टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

2017-04-23

टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

मुंबई : टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. 
टरबुजामध्ये 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे अगोदरच पाण्याचं एवढं प्रमाण असताना त्यावर आणखी पाणी पिऊ नये, असं सांगितलं जातं.अन्न खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिल्यास पोटात पाण्याचं अन्नासोबत मिश्रण होतं. शिवाय अन्न चांगल्या प्रकारे पचनही होत नाही.अन्नासोबत जास्त पाणी पिल्यास शरीरात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होईल आणि पोट भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे जेवणासोबत जास्त पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.मात्र अनेक फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. फळं खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकतं, असं डॉक्टर सांगतात.अन्न किंवा फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं.उदाहरणार्थ दोन चपात्या घेतल्या आणि त्यावर एक ग्लास पाणी टाकलं. चपाती पाण्यात मिसळून जाईल, मात्र त्याचं व्यवस्थितपणे मिश्रण होणार नाही आणि ते खराब होईल. तसंच पोटाच्या बाबतीतही होतं, जेव्हा आपण जेवणानंतर पाणी पितो, असं उदाहरण डॉक्टर देतात.जेवणानंतर थोडं थांबून पाणी पिऊ शकतो, कारण पोटाला पचन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो.फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी हे फळं खाणं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जानेवारी 2018 चा लोकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशील ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ हा पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाशित करण्यात आला आहे. या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नुकताच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटात संभाजीराजेंच्या गंभीर प्रसंगाचे भावनिक भांडवल करत राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांनी केलेला हा खोडसाळपण संतापजनक व निषेधार्ह असून या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 21 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत कराड येथील न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव वर्षा पारगावकर यांनी दिली आहे.

बांधकाम केलेल्या घराची नोंद करून उतारा देण्यासाठी व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 1 हजार 500 रूपयांची लाच स्विकारताना अंबवडे बुद्रक, ता. साताराच्या ग्रामसेवक सचिन भरतराव गायकवाड (वय 37) याला लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.