सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग

2016-10-06

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग

सातारा:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवक व युवतींचे सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाची दि. 7/11/2016 पासून श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हनुमान व्यायाम नगर, अंबादेवी मंदीराजवळ, अमरावती येथे सुरुवात होणार आहे.

                प्रशिक्षणास ठरवुन दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे उमेदवारांची राज्यातून निवड करावयाची आहे.  प्रशिक्षणासाठी पात्रतेचे निकष  पुढीलप्रमाणे आहेत. मुलांसाठी वजन 50 किलो, उंची 165 सें.मी. छाती सर्वसाधारण 79 सें.मी. फुगवून 84 सें.मी.  तर मुलांसाठी वजन 40 ते 50 किलो, उंची 155 सें.मी. असणे आवश्यक आहे.

                निकषात बसणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता व वय याबाबतचा पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या सत्य प्रतीसह अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सातारा या कार्यालयास दि. 21.10.2016  पूर्वी सादर करावा. अधिक माहितीसाठी अधिक्षक नगर संरक्षक दल श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हनुमान व्यायाम नगर, अंबादेवी मंदीराजवळ, अमरावती दूरध्वनी क्र. 0711-2568250 तसेच श्री. प्रशांत चौधरी मो. नं. 9403304325 यावर संपर्क साधावा.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जानेवारी 2018 चा लोकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशील ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ हा पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाशित करण्यात आला आहे. या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नुकताच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटात संभाजीराजेंच्या गंभीर प्रसंगाचे भावनिक भांडवल करत राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांनी केलेला हा खोडसाळपण संतापजनक व निषेधार्ह असून या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 21 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत कराड येथील न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव वर्षा पारगावकर यांनी दिली आहे.

बांधकाम केलेल्या घराची नोंद करून उतारा देण्यासाठी व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 1 हजार 500 रूपयांची लाच स्विकारताना अंबवडे बुद्रक, ता. साताराच्या ग्रामसेवक सचिन भरतराव गायकवाड (वय 37) याला लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

नोकरी बातम्या

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

.
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, सातारा येथे दि. 11 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

.
भारतीय वायू सेना दलामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारुन (ग्रुप एव्स ट्रेड व ग्रुप वाय ट्रेड ) भरती होणार आहे. ग्रुप एक्स ट्रेड 10 +2 पास गणित,भौतिकशास्त्र, इंग्रजी विषयास 50 टक्के गुण किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिीकी डिप्लोमा कोर्स 50 टक्के गुण. जर डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय नसेल तर 10 वी मध्ये विषयात 50 टक्के गुण आवश्यक. तर ग्रुप वाय ट्रेड:-10+2पास,प्रत्येक विषयात 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.