रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्नाचा फोटो व्हायरल

2017-04-06

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्नाचा फोटो व्हायरल

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आजारी आहेत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मागील आठवड्यात शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
परंतु यादरम्यानच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली दिसत आहे.
काही वृत्तानुसार, विनोद खन्ना यांना रक्ताचा कॅन्सर आहे. मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. “वडिलांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,” असं विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने सांगितलं.
“डॉक्टर आणि रुग्णालयाचा स्टाफचा मी आभारी आहे. त्यांनी वडिलांची अतिशय चांगली काळजी घेतली, असंही राहुल खन्ना म्हणाला. दुसरीकडे विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना लवकरच डिस्चार मिळेल,” असं रुग्णालयाने सांगितलं.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

पेज3 बातम्या

.
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.

.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.