बहिणीबरोबर चॅटींग केले म्‍हणून युवकावर जीवघेणा हल्‍ला

2018-02-16

बहिणीबरोबर चॅटींग केले म्‍हणून युवकावर जीवघेणा हल्‍ला

डोंबिवली : बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मंदार तेली असे जखमी तरुणाचे नाव असून तो हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा करण्यात येत होता. या दिवशी आजदे गावात राहणारा मंदार तेली या तरूणाने एका तरुणीशी सोशल मीडियावरून चॅटींग करून तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे आपल्या बहिणीशी गेल्या दीड महिन्यापासून मंदार हा चॅटींग करीत असल्याच कळताच या तरुणीचा भाऊ प्रवीण उडगी याने त्याचा मित्र पवन घाडीगावकर याच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी  मंदार याच्या आजदे गावात जाऊन त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. यानंतर त्‍याला दुचाकीवरून नेपच्यून हॉस्पिटलच्या गेटवर टाकण्यात आले. 
या हल्‍ल्यात मंदार हा गंभीर जखमी झाला असून त्‍याला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हल्‍ला करणारे प्रवीण उडगी व त्याला साथीदार पवन घाडीगावकर दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी दिली.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बातम्या

.
पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीने पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. फिरोज उर्फ चिंधी शाब्बीर खान असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

.
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो. त्यापैकी एकी मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागतात. तेव्हा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाते.

.
विकिपीडियाने आयोजित केलेल्या ‘विकी लव्हस् मोनुमेंटस’ या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. ‘विकी लव्हस मोनुमेंट्स’ या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांचे छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

.
गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. कचरा गोळा करण्याऱ्या दोन गटातील भांडणावरुन हे तिहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याचं उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.

.
आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.