रा.प महामंडळाकडील लिपीक-टंकलेखक पदांची भरती प्रक्रिया सुरु

2017-01-17

रा.प महामंडळाकडील लिपीक-टंकलेखक पदांची भरती प्रक्रिया सुरु

सातारा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा विभागामार्फत लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ)  व सहाय्यक (कनिष्ठ) भरती प्रक्रिया सुरु आहे. www.msrtc.gov.in व www.msrtcexam.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात व सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.

अर्ज ऑनलाईन नोंदणी व चलन प्रिंट सहीत 3 फेब्रुवारी, ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याचा कालावधी 3 फेब्रुवारी, संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृत करण्याचा अंतिम दि.5 फेब्रुवारी, ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दि.6 फेब्रुवारी व अर्जामध्ये दुरुस्ती 10 फेब्रुवारीपर्यंत करता येईल.

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये नमूद केला आहे. त्यानुसार उमेदवारांनी लेखी परीक्षेची तयारी करावी. लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) या पदांकरीता मुलाखत न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार जात प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे अंतिम निकाल संकेतस्थळावर बाह्य संस्थेद्वारे जाहीर केला जाईल. त्यामुळे महामंडळातर्फे राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया ही संपूर्णपणे पारदर्शक असून ती पूर्णत: गुणवत्तेवर आधारीत आहे.

उमेदवारांनी त्यांच्या निवडीसंदर्भात कोणताही दबाव आणण्याचा अथवा इतारांमार्फत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कोणत्याही अनुचित प्रथेचा अवलंब केल्यास अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेनुसार पार पाडण्यात येणार आहे, असेही विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी कळविले आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

नोकरी बातम्या

.
राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, तसेच कर सहायक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षा एकत्रित न घेता स्वतंत्रपणे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रिया कार्यपद्धती ही हायकोर्टाच्या आदेशांचा सरळसरळ अवमान करणारी आहे. त्यामुळे कन्टेंप्ट ऑफ कोर्टअंतर्गत राज्य सरकारवर कारवाई का करू नये, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला दिलेली स्थगिती कायम ठेवली.

.
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

.
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.