सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम

2017-04-03

सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यापासून कपिल शर्माचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर शोचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीनंही शोचा 106 कोटींच्या कराराला नुतनीकरण करण्यास नकार दिला. आता शोचा टीआरपीही घसरल्याने सोनी टीव्हीने कपिलला एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे.
सुनीलने कपिलचा शो सोडल्यापासून कपिलच्या शोचा टीआरप घसरला आहे. 30 मार्च रोजी शूट झालेल्या शोमध्ये कपिलला प्रेक्षकांना 10 मिनिटात एकदाही हसवता आलं नाही. त्यामुळे कपिलला या शोचं शूटिंग रद्द करावं लागलं. यामुळे सोनीचे व्यवस्थापक कपिलवर नाराज आहेत. त्यांनी शोचा टीआरपी पुन्हा मिळवण्यासाठी कपिलला एक महिन्याची मुदत दिली आहे. एक महिन्यात टीआरपी मिळाला नाही, तर शो बंद करण्यात येईल, असा इशारा दिल्याचं समजतं आहे.
दरम्यान, सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुनंधा मिश्रा यांच्या शिवाय शो करताना कपिलची चांगलीच दमछाक होत आहे. सध्या या सर्व कलाकारांनी कपिल सोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कपिलवर शो बंद करण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.
कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीने फारसा फायदा झालेला नाही. मागील आठवड्यात प्रसारित झालेले दोन्ही एपिसोड प्रेक्षकांना आवडले नाही. यू ट्यूबवरही या एपिसोडच्या व्ह्यूवरशिपमध्ये फारच घसरण झाली आहे. एवढंच नाही तर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या एपिसोडला नापसंती दर्शवली आहे.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

पेज3 बातम्या

.
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.

.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.