त्वचारोगतज्ञ डॉ.आदित्य महाजन यांनी अत्याधुनिक तंत्राद्वरे केले हेअर ट्रांसप्लांट

2017-04-18

त्वचारोगतज्ञ डॉ.आदित्य महाजन यांनी अत्याधुनिक तंत्राद्वरे केले हेअर ट्रांसप्लांट

साताराः येथील प्रसिध्द त्वचारोगतज्ञ व लेसरतज्ञ डॉ. आदित्य सुरेश महाजन यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केसरोपण हेअर ट्रांसप्लांट ही शस्त्रक्रिया सातारा येथील समर्थ हॉस्पीटल येथे यशस्वी केली.
२८ वर्षीय तरूणाला ऍड्रोजेनेटिक ऍलोपेसिया हा विकार झाला होता. बर्‍याच ठिकाणी बरीच औषधे घेवूनसुध्दा टक्कलवर केस येत नव्हते त्यामुळे हेअर ट्रांसप्लांट हाच पर्याय उपलब्ध होता. ह्या शस्त्रक्रियेमध्ये फक्त डोक्यावरील त्वचेला भूल दिली जाते. शस्त्रक्रिया सुरू असताना रूग्ण बोलू शकतो. आवश्यकता झाल्यानंतर चहा पाणी नाश्ताही करू शकतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तासाभरात रूग्ण घरी जावू शकतो. आधुनिक तंत्रामध्ये डोक्याच्या मागील भागातून मशिनच्या साह्याने एक एक केस काढून घेतला जातो. हे काढलेले केस टक्कल पडलेल्या भागावर मशिनचया साह्याने रोपण केले जातात. साधारणपणे २ ते ३ महिन्यानंतर हे केस इतर केसाप्रमाणे वाढू लागतात. ही शस्त्रक्रिया किचकट असून टीमवर्कने केली जाते. शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे चार ते पाच तास लागतात. टक्कल किती मोठे आहे त्यावरून दोन ते चार हजार एवढे केस रोपण करावे लागतात असे डॉ. आदित्य महाजन म्हणाले.
टक्कल पडलेल्या तरूण व मध्यमवयीन व्यक्तींना हेअर ट्रांसप्लांट हे एक वरदानच ठरले आहे असे डॉ. आदित्य महाजन म्हणाले. केसरोपण बरोबरच मिसोथेरपी, पी आर पी, मायक्रो निडलींग या थेरपी केस गळणे व टक्कल यावर अतिशय प्रभावी आहेत व डॉ.आदित्य महाजन यांचा यामध्ये हातखंड आहे. या पध्दतीचा अधिकाअधिक रूग्णांना फायदा होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल डॉ.विक्रांत महाजनी, डॉ.शमा, डॉ.स्वप्नील जोशी, डॉ.अशीश घोलप, डॉ. चैतन्य बोकील, डॉ.चैतन्य ठोके, डॉ. अनिरूध्द जगताप, डॉ. मुग्धा व डॉ.तन्वी महाजन, डॉ. अभिषेक महाजन, डॉ. अनुप महाजनी वगैरे मान्यवरांनी अभिनंदन केले.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.