व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण वाढले

2017-04-12

व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : गेल्या दोन महिन्यात व्हॉट्सअॅपवरील गोपनीय व्हिडिओ, फोटो आणि फाईल्स हॅक करुन त्यांचा गैरवापर झाल्याच्या 50 हून जास्त तक्रारी मुंबई सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोडचा अॅक्सेस मिळवून व्हॉट्सअॅप अकाऊण्ट सहजरित्या हॅक करता येतं, असा दावा सायबर पोलिसांनी केला आहे.
1. व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये ‘चेंज माय नंबर’ ऑप्शन सिलेक्ट करुन हॅकर स्वतःच्या नंबर ऐवजी पीडिताचा नंबर फीड करतो.
2. यावेळी व्हॉट्सअॅप सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मूळ व्यक्ती म्हणजेच पीडिताला पाठवतो.
3. हॅकर एखादी कहाणी रचून तो व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्यास सांगतो.
4. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड शेअर करताच पीडिताचा सर्व डेटा क्षणात हॅकरला उपलब्ध होतो.
हॅकर रिस्टोअर या ऑप्शनचा वापर करुन पीडिताचे कॉन्टॅक्ट्स, फोटोज, व्हिडिओ स्वतःच्या फोनवर रिस्टोअर करतो. हा डेटा पीडिताला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
हॅकर इतक्यावरच न थांबता कॉन्टॅक्ट लिस्टमधील इतरांशी ‘पीडिता’चा चेहरा होऊन संपर्क साधतो. अशाचप्रकारे पुढील व्यक्तींना टार्गेट करुन त्यांचाही सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागितला जातो आणि ही साखळी अशीच सुरु राहते.
एका हॅकरने मॉडेलला इव्हेंट मॅनेजर असल्याचं सांगून संपर्क साधला. काम देण्याच्या बहाण्याने तिच्याकडे सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागण्यात आला. पीडितेला त्याचं गांभीर्य न समजल्याने तिने तो शेअर केला आणि क्षणात तिचे वैयक्तिक फोटो हॅकरला मिळाले. काहीवेळा एनजीओ कार्यकर्ते असल्याचं सांगत सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागितले जातात, असंही पोलिसांनी सांगितलं.
हॅक झाल्यास काय कराल?
1. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.
2. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका
3. अनोळखी व्यक्तींशी चॅट करणं टाळा
4. फोनवर अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या झगमगाटात जिल्ह्यात पाऊस सुरू असून, अनेक गावांच्या तलाव आणि बंधाजयात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकजयांत आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र, अधूनमधून व अनेक ठिकाणी सतत पडणाजया पावसामुळे पिकांचे नुकसानही होऊ लागले आहे. लिंब, गोवे परिसरात ढगफुटीने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरणही दिसून येत आहे.

कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.

अंदोरी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा अंदोरी या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गाचे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 32 इंची एलसीडी व दोन साऊंड असा एकूण 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

सातार्‍यातील सावकारीप्रकरणी महेश तपासे याला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर जप्त केलेल्या त्याच्या घरातील कागदपत्रांचे मूल्य प्राथमिक माहितीनुसार 10 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले असून, आकडेमोड करताना त्यांनाही घाम फुटू लागला आहे. दरम्यान, या घटनेतील इतर पाच संशयितांची नावे तपासात स्पष्ट झाली असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना झाली आहेत.

टेक-गॅजेट बातम्या

.
बीजिंग: आयफोन ५ एस आणि आयफोन एसई या दोन हँडसेटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. या दरकपातीनंतर आयफोन ५ एस १५ हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 'अॅपल'नं हालचाली सुरू केल्या आहेत.


.
मुंबई: रिलायन्स जिओ प्राइम ऑफर 15 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या यूजर्सनं प्राइम मेंबरशीप घेतली नव्हती. त्यांना ती घेता येणार आहे. याबरोबरच जिओनं आपल्या ग्राहकांसाठी समर सरप्राइज ऑफरही आणली आहे.

.
मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि Mi.comवर या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. पहिल्याच दिवशी विक्रीमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोन एक नवा विक्रम रचला आहे.

.
मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.