रामगोपाल वर्माविरोधात अटक वॉरंट

2017-04-27

रामगोपाल वर्माविरोधात अटक वॉरंट

औरंगाबाद:  औरंगाबाद खंडपीठाने दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
रामगोपाल वर्माचा 2009 मध्ये अज्ञात  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या सिनेमाची कथा आपली असून, ती वर्मानी चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन यांनी केला होता. मोहसिन यांनी याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयानं रामगोपाल वर्मासह निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही अटक वारंट काढलं आहे.
अज्ञात सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मोहसिननं त्याची स्क्रिप्ट रामगोपल वर्माना दिली होती. काही दिवसांनी चित्रपट प्रदर्शित झाला,  मात्र मोहसिनला कथेचं श्रेय न देता वर्माने सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना दिले होतं. त्यानंतर मोहसिन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
“मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे”, असं मोहसिनने म्हटलं आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

पेज3 बातम्या

.
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.

.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.