-04-28

व्यवसाय ही उत्तम संधी

 सातारा: नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसाय ही उत्तम संधी आहे, असा संदेश बागडे पापड गृह उद्योगचे सुनील बागडे हे आपल्या पापड उद्योगातून देत आहेत.

      वाई येथील सुनील बागडे गेले कित्येक वर्ष बाहेरुन पापड विकत आणून सायकलवरुन घरोघरी जावून विकत होते. यातून होणारा नफा त्यातून त्यांनी मोटर सायकल खरेदी केली. मार्केटींग करताना त्यांना चांगला नफा होऊ लागला. त्यामधून त्यांनी एक थ्रीव्हीलर खरेदी केली आणि त्यावर स्पीकरद्वारे प्रसिद्धी करुन मार्केटींग करु लागले. यावेळी केवळ पापड न विकता लोणंची, कुरवड्या, चटण्या असे अन्य पदार्थही पापडासोबत विक्री करु लागले. मार्केटींगमधून आता उत्पादन क्षेत्रात येण्याचा त्यांनी विचार केला.

पापडला मागणी मोठी असून त्याच्या उत्पादनासाठी कमी भांडवल लागते, असा विचार करुन श्री. बागडे यांनी वाई येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने जागा घेतली आणि त्यांनी बागडे पापड गृह उद्योग सुरु केला. आज ते उडीद, बटाटा, तांदूळ, नाचणी, ठेचा, पालक असे पापडाचे विविध प्रकार उत्पादीत करतात. पूर्वीचा असणारा मार्केटींगचा अनुभव त्याच्या जोरावर सध्या ते दररोज 50 किलो पापड विकतात. त्यांच्याकडे सहा महिला आणि दोन पुरुष असे आठजण काम करतात.

मुलाने नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसायात उतरावे ही त्यांची इच्छा असून त्याचसाठी त्यांनी हा व्यवसाय स्वत:च्या मुलाला सुरु करुन दिला आहे. व्यवसाय ही उत्तम संधी ते मानतात. छोट्याशा व्यवसायातून परिश्रम, चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर भविष्यात मोठा उद्योग निर्माण केला जाऊ शकतो. यामधून स्वत:बरोबरच देशाच्याही आर्थिक प्रगतीमध्ये भर घालता येते, असे श्री. बागडे बोलून दाखवितात.

घर बसल्या छोटा-मोठा व्यवसाय करुन चांगला फायदा मिळविता येतो. त्यासाठी परिश्रमाची जोड हवी. त्याशिवाय थेट उत्पादन प्रक्रियेत न उतरता प्रथम मार्केटींगमध्ये अनुभव घ्यावा. त्यानंतरच उत्पादन यशस्वी होऊ शकते हे श्री. बागडे यांनी आपल्या व्यवसायातून दाखवून दिले आहे. तरुणांनीही नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय करावा, मात्र त्यासाठी योग्य निवड आणि परिश्रम हे हवेतच. अधिक माहितीसाठी सुनील बागडे 8623807074 संपर्क करावा.

 - प्रशांत सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी,

सातारा


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका करत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील कार्यपध्दती अनुषंगाने चार न्यायमुर्तींनी घेतलेली भूमिका समर्थनीय असून त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालय ही संस्था असून त्यातील अशा प्रकारामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगत गप्प राहणे पसंद केल्याने त्यांचे मौनच सर्वकाही सांगून जात असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सील ऑफ इंडियाचे माजी चेअरमन ऍड. डी.व्ही.पाटील यांनी व्यक्त केले.

येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये महिंद्रा अण्ड महिंद्रा या नामांकित कंपनीसाठी मुलाखती होणार आहेत. टेक्निकल अपरेंटिस आणि डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी या मुलाखती होणार असून मुलाखतींसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसोबतच सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांनी केले आहे.

पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक, फोर्स मोटर्सचे प्रमुख डॉ.अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स तर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. हा सोहळा आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

सातारा, जकातवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा आणि विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय जकातवाडी वाचनालयाच्या वतीने विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई जयंती कार्यक्रम संपन्न करणेत आला. यावेळी सागर पवार हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांचा जन्मदिन हा आपणा सर्वांना प्रेरणादायी स्त्रोत आहे. विवेकानंदांच्या कार्यातून आणि राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारातून नित्य प्रेरणा घेऊन जीवन उन्नत करावयाचे आहे. त्याचप्रमाणे रोज किमान एक तास प्रेरणादायी पुस्तकाचे वाचनासाठी दिला पाहिजे. गावातील विद्यावर्धिनी वाचनालय आणि शाळा हे नक्कीच वाचकांची वाचनाची भूक वाढवेल व पूर्ण करेल. प्रतिमा पूजन मान्यवरांनी केले

सातारा लिक्स बातम्या

.
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.

.
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

.
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

.
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!

.
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशाल दिशा देण्याचे काम केले आहे. राज्य व केंद्र शासन लोकांच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. शासनच्या योजना राबविण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो, प्राथमिक शिक्षण यासह अनेक योजनांमध्ये सातारा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यात जलसंधारण, शिक्षण, स्वच्छतेत जिल्ह्याने विकासाचा नवा आयाम निर्माण केला आहे. यावर टाकलेला थोडक्यात प्रकाश…


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.