वडीलांच्या मृत्युनंतर दोन्ही घरांसह कंपनी सांभाळणारी सायली सोनावणे

2017-03-05

वडीलांच्या मृत्युनंतर दोन्ही घरांसह कंपनी सांभाळणारी सायली सोनावणे

सातारा : अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनीत काम करणा-या वडीलांनी ही कंपनी विकत घेतली. परंतु मोटर न्युरॉन डिसीजने त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 25 वर्षांची सायली बबन सोनावणे सासर, माहेर दोन्ही सांभाळून वडीलांची कंपनी समर्थपणे सांभाळत आहे. जीवनाच्या खडतर मार्गावरील सायलीचा हा प्रवास निश्चितच 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

       1987 साली वसंत धायगुडे यांनी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये दिवंगत बबन सोनावणे हे विपणन व वितरणाचे काम करत होते. श्री.धायगुडे यांनी ही कंपनी बरीच वषेर्‍कंपनीसाठी काम करणा-या श्री.सोनावणे यांना विक्री करण्याचे ठरविले. 2006 साली श्री. सोनावणे यांनी ही कंपनी विकत घेतली आणि श्री.धायगुडे हे परदेशी निघून गेले. ही कंपनी यशस्वीपणे वाटचाल करत असतांनाच श्री.सोनावणे यांना मोटर न्युरॉन डिसीजने ग्रासले. यामध्ये स्नायुंची शक्ती क्षीण होत गेली. या दरम्यान वडीलांच्या ठिकाणी कंपनीत काम करु लागली.  वडीलांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायाचे शिक्षण घेत असतांनाच तीचा सूरज जगताप यांच्याशी विवाह झाला. यानंतर तिच्या वडीलांचा मृत्यू झाला.

       अर्धवट शिक्षण सोडून सायलीने कंपनीसाठी स्वत:ला वाहून घेतले. आई लहान बहीण व भाऊ ही माहेरची जबाबदारी आणि सासरची जबाबदारी अशा दोन्ही जबाबदारी उचलत अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनीची वाटचाल तीने समर्थपणे सुरु ठेवली आहे. दहा कामगारांच्या बळावर ती आज पूर्ण क्षमतेने कंपनी चालवते. एका दिवसात आठ ते दहा आणि जास्तीत जास्त पंधरा टायर रिमोल्ड केले जातात. यामध्ये मोठे ट्रॅक्टर,जेसीबी, क्रेन, ट्रक यांच्या बरोबरच छोटया वाहनांच्या टायर्सचा समावेश यामध्ये असतो.

       गेल्या एकवीस वर्षांच्या कालावधीत कंपनीची वाटचाल विश्वसनीय सेवेच्या आधारावर यशस्वीपणे सुरु आहे. याबाबत सायली सोनावणे म्हणते महिला  कोणत्याही  कामात कमी पडत नाही. केवळ तीला मार्गदर्शन, प्रेरणा आणि आधाराची गरज असते. मला माझ्या वडीलांनी मार्गदर्शन, प्रेरणा दिली आहे. तर पती सूरज यांनी आधार आणि स्वातंत्र्य दिले आहे. या जोरावरच आणि कामगारांच्या बळावर कंपनीची  घोडदौड सुरु आहे.

       सायली सोनावणेचे हे उदाहरण 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.

- प्रशांत सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.