कारला दुचाकीस्‍वारांची धडक बसून तिघे जण गंभीर जखमी
वाई : वाई-मांढरदेव घाटात कोचळेवाडी येथे थांबलेल्या कारवर दुचाकीस्‍वारांनी धडक दिल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले. सचिन नामदेव कोळी (वय २४), हिरालाल चतूर वाघ (वय ३६) व दिनेश प्रल्‍हाद कोळी (३०, सर्व रा. बोपर्डी) हे दुचाकी (क्र. एमएच ०३ ७७५६) वरून जाताना थांबलेल्या कारला धडक दिली. यामध्ये दोन्‍ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
टायर फुटल्याने आरामबस पुलाच्या कठड्यात अडकली; सुदैवाने जीवितहानी नाही
भुईंज : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर भुईंज (ता. वाई) येथे कृष्णा नदीवरील पुलानजीक आरामबसचे टायर फुटल्याने आरामबस पुलाच्या कठड्यात अडकल्याने मोठा गंभीर प्रसंग उद्भवला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील ४९ प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
कारमध्ये सापडली ६९ किलो चांदी
भुईंज : आनेवाडी टोल नाका परिसरात स्विफ्ट कारमध्ये तब्बल 69 किलो चांदी सापडली असून, याप्रकरणी भुईंज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन 27 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.
वारागडेवाडी (भुर्इंज) येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाण
पाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वारागडेवाडी (भुर्इंज) येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाण
पाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वारागडेवाडी (भुर्इंज) येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाण
पाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कवठे ते धनगरबुवा रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून मुजवले
ओझर्डे : कवठे ते वाईच्या दरम्यान असलेल्या कवठे ते धनगरबुवा या पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे युवकांनी श्रमदानाने भरून घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कवठे गाव ते वाईच्या दरम्यान असलेल्या कवठे ते धनगरबुवा हा पाच कि.मी.चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. हा रस्ता कवठे, विठ्ठलवाडी, खानापूर, पांडे, वहागाव या गावांसाठी वाई शहराकडे जाण्यासाठी नित्याचा जवळचा मार्ग असून ग्रामस्थांना शेती माल खरेदी- विक्री तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी दररोज याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.
‘किसन वीर’ कारखान्याने आपल्या कामातून माणसे उभी केली: डी. वाय. पाटील
भुईंज : माणसात परमेश्‍वर पाहणे आवश्यक असून किसन वीर कारखान्याचा परिसर पाहिल्यानंतर येथे हेच काम सुरु असल्याचे दिसून येते. एक सहकारी साखर कारखाना आपल्या कामातून माणसं उभं करण्याचे काम करत आहे, हे चित्रच आजच्या काळात आशादायी आहे, असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.
वहागांवची वृध्द महिला अपघातात ठार
सातारा: वाई तालुक्यातील वहागांव येथील सत्तर वर्षीय महिला स्कॉर्पिओच्या धडकेत गंभीर जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मंदाकिनी जगताप असे या महिलेचे नाव असून रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
व्याजवाडी येथे सव्वा लाखाची घरफोडी
ओझर्डे : व्याजवाडी ता. वाई येथे दिवसाढवळया चोरटयांनी राजेंद्र साहेबराव पिसाळ यांच्या घराचे कुलुप तोडून सव्वा लाखाची चोरी केली. याबाबतची फिर्याद पिसाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे.
बारामती येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा; एकाचा मृत्यु
वाई: काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मांढरदेव येथे आलेल्या बारामती येथील एकाच कुंटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. यामध्ये बावीस वर्षीय स्वप्नील विष्णु चव्हाण या तरूणाचा मृत्यु झाला असुन अन्य पाच जण अत्यावस्थ आहेत. यामध्ये एका वयोवृध्देसह चार महिलाचा व चालकाचाही समावेश आहे. यापैकी चौघांवर सातारच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका युवतीवर वाईतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी अडीज वाजण्याच्या
सुरूरजवळ कारचा अपघात; दोघे जखमी
भुईज: पुणे- बेंगलोर महामार्गावर सुरुर गावानजीक एका कारचा अपघात झाला. यामध्ये वसीम निसार शेख व अरफान नजिर शेख (दोघे रा.मीरा रोड,मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
ओमनी उलटल्याने दोघेजण जखमी
ओझर्डे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुईंज गावच्या हद्दीत ओमनीला झालेल्या अपघातामध्ये गाडी उलटली. यामध्ये गाडीमधील दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
जिवे मारहाणीसह पिकांचे नुकसान व न्यायालयाचा अपमान
सातारा: जमिनीच्या कारणावरुन सुरु असलेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पिकाची नासधुस केल्याची तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयीन स्थगिती आदेश धुडकावून पाचवड (ता.वाई) येथील नितीन पांडुरंग गायकवाड व अन्य सात जणांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सचिन व संतोष शिवाजी हगवणे (रा. अमृतवाडी, ता. वाई) यांनी केला आहे.
पोलिसाची धावती दुचाकी रस्त्यावरच पेटली
भुईंज : वाई - सातारा रस्त्यावर आसले गावानजीक सोमवारी सकाळी अचानक धावत्या दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार पोलिसाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्यातच सोडून दिल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, आगीमध्ये दुचाकी पूर्णत: जळाल्याने केवळ सांगाडाच उरला.
परखंदी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
ओझर्डे : परखंदी (ता. वाई) येथील पाझर तलावाची अवस्था अतिशय बिकट झाली असून नाम फौंडेशनच्या मदतीने परखंदी ग्रामस्थांनी पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाईतील गटार दुरुस्तीचे काम वेगाने सुरू
वाई : वाई शहरात मध्यवर्ती ठिकाणी महागणपतीकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये असणार्‍या गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने अनेक वर्षांचा वाईकरांचा प्रश्‍न सुटणार आहे.
वीजवाहिनीच्या तारांमुळे बाभळीचे झाड पेटले
वाई : वाई शहर व तालुक्यात विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार सुरु असून अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये सुसंवाद नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मुख्य लाईनला घासून बाभळीचे उभे झाड पेटून तारा तुटून पडल्याची कल्पना विद्युत मंडळाचे अभियंता खुस्पे यांना तब्बल तीन तासांनी समजली.
धोम जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू
सातारा : चिखली मुरगेवाडा ता. वाई येथील ओंकार ज्ञानेश्वर वाडकर (वय १६) या तरुणाचा धोम जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. काल (सोमवार) दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ओंकार मित्रांबरोबर जलाशयात पोहायला गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.
कणूर येथील आगीत शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान
वाई: कणूर, ता. वाई येथील ओढय़ाकाठी अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकर्‍यांचे शेतमालासह उभ्या पिकांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग एवढी मोठी होती की दोन किलोमीटर परिसरातील आंबा, चिंच, बाभळीची झाडे, कळकीची बेट, वडाची झाडे, शेतात लावलेल्या हजारो कडब्याच्या गंजीसह शेतीची अवजारे, बैलगाडी, दहा विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी, पीव्हीसी पाईप, पाण्याच्या सिंटेक्स टाक्या, ठिबक संच आगीत जाळून खाक झाले. दरम्यान याचवेळी सोनगिरवाडीतील पत्र्याच्या शेडला अचानक लागलेल्या आगीत शेडसह शेतीची अवजारे व गाभण म्हैशीचा आगीत

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.