नोटाबंदीनंतरच्या ३ दिवसात तब्बल १ लाख आयफोन विकले गेले

2016-11-29

नोटाबंदीनंतरच्या ३ दिवसात तब्बल १ लाख आयफोन विकले गेले

कोलकाता: नोटाबंदीचा निर्णय जसा जाहिर झाला, तशी सोन्याची खरेदी वाढली. पण आणखी एका कंपनीची या नोटाबंदी निर्णयामुळे भरभराट झाली आहे. ती कंपनी म्हणजे अॅपल. ट्रेडच्या अंदाजानुसार, नोटाबंदीनंतरच्या ३ दिवसात तब्बल १ लाख आयफोन विकले गेले आहेत! ही अॅपलची एरव्ही महिनाभराची विक्री असते.
नोटाबंदीमुळे ज्यांच्याकडे भरमसाट पैसा होता, ते आयफोनवर तुटून पडले आहेत. जुन्या नोटा देऊन महागडा आयफोन घेणे सुरक्षित होते. याचा फायदा उठवत विक्रेत्यांनीही मागील तारखांची बिले देऊन या तेजीत हात धुवून घेतले. दिवाळीनंतर खरे तर महागड्या आयफोनची विक्री घटते. पण नोटाबंदीमुळे ही विक्री अचानक वाढली.
आता मागच्या तारखांची बिले देणे बंद झाले आहे, पण आयफोन विक्रीतली तेजी कायम आहे, असे डिलर्सचे म्हणणे आहे. दिल्लीतल्या एका सेलफोन स्टोअरच्या मालकाने सांगितले की,'आता बहुतांश दुकानांत आयफोनचा साठाच नाही आहे. नोटाबंदीची घोषणा झाली, त्या रात्री खूप आयफोन्सची विक्री झाली.'
यामुळे नोव्हेंबरमध्ये आपले सेल्स टार्गेट पूर्ण करणारी अॅपल ही एकमात्र स्मार्टफोन कंपनी ठरली आहे. कंपनीच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

टेक-गॅजेट बातम्या

.
लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देते. आता व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंगचे फिचर देणार आहे.या फिचर बाबात युझर्समध्ये चांगली चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

.
रिलायन्स जिओने प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार निर्णय घेतला आहे. टेलिकॉम क्षेत्रातील किंमतयुद्धात महत्वपूर्ण सहभाग नोंदवणार्‍या जिओने आता 26 जानेवारीपासून त्यांच्या 1 जीबी आणि 1.5 जीबी प्रतिदिन डाटा वापरकरर्त्यांना आणखी 500 एमबी लिमिटवाढ दिली आहे. कंपनीच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. तर रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत 26 जानेवारीपासूनच सध्याच्या 98 रूपये पॅकची मुदत 14 दिवसांवरून 28 दिवसांपर्यंत वाढवली आहे. जिओने ग्राहकांना नेहमीच वाढीव लाभ दिले आहेत. प्लॅननुसार 50 टक्के जादा डाटा देतानाच जिओने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 50 रूपये कमी प्लॅनवर आकारले आहेत. 26 जानेवारीपासून 1 जीबी डाटा मर्यादा 1.5 जीबी होईल, तर 1.5 जीबी डाटा मर्यादा 2 जीबीपर्यंत वाढणार आहे.

.
मोबाईलमधील जुने कॉल डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे खूप कठीण काम आहे. आता मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर ही प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे. आता mubble app नावाच्या अ‍ॅपमुळे जुने कॉल डिटेल्स शोधणे सहज शक्य होणार आहे. तुम्हाला 7-30 दिवस जुने कॉल डिटेल्स mubble app या अ‍ॅपमुळे शोधणे शक्य होणार असून ते पीडीएफ फाईलच्या स्वरूपात मिळतील. जो इमेल आयडी अ‍ॅपमध्ये द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अवघ्या दोन मिनिटांत परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील.

.
ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

.
करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत. ब्रेल ग्रंथालयात विविध नामवंत लेखकांची पुस्तके, चरित्रे आहेत. या पुस्तकांनी अंध व्यक्तींच्या जीवनात जगण्याची असीम जिद्द निर्माण केली. आठवड्यातून किमान चार ते पाच अंध व्यक्ती या ग्रंथालयात येऊन वाचनाचा आनंद मिळवितात.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.