पिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे

2017-04-10

पिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे

    सातारा: पारंपारिक शेतीच्या अनुभवातून नाविन्याची जोड देत सातत्याने नवे मार्ग शोधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रु. येथील शेतकरी रामराव जाधव या शेतकऱ्याने 20 एकरावर गट शेतीच्या माध्यमातून  कांद्याचे बियाणे तयार केले आहे. पुना-फुरसुंगी  जातीचे कांद्याचे हे बियाणे श्री. जाधव हे महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत आहेत.

            श्री. जाधव हे शेतीमध्ये सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. 1992 पासून त्यांनी एक एकर, दोन एकर अशा क्षेत्रात  शेतामध्ये पुना-फुरसुंगी जातीच्या काद्यांचे बियाणे तयार करत. या माध्यमातून उच्च प्रतिचे बियाणे तयार करुन ते शेतकऱ्यांना विकत होते. त्यांच्या बियाणांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी वाढल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांच्या माध्यमातून गट  शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. पिंपोडे सारख्या भागात सध्या 20 एकर क्षेत्रावर कांद्याचे बियाणे तयार करण्यात येत आहे.

             हे बियाणे जुन्नर, कर्नाटकातील चित्रदूर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जाते. शेतऱ्यांने एकदा बियाणे खरेदी केल्यावर त्या भागातील अन्य शेतकरीही आमच्याकडून बियाणे खरेदी करतात, असे श्री. जाधव अभिामानाने सांगतात. शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बियाणे तयार करुन विकण्याचा व्यवसाय जरी केला तरी त्यात शेतकऱ्याला चांगला फायदा होईल. बियाणे चांगले तयार केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. सर्वसाधारपणे एकरी साडेतीन ते चार क्विंटल बी निघते. तर काद्यांच्या लागवडीसाठी एकारी तीन किलो बी लागते. अशा गट शेतीच्या माध्यमातून सध्या वर्षाला 70 क्विंटल बी आम्ही विकतो. एकदा आमच्याकडून बी घेणारा शेतकरी दुसरीकडून कोठेही खरेदी करत नाही. तो आमच्याकडूनच घेतो. हा विश्वास आणि दर्जा 1992 पासून आम्ही टिकवून ठेवला आहे, अशी माहितीही श्री. जाधव यांनी यावेळी दिली.

            नेहमीच्या पठडीतील शेती करता सातत्याने संशोधन करुन नवे प्रयोग करण्यात रामराव जाधव हे पुढे असतात. शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनासारखा नवा प्रयोग केल्यास शेकऱ्याला लाखो रुपये उत्पान्न मिळू शकते, त्यासाठी प्रामाणिकपणा हवा, असा संदेशही श्री. जाधव हे देत आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहिती आणि बियाणांसाठी रामराव जाधव, पिंपोडे ब्रु. ता. कोरेगाव भ्रमणध्वनी 9049439093 यावर संपर्क करावा.

 - प्रशांत सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी,

सातारा


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

मकरसंक्रांत हा सण म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. या दिवशी माता-भगिनींच्या दागिन्यांवर डोळा ठेवणार्‍या चोरट्यांनी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीनजिक एका महिलेचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याठिकाणी असणार्‍या युवकांनी या दोन चोरट्यांचा जिवाच्या कराराने पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांना जिवाच्या भीतीने दागिने टाकून पळ काढावा लागला. यानंतर सुमारे 20 मिनिटांने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावर पडलेले दागिने हातात घेवून संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. काळ आला होता, पण चोरट्यांची वेळ चुकली अन्यथा याठिकाणी तिळगुळाऐवजी युवकांकडून चोरट्यांना चांगलाच चोप बसला असता.

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे.

सातारा लिक्स बातम्या

.
" नैसर्गिक वरदान लाभलेले सातारा हे सात डोंगरांच्या कुशीत दडलेले महाराष्ट्रातील एक टुमदार शहर. याला धड शहरही म्हणता येत नाही, आणि खेडही. शिवछत्रपती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपतींची राजधानी म्हणून लौकिक पावलेली, एकेकाळचा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेली ही भूमी आता मॅरेथॉनचे गाव म्हणून जगभरात ओळखले जावू लागले आहे. सातारकर आरोग्याच्या दृष्टीने किती सजग झाले आहेत.याची प्रचीती साताऱ्यात आल्यावर आपल्याला येईलच.

.
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.

.
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

.
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

.
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.