खासदार अमर साबळेंच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद मिळेल : खा. ए.टी. नाना पाटील

2018-02-14

खासदार अमर साबळेंच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद मिळेल : खा. ए.टी. नाना पाटील

पिंपरी : निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.

खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक माऊली थोरात यांच्या वतीने कासारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे, नगरसेवक केशव घोळवे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, श्याम लांडे, बाबू नायर, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, उमा खापरे, शैला मोळक, बाळासाहेब लांडे, निलेश निम्हण, अमित गोरखे, विजय शिनकर, संभाजी फुगे, सुभाष सरोदे, आशा राऊत, विशाल वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेदरम्यान अतिशय रंगतदार आणि अटीतटीच्या सामान्यांचा सोहळा क्रीडा शौकिनांनी यावेळी अनुभवला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ संघ आणि रहाटणीतील महाराष्ट्र संघ यांच्यात शेवटच्या मिनीटापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत भैरवनाथ संघाने महाराष्ट्र संघावर 20-18 असा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवत खासदार चषकावर आपले नाव कोरले. तर महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

खासदार अमर साबळे, महापौर नितीन काळजे आणि नगरसेविका सीमा सावळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचा तृतीय विजेता संघाचा मान चिखलीतील ब्रम्हा, विष्णू, महेश संघाने पटकावला. यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा विशेष पुरस्कार भैरवनाथ संघाचाच अक्षय वढणे याला मिळाला. तर उत्कृष्ट चढाईसाठी महाराष्ट्र संघाचा चेतन थोरात आणि उत्कृष्ट पकडीसाठी पुण्याच्या राणाप्रताप संघाच्या हर्षल ढगे याला सन्मानित करण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक माऊली थोरात, बाळासाहेब लांडे, संभाजी फुगे, रतन लांडगे, विकास विधाते, प्रकाश जवळकर, विकास पवार, मयूर थोरात, संतोष टोणगे, निखिल दीक्षित, सुनील लांडगे, जितेंद्र लांडगे, प्रभाकर साळुंके, निर्मल पाटील, अमोल मोटे, संजय काटे, दीपक मोंढवे, संजय जगताप, रमेश लांडगे, भाऊसाहेब लांडगे, मनोज बोरसे, सतीश लांडगे, राहुल वडुले, महेश नेहुल, संजय नेहुल, रमाकांत लांडगे, बापूसाहेब भोसले, दिनेश देशमुख, युवराज लांडे, डॉ. महेश शेटे, सुरेश गदिया, बाबासाहेब लांडगे, माऊली जवळकर, बाळासाहेब जवळकर, रघुनाथ जवळकर, तुकाराम लांडगे, संदीप ढेरंगे, अक्षय फुगे, संदीप लांडगे, राजेंद्र शेळके, किरण मोटे, काळूराम लांडगे, मारुती लांडगे, बापूसाहेब भोसले, हर्षल भोसले, विशाल सातपुते यांच्यासह कासारवाडी परिसरातील स्थानिक रहिवाशांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक संदीप सकोरे यांनी केले. सर्वांच्या सहकार्याबद्दल स्पर्धेचे आयोजक नगरसेवक माऊली थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बातम्या

.
पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीने पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. फिरोज उर्फ चिंधी शाब्बीर खान असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

.
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो. त्यापैकी एकी मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागतात. तेव्हा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाते.

.
विकिपीडियाने आयोजित केलेल्या ‘विकी लव्हस् मोनुमेंटस’ या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. ‘विकी लव्हस मोनुमेंट्स’ या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांचे छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

.
गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. कचरा गोळा करण्याऱ्या दोन गटातील भांडणावरुन हे तिहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याचं उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.

.
आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.