बेकायदा इलेक्ट्रिक बोर्डमुळे अनुष्का शर्माला नोटीस

2017-04-10

बेकायदा इलेक्ट्रिक बोर्डमुळे अनुष्का शर्माला नोटीस

मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अडचणीत आली आहे. मुंबई महापालिकेने अनुष्का शर्माला बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुष्का शर्माला ही नोटीस बजावण्यात आली आहे.
    वर्सोवामधील बद्रिनाथ टॉवरच्या २० मजल्यावर अनुष्का शर्माचे घर आहे. हा संपूर्ण मजलाच शर्मा कुटुंबीयांच्या नावावर आहे. या इमारतीचे माजी सचिव सुनील बत्रा यांनी शर्मा कुटुंबीयांच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्सवर आक्षेप घेतला आहे. अनुष्का शर्माने मजल्याच्या पॅसेजमध्ये बेकायदेशीररित्या इलेक्ट्रिक बॉक्स लावल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शर्मा कुटुंबीयांने इमारतीच्या अन्य नियमांचेही उल्लंघन केल्याचा बत्रा यांचा आरोप आहे. बत्रा यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या क प्रभागातील सहाय्यक अभियंत्यांनी सहा एप्रिलरोजी अनुष्का शर्माला नोटीस बजावली आहे.
    अनुष्का शर्माच्या प्रसिद्धीप्रमुखांनी बत्रा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. परवानगी घेऊनच इलेक्ट्रिक बॉक्स लावले असा दावा अनुष्काच्या प्रवक्त्यांनी केला आहे. बत्रा यांच्या मालकीचा इमारतीतील १६ वा आणि १७ वा मजला आहे. बत्रा यांनी सर्वप्रथम अग्निशमन दलाकडे तक्रार केली होती. तिथे त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सांगितले. बत्रा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. अनुष्का शर्माच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्स हा धोकादायक असून तो तात्काळ हटवावा असे निर्देश महापालिकेने शर्मा कुटुंबीयांना दिल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे. बत्रा यांनी नोटीशीची प्रतच जाहीर केली आहे.
    शर्मा कुटुंबाने पॅसेजमध्ये लाकडी फर्निचरही ठेवल्याने हे आणखी गंभीर प्रकरण असल्याचे बत्रा यांचे म्हणणे आहे. शर्मा यांनी एसीचा कॉम्प्रेसरही चुकीच्या ठिकाणी लावला असून यामुळे बांधकामाला तडे गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोसायटीच्या समितीचे शर्मा कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही. पण मी अपघाताची वाट बघू शकत नाही. म्हणून थेट महापालिकेकडे तक्रार केली असे बत्रा म्हणालेत. 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

पेज3 बातम्या

.
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.

.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.