बालविवाह हाच मोठा अडसर

2017-03-07

बालविवाह हाच मोठा अडसर

सातारा(गजानन चेणगे) : गर्भलिंग निदान चळवळीतील भरीव योगदानानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या व स्त्री चळवळीतील नेत्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी बालविवाह रोखण्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातही जिकडे ही बालविवाहाची समस्या अत्यंत भीषण  आहे, त्या मराठवाड्यात विशेषत: बीड जिल्ह्यात त्यांचे कार्य सुरू आहे. ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबात ही समस्या ठळकपणे दिसते. सहा - सहा महिने ऊसतोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कामासाठी येणार्‍यांचा संसार अस्थिर राहतो. त्यांच्यासाठी हे काम सुरू असून शिरूर कासार हा तालुका या कामाचे केंद्र आहे. गेल्या काही दिवसात या एकट्या तालुक्यात वर्षांताईंच्या नेतृत्वाखाली तीस बालविवाह रोखले गेले आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यावर प्रकाशझोत...
          स्त्री तिच्या जीवनात सक्षम, आत्मनिर्भर व्हायची असेल, तर केवळ ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा देऊन भागणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. ज्यामुळे स्त्रीला सक्षम होण्यात, स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून विकास होण्यात अडचणी येतात त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे बालविवाह. त्यांना आळा घालणे, मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वयंप्ाूर्ण करणे यासाठी अॅड. वर्षा देशपांडे अव्याहत झटत आहेत. 
जन्माला येण्याच्या अगोदरपासून मुलीचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू असतो. जन्माला आलीच, तर कूपोषण सोसावे लागते, त्यातून कशीबशी बाहेर आली, तर शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो, शाळेपर्यंत पोहोचली तर शिक्षकांची त्यांच्या कर्तव्यावर निष्ठा किती हा प्रश्‍न असतो, शाळेपर्यंत मुलींना जाता यावे म्हणून मोफत प्रवासाची योजना आणली, पण अनेक गावांपासून शाळांपर्यंत एसटीच नाही. अनेक वाड्यावस्त्यांपासून 5 - 6 किलोमीटरपर्यंत शाळा नाही. त्यामुळे तेथील शाळेत आपल्या मुलींना पाठवणे पालकांना सुरक्षित वाटत नाही. अशी संकटांची मालिका आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा असुनदेखील त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. वयात आलेल्या मुलीला घरात सुरक्षितपणे सांभाळणे पालकांना अवघड झाले आहे. समोर येणार्‍या अनेक घटना याची साक्ष देतात. त्यामुळे मुलींचे विवाह अल्पवयात उरकून जबाबदारीतून मुक्त होण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. अशा पालकांबरोबरच मुली, युवक, समाजाचे प्रबोधन करून मुलींना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या कामातून होताना दिसत आहे.
एका बाजुला बालविवाह रोखणे आणि दुसरीकडे त्या मुलींसाठी व्यावसायिक शिक्षणाची दारे खुली करून देण्याचा वर्षाताईंचा संकल्प आहे. याअंतर्गत नर्सिंग, ड्रायव्हिंग, फिटनेस ट्रेनर, हॉस्पिटॅलिटी, पिटिशनर रायटर, कॉंप्युटर आदी अभ्यासक्रम मुलींना शिकवण्यासाठी शिरूर कासारला आवाहन करण्यात आले होते. हे सर्व अभ्यासक्रम निरनिराळ्या संस्थांमधून शिकवण्यासाठी समझोते करण्यात आले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मोफत शिकवले जाणार असून या शिक्षणाचा खर्च लोकांच्या देणग्यांमधून करण्यात येणार आहे. याकामी सेवाभावी संस्थांचीही मदत घेण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा नुकतीच झाली आहे. लवकरच त्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 
राज्य परिवहन महामंडळात चालकांच्या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यादृष्टीनेही आमची तयारी सुरू आहे. आमच्याकडे चालकाचे प्रशिक्षण घेऊन मुली परवाना मिळवून एसटीसाठी प्रयत्न करणार आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी सकारात्मक राहील अशी आम्हाला खात्री वाटते, असे वर्षाताई म्हणतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातार्‍यात 8 मार्च रोजी व्यावसायिक प्रशिक्षक केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे केंद्र ऊसतोडणी कामगारांच्या मुलींसाठीच असून त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी 25 मुली शिरूर कासार (जि. बीड) येथून येणार आहेत.
त्यांच्या या एकूण कामाचे फलित म्हणजे 25 जानेवारी रोजी शिरूर कासार तालुक्यात झालेल्या महिलांच्या विशेष ग्रामसभेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आम्ही बालविवाह करणार नाही, असे ठराव असंख्य गावात या ग्रामसभांमध्ये करण्यात आले. 51 ग्रामपंचायती व 120 वाड्यावस्त्यांवर मुलींचे 188 गट तयार झाले आहेत. या कन्यांनी आपापल्या गटांना सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, वर्षा देशपांडे, इतकेच काय पंकजा मुंडे यांचेही नाव दिले आहे. काही गटांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून प्रबोधनाचा जागर सुरू झाला आहे. आता 19 मार्चला तेथे 18 वर्षापुढील अविवाहित मुलांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्यात हे युवक 18 वर्षाखालील मुलीशी विवाह न करण्याचा निर्णय करणार आहेत.

आश्रमशाळा व वसतिगृहांची वानवा
गेली काही वर्षे जी गर्भलिंग निदान संदर्भात चळवळ चालवली गेली, त्याचा आज ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. मुलींसाठी आश्रमशाळा व वसतिगृहांची नितांत गरज आहे. या गोष्टींची उपलब्धताही नाही आणि त्यावर कितीतरी पैसा खर्च होत असुनही जे काही उपलब्ध आहे, त्यात गुणवत्ताही नाही अशी स्थिती आहे. आश्रमशाळा व वसतिगृहे ज्यांना चालवायला दिली, त्यांनी त्याची दुकानदारी केल्याचे वास्तव दिसते आहे.
आश्रमशाळा - वसतिगृहांमध्ये वॉर्डन म्हणून महिला हव्यात. पण तसे नसल्याचे वाईट परिणाम विविध घटनांच्या रूपाने समोर येत आहेत. ऍड. वर्षा देशपांडे यांनी हा विषय शासनदरबारी लावून धरला आहे. आश्रमशाळा सुरक्षित करा व वसतिगृहांची संख्या वाढवा अशी त्यांची मागणी आहे. 


 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
smt Sunita karnik
मला या अभियानात सहभाग घ्यावयास आवडेल. साताराला कुठे क्रेंद्र आहे? त्या साठी मला आपल्याला भेटावयाचे आहे, I mean it , ,pl contact me, जलद भेटीसाठी email एेवजी नंबर दिला .आहे

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.