ओमनी उलटल्याने दोघेजण जखमी
ओझर्डे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुईंज गावच्या हद्दीत ओमनीला झालेल्या अपघातामध्ये गाडी उलटली. यामध्ये गाडीमधील दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
जिवे मारहाणीसह पिकांचे नुकसान व न्यायालयाचा अपमान
सातारा: जमिनीच्या कारणावरुन सुरु असलेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पिकाची नासधुस केल्याची तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयीन स्थगिती आदेश धुडकावून पाचवड (ता.वाई) येथील नितीन पांडुरंग गायकवाड व अन्य सात जणांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सचिन व संतोष शिवाजी हगवणे (रा. अमृतवाडी, ता. वाई) यांनी केला आहे.
पोलिसाची धावती दुचाकी रस्त्यावरच पेटली
भुईंज : वाई - सातारा रस्त्यावर आसले गावानजीक सोमवारी सकाळी अचानक धावत्या दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार पोलिसाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्यातच सोडून दिल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, आगीमध्ये दुचाकी पूर्णत: जळाल्याने केवळ सांगाडाच उरला.
परखंदी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
ओझर्डे : परखंदी (ता. वाई) येथील पाझर तलावाची अवस्था अतिशय बिकट झाली असून नाम फौंडेशनच्या मदतीने परखंदी ग्रामस्थांनी पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाईतील गटार दुरुस्तीचे काम वेगाने सुरू
वाई : वाई शहरात मध्यवर्ती ठिकाणी महागणपतीकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये असणार्‍या गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने अनेक वर्षांचा वाईकरांचा प्रश्‍न सुटणार आहे.
वीजवाहिनीच्या तारांमुळे बाभळीचे झाड पेटले
वाई : वाई शहर व तालुक्यात विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार सुरु असून अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये सुसंवाद नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मुख्य लाईनला घासून बाभळीचे उभे झाड पेटून तारा तुटून पडल्याची कल्पना विद्युत मंडळाचे अभियंता खुस्पे यांना तब्बल तीन तासांनी समजली.
धोम जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू
सातारा : चिखली मुरगेवाडा ता. वाई येथील ओंकार ज्ञानेश्वर वाडकर (वय १६) या तरुणाचा धोम जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. काल (सोमवार) दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ओंकार मित्रांबरोबर जलाशयात पोहायला गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.
कणूर येथील आगीत शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान
वाई: कणूर, ता. वाई येथील ओढय़ाकाठी अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकर्‍यांचे शेतमालासह उभ्या पिकांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग एवढी मोठी होती की दोन किलोमीटर परिसरातील आंबा, चिंच, बाभळीची झाडे, कळकीची बेट, वडाची झाडे, शेतात लावलेल्या हजारो कडब्याच्या गंजीसह शेतीची अवजारे, बैलगाडी, दहा विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी, पीव्हीसी पाईप, पाण्याच्या सिंटेक्स टाक्या, ठिबक संच आगीत जाळून खाक झाले. दरम्यान याचवेळी सोनगिरवाडीतील पत्र्याच्या शेडला अचानक लागलेल्या आगीत शेडसह शेतीची अवजारे व गाभण म्हैशीचा आगीत
महर्षी शिंदे आणि रा. ना. चव्हाण यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज: डॉ. बाबा आढाव
सातारा: आता राज्य संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. डॉ.आंबेडकर जयंतीला चैत्यभूमीवर,दिक्षा भूमीवर पंतप्रधान धावत जातील पण संविधानचे काय करणार ? आज
वाईतील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून शाळकरी मुलाची आत्महत्या
वाई: तेरा वर्षीय शाळकरी मुलाने येथील ब्रिटीशकालीन पुलावरून( जुना कृष्णा पूल) उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.अजित रमेश केवट ( रा. सिध्दनाथवाडी, वाई) असं त्या मुलांच नांव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही.
मनोरूग्न बहिणीने सख्ख्या बहिणीचा गळा चिरून केला खून; स्वतःचाही गळा चिरून केली आत्महत्या
मनोरूग्न असलेल्या लहान बहिणीने मोठ्या मनोरूग्न बहिणीचा गळा चिरून खुन केल्यानंतर स्वतःचाही त्याच चाकुने गळा चिरून आत्महत्या केल्याची खळबळाजनक घटना एकसर ता. वाई येथे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. खुन झालेल्या युवतीचे नाव हेमा ( वय २८ ) तर आत्महत्या करणा-या विवाहित बहिणीचे नांव सीमा( वय २७ ) असं आहे. आत्महत्या करणा-या सीमाने वडीलावर ही चाकुने वार करून त्यानाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते बचावले आहेत. त्याच्या हातावर व पायावर वार झाले आहेत. या घटनेने तालुका हादरून गेला आहे
वणव्याने सह्याद्रीच्या डोंगररांगा काळवंडल्या
वाई: शिवरायांच्या ज्वाज्वल्य पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वणव्याने काळवंडल्या आहेत. वाई तालुक्याच्या प. भागातील किल्ले रायरेश्‍वर व कमळगडही वणव्यात होरपळे आहेत. असंख्य जंगली जीव, दुर्मिळ वनस्पती व वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.
ज्योती मांढरे माफीचा साक्षीदार घोषित
सातारा: सहा खुनांच्या आरोपाखाली अटकेत असणार्‍या धोम (ता. वाई) येथील संतोष पोळ याची साथीदार ज्योती मांढरे हिला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केले. माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केलेल्या ज्योती मांढरे हिला काही अटी घालण्यात आल्या असून गुरुवारी कामकाजादरम्यान पोळ याचा सीलबंद कबुलीनामा न्यायालयात सादर करण्यात आला. या कबुली नाम्याचे वाचन नंतरच्या काळात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. पोळ याच्याविरोधात असणारे सहा खुनाच्या खटल्यांचे कामकाज स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे चालवायाचे
वडाप जीप निष्काळजीपणे चालवून अपघात करणार्‍या चालकास ३ महिने कैद
वाई : निष्काळजीपणे भरधाव वडाप जीप चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या जीपचालकास वाई न्यायालयाने ३ महिने कैद व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली
पसरणी घाटात पर्यटकांची कार पेटली
वाई: पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात मोटारीला आग लागून कार जळाली. यामुळे घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
तालुका काँग्रेसला प्रतापभाऊ, मदनदादांनी बळकटी आणली: नारायणराव पवार
भुईंज: वाई तालुक्यातील काँग्रेसला ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि मदनदादा भोसले यांनीच बळकटी आणली असून आम्ही काँग्रेसजन सर्वजण एक आहोत. आमच्यात कोणीही दुफळी पाडू शकत नाही. त्यामुळेच भुईंज गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवणारच, असा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणराव पवार यांनी केला.
'किसन वीर' ची चौफेर प्रगती कौतुकास्पद: बापट
भुईंज: राजकारणापेक्षा समाजकारण आणि सहकाराला प्राधान्य दिलेले किसन वीर उद्योग समूहाचे प्रमुख मदनदादा भोसले यांनी दूरदृष्टी आणि कल्पकतेतून साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, समाज आणि कारखान्याची केलेली चौफेर प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी काढले.
अश्‍लील फोटो प्रसारीत करणार्‍या आरोपीस न्यायालयाकडून जामीन नामंजूर
सातारा :अश्‍लील फोटो प्रसारीत केलेबाबत १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आरोपी सोपान खरे यास आज न्यायालयाने जामीन नामंजूर केला.
व्हॉट्सअँपवर अश्लिल फोटो प्रसारित करणा-यास 5 दिवस पोलीस कोठडी
वाई तालुक्यातील भुईंज येथील आरोपी सोपान मधुकर खरे वय 29 याने व्हाँट्सअँपवर अश्लिल फोटो प्रसारित केल्याने 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.
बाबासाहेब कदम यांनी मांडलेले प्रश्न दिशाभूल करणारे व तकलादू
भुईंज: किसन वीर उद्योग समूहातील शेतकर्‍यांबरोबरच कर्मचार्‍यांनाही केंद्रस्थानी ठेवून कारभार करणार्‍या विद्यमान संचालक मंडळाने कामगारांना नियमित वेतन, बोनस, सोयीसुविधा देण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नसताना कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी ठेवींच्या निमित्ताने कामगारांचे मांडलेले प्रश्न दिशाभूल करणारे व तकलादू आहेत. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या काळातील कामगारांची कोट्यवधी रुपयांची देणी कामगार पतसंस्थांकडून दबावाने घेतलेल्या ठेवी विद्यमान संचालक मंडळाने भागवून खर्‍या अर्थाने कारखान्यातील कामगारांना अच्छे दिन

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.