सातारा: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका उर्दू शाळा क्र.13, गुरुवार परज, बुधवार पेठ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये एसएससी, एचएससी, पदवीधर, इंजिनिअरींग (ऑटोमोबाईल) व आयटीआय (फिटर, वेल्डर, ग्राइंडर, मशिनिस्ट, ऑटोमोबाईल) सीएमसी, व्हीएमसी ऑपरेटर उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सातारा व पुणे येथील कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी एम्प्लॉयमेंट कार्ड/नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.