समाजाला ‘जाणीव’ करुन देणारे एहसास विशेष मुलांचे बालगृह !

2017-03-05

समाजाला ‘जाणीव’ करुन देणारे एहसास विशेष मुलांचे बालगृह !

सातारा: विशेष मुलांना आधार देऊन प्रशिक्षण दिले तर तेही सामान्यपणे जगू शकता, ही जाणीव सातारा तालुक्यातील वळसे येथे असणाऱ्या एहसास विशेष मुलांच्या बालगृहाच्या माध्यमातून उर्मिला बल्लाळ यांनी दिली आहे.

     उर्मिला बल्लाळ यांनी 2006 साली स्वत:च्या घरामध्येच विशेष मुलांसाठी बालगृह सुरु केले. त्यानंतर पती संजय कांबळे, चंद्रकांत भानजी चंदे ट्रस्टच्या पृथ्वी चंदे यांच्या माध्यमातून भाड्याची जागा घेऊन 2008 साली वळसे येथे हे बालगृह सुरु केले. सुरुवातीला 7 विशेष मुले-मुली असणाऱ्या या बालगृहात 50 मुले-मुली आहेत. बाल कल्याण समितीच्या मार्फत राज्यातून या बालगृहात अशी विशेष मुले येतात. प्रत्येक 8 मुलांसाठी 1 विशेष शिक्षक आणि 1 काळजीवाहक यांच्या माध्यामातून त्यांना शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. या मुलांना स्वावलंबी बनविण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या बालगृहात प्रशिक्षण दिले जाते.

     उर्मिला बल्लाळ यांनी सांगितले की, आमचे हे बालगृह विना अनुदान तत्वावर केवळ  लोक सहकार्यातून चालते. विशेष मुलं ही सर्वस्वी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. परंतु त्यांना वेळेवर शिक्षण प्रशिक्षण दिले तर तेही सामान्य जीवन जगू शकतात. ही जाणीव समाजाला करुन  देण्याचा एक उद्देश आहे. या बालगृहातील विशेष मुलं-मुली चित्र काढणे, चित्र रंगवणे, हस्तकला बरोबरच सांस्कृतिकचेही प्रशिक्षण घेतात. मुला-मुलींनी जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसेही मिळविली आहेत. मुलं-मुली प्रशिक्षणानंतर खुप छान नृत्य करतात, भजन, गाणी म्हणतात.

     या बालगृहाच्या मदतीसाठी समाजाने निश्चितपणे पुढे यावे. या मुलांना खरी गरज आहे ती समाजाच्या आधाराची. असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले आहे.

     विशेष मुले ही समाजामध्ये ओझे नसून प्रशिक्षण दिल्यानंतर सक्षम होऊन खूप चांगली प्रगती करु शकतात, असे सांगून संजय कांबळे म्हणतात,

  ‘सुबह होगी मेरो बच्चोंकी होगी

कोई गम होगा कोई शिकायत होगी

पल पल खुशियाँ ही खुशियाँ बिखरी होगी

अंधेरे मे रोशनी  होगी वही बच्चों की मंजील होगी

सुबह होगी, सुबह होगी, सुबह होगी

     विशेष मुलांच्या आयुष्यात सुखसमाधान निर्माण करण्यासाठी उर्मिला बल्लाळ आणि संजय कांबळे हे दोघे पती-पत्नी आपले आयुष्य खर्ची घालत आहेत. त्यांना खरी गरज आहे समाजाच्या आधाराची आणि जाणिवेची  !

    - प्रशांत सातपुते

      जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

मकरसंक्रांत हा सण म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. या दिवशी माता-भगिनींच्या दागिन्यांवर डोळा ठेवणार्‍या चोरट्यांनी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीनजिक एका महिलेचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याठिकाणी असणार्‍या युवकांनी या दोन चोरट्यांचा जिवाच्या कराराने पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांना जिवाच्या भीतीने दागिने टाकून पळ काढावा लागला. यानंतर सुमारे 20 मिनिटांने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावर पडलेले दागिने हातात घेवून संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. काळ आला होता, पण चोरट्यांची वेळ चुकली अन्यथा याठिकाणी तिळगुळाऐवजी युवकांकडून चोरट्यांना चांगलाच चोप बसला असता.

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे.

सातारा लिक्स बातम्या

.
" नैसर्गिक वरदान लाभलेले सातारा हे सात डोंगरांच्या कुशीत दडलेले महाराष्ट्रातील एक टुमदार शहर. याला धड शहरही म्हणता येत नाही, आणि खेडही. शिवछत्रपती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपतींची राजधानी म्हणून लौकिक पावलेली, एकेकाळचा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेली ही भूमी आता मॅरेथॉनचे गाव म्हणून जगभरात ओळखले जावू लागले आहे. सातारकर आरोग्याच्या दृष्टीने किती सजग झाले आहेत.याची प्रचीती साताऱ्यात आल्यावर आपल्याला येईलच.

.
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.

.
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

.
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

.
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.