सावधान! माठांपासून होऊ शकते विषबाधा

2017-04-27

सावधान! माठांपासून होऊ शकते विषबाधा

मुंबई: उन्हाळा सुरु झाला, की घरोघरी ठेवणीतले माठ बाहेर काढले जातात. घरी नसेल तर बाजारातून एक माठ विकत आणला जातो. आता तर या माठांना नळही असतो. त्यामुळे वारंवार माठात हात टाकण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल, खरंच नळ लावल्याने आरोग्याची किती मोठी समस्या सुटली. पण केवळ नळच नाही तर हा संपूर्ण माठ तुमच्या प्रकृतीसाठी धोकादायक आहे. माठ आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण तो चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे किंवा विकण्यासाठी त्यात विष कालवले आहे.

  • तुम्ही बाजारात लाल माठ घ्यायला गेले तर तुमच्या लक्षात येईल त्याला अगदी भडक लाल रंग दिलेला असतो. मुळात भट्टीतून माठ तयार होतो तेव्हा तो दिसायला आकर्षक नसतो. तो ग्राहकांच्या पसंतीस पडावा म्हणून त्याला रंग दिले जातात. विशेष करुन लाल रंग माठाला दिला जातो. त्यासाठी गेरु किंवा लाल रासायनीक रंगांचा वापर केला जातो. गेरु आणि लाल रंग आरोग्याला धोकादायक आहे. आपण माठातून पाणी पितो तेव्हा पाण्यावाटे गेरु किंवा लाल रंग आपल्या शरीरात जातो. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अनेक रोगांना अशी रासायने आमंत्रण देत असतात.
  • लाल माठाप्रमाणेच काही माठांना काळा रंग दिला जातो. हा रंग म्हणजेच रासायनिक कलर असतो. माठ विकत घेतल्यावर तो बरेच दिवस निघत नाही. पाण्यावाटे हळूहळू शरीरात जातो. माठ जुना असेल तरीही हा रंग पाण्यावाटे शरीरात जात असतो. तुम्हाला तुलना करायची असेल तर नुकत्याच विकत आणलेल्या माठातील पाण्याची साध्या भांड्यातील पाण्याशी तुलना करा. माठातील पाणी जरा काळसर दिसेल. तुमचा विश्वास बसेल.
  • माठाला नळ असला की पाणी काढण्यासाठी आत हात टाकण्याची गरज नाही असे आपण म्हणतो. त्याने आरोग्य चांगले राहते असा आपला समज करुन घेतो. पण मित्रांनो, माठाला लागलेला नळ चांगल्या क्वॉलिटिचा नसतो. कालांतराने नळाच्या आतील भागाचा भुगा पाण्यावाटे आपल्या शरीरात जातो. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. किडणी स्टोनसारखे आजार जडतात.
  •  फ्रिजमध्ये पाण्याच्या वॉटल ठेवून अतिगार पाणी पिण्याची सवय उन्हाळ्यात लागते. त्याने गळ्याचे अनेक रोग होऊ शकतात. उन्हाळ्यात सध्या बऱ्याच लोकांना सर्दी झालेली दिसून येते. हे याचेच एक उदाहरण आहे. वारंवार असे अतिगार पाणी प्यायल्याने सर्दी सारखे संसर्गजन्य आजार होतात. त्यानंतर व्हायरल आजारही जडतात.
  • सध्या घरोघरी वॉटर जार घेण्याची पद्धत सुरु झाली आहे. साधारणपणे 30-40 रुपयांना असा जार मिळतो. पण विचार करा मान्यताप्राप्त वॉटर वॉटलचे पाणी जर पंधरा ते वीस रुपयांना मिळत असेल तर एवढ्या मोठ्या जारचे पाणी केवळ 30-40 रुपयांना कसे काय मिळते... त्यात असे काही की केवळ काही केमिकल टाकून हे पाणी तयार केले जाते. ते काही काळासाठी आपण घेऊ शकतो. पण सातत्याने असे पाणी पिल्याने आजार जडतात.  
  • आर्युवेदात सांगितले आहे, की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्राशन केले पाहिजे. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तांब्याचे भांडे शक्य नसल्यास स्टिलच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले आहे. फ्रीजमधील पाणी प्यायचे असेल तर ते जरा कोमट पाण्यात मिसळून साधारण करा. त्यानंतर प्राशन करा.
  • नळाला येणारे पाणी तसेच पिऊ नका. उन्हाळ्यात नळाला येणाऱ्या पाण्यात रोगराई नसते असे काही जण म्हणतात, पण तसे काही नाही. पिण्याची पाईप लाईन जमिनीखालून येते. त्यात पाणी पुरवठा करताना अनेक प्रकारे दुषीत पाणी मिसळत असते. तेव्हा पाणी व्यवस्थित गाळून घ्या. त्याचा कापड प्रत्येक महिन्याला बदला. तसेच ते जरा कोमट केले तर त्यातील विषाणू नष्ट होतात. कुटुंबातील सदस्य आजारी पडत नाहीत.
  • पिण्याच्या पाण्यातून तुरटीचा खडा फिरवला तर काही वेळाने त्यातील गाळ खाली बसतो. त्यामुळे स्वच्छ पाणी वर राहते. अशा घरगुती पद्धतीनेही पाणी स्वच्छ करता येऊ शकते.
  • भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये ठेवू नका असे सांगितले जाते. तसेच प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये बराच कालावधीपासून ठेवलेले पाणी पिऊ नका. त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. त्याऐवजी फ्रेश पाणी प्या.

Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.