शाहूपुरी येथे घरफोडी; 4 लाख 17 हजार ऐवज लंपास
शाहूपुरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील रोख 30 हजार रुपयांसह 24 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी भरदुपारी 5 तासात चोरीची घटना घडला असल्याचे समोर आले आहे.
एस.पी. संदीप पाटील यांचा धडाका; गुंड आशिष जाधवसह टोळीवर 'मोक्का'
सातारा पोलिसांकडून मोक्काअंतर्गत कारवाईचा धडाका सुरुच असून सोमवारी आशिष मोहन जाधव (वय 26, रा.कोडोली, सातारा) याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषच्या टोळीवर नुकताच एमआयडीसीमधील टेंम्पोवर दरोडा टाकून लुटल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कारवाईने सातारा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संविधान परीक्षेत पुसेगाव येथील निकिता गायकवाड विजेती
येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधान जागर अभियानांतर्गत जिल्यातील महाविद्यालय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पुसेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकिता सोपान गायकवाड ने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
सातारा जिल्ह्यातील जानेवारी –फेब्रुवारी मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
माण-खटाव उपविभागातील पोलीस पाटील पद भरती
माण-खटाव उपविभागासाठी एकूण 247 पोलीस पाटलाची पदे मंजूर असून यापैकी 203 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी 100 बिंदू नामावली व जातीच्या प्रवर्गाची लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करुन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी भरले ४ कोटी ९४ लाखाचे वीजबिल
महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे. महावितरणकडे ४ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम बिलांपोटी जमा झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
फलटणमध्ये राजेमंडळींचा 'ओपन स्पेस' घोटाळा; कारवाई करण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
फलटणमध्ये सोसायटीसाठी राखीव असलेल्या भुखंडावर येथील श्रीमती यशोधराराजे उदयसिंह नाईक-निंबाळकर यांनी बोगस दस्तावेज तयार करुन त्या भुखंडावरच निवासी आणि व्यवसायिक इमारत उभारण्याचे काम फलटणच्या राजे गटाच्या पाठिंब्याने सुरु केले असून त्याला फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी मान्यता दिली नसतानाही मुख्याधिकार्‍यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून बिनदिक्कतपणे हे काम सुरु असून हे काम तात्काळ बंद करुन संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी फलटण येथील ऍड. सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.
कराड येथून होणार राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा प्रारंभ
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33 व्या स्मृतीदिनानिमित्त शनिवार दि. 25 रोजी सकाळी 8 वाजता प्रीतीसंगमावर स्व. चव्हाण यांना वंदन करुन राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाचा कराड येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा बसस्थानकात चोरट्यांचा हिसका
सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये कोल्हापूर-पाथर्डी एस. टी. बसमधून मंगळवारी (दि. 14) एक लाख 55 हजार रुपये किमतीचे 12 तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली. तक्रारदार महिला बबूबाई भागचंद आव्हाड या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार जयश्री आव्हाड यांच्या मातोश्री असल्याचे समोर आले आहे.
शासकीय अभियंत्यांपेक्षा कंत्राटी अभियंत्यांवर सातारा पालिका मेहरबान; दरवर्षी मानधनाची खैरात
जोपर्यंत राजाची मर्जी आहे, तोपर्यंत राज्यातील कोणतीही यंत्रणा काहीही करु शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण सातारा नगरपालिकेच्या अभियंता निवडीवरुन दिसून येत आहे. गेले दोन वर्षे प्रतिमाह 40 हजार एवढे मानधन देवून 4 कंत्राटी अभियंता पालिकेत कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षी तब्बल 11 अभियंत्यांची नगरपालिका सेवेत वर्णी लागली आहे. त्यांच्या वेतनासाठी दरमहा साडेचार लाख रुपये खर्च केले जात आहेत. ठेका पद्धतीने निवड केलेल्या अभियंत्यांवर पालिका मेहरबान असल्याने दरवर्षी मानधन व वेतनावर सुमारे 1 कोटी रुपये खर्च होत असल्याचे उघड झाले आहे.
म्हसवड येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात
‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या वादातून प्रथमेशचा खून
पार्ले येथे झालेल्या युवकाच्या खुनाचा अवघ्या आठ तासांत तपास करून पोलिसांनी चौघा जणांची नावे निष्पन्न केली आहेत. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी समन्वयातून खुनाचा छडा लावला. त्यातील दोघांना अटक झाली आहे. अन्य दोघे अल्पवयीन आहेत. कॉलेजमधील किरकोळ मारामारीतील खुन्नस संपवण्यासाठी त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.
फलटणचा जवान निलेश चव्हाण पंचतत्वात विलीन
भटिंडा येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले तरडगावचे सुपुत्र जवान निलेश चव्हाण पंचतत्वात विलीन झाले. त्यांना मुलगा आदर्शने भडाग्नी दिला. निलेश चव्हाण अमर रहे अमर रहे ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, निलेश तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या आवेशात जवान निलेश चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विराट जनसागराच्या साक्षीने जिल्हयाचा आणखी एक वाघ अनंतात विलीन झाला.
कोठडीतील संशयिताचा मृत्यू
सातारा शहर पोलिस ठाण्यात सावकारी व दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला लाला पंडित याचा पुणे येथे ससूनमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लाला हा मोक्‍काअंतर्गत कारवाई झालेल्या खंड्या धाराशिवकरचा साथीदार होता. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार लाला आजारी असल्याचे समोर येत आहे.
धारदार शस्त्रानं भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार
चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान हल्लेखोर पसार झाले आहेत. प्रथमेश संजय सपकाळ (वय 18 वर्ष)असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रथमेश सपकाळ हा पाटण येथील रहिवासी होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्ले गावच्या हद्दीत भटकीमाळ नावाचे शिवार असून, या शिवारात रेल्वेरुळानजीक युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शनिवारी दुपारी कराड तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कॉलेजच्या गणवेशातील सुमारे 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळाला डॉ. दाभोलकर, शहीद ओंबळे व संतोष महाडिक यांच्यासह मान्यवरांचा विसर
क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारच्या सुपूत्रांनी आपल्या कर्तबगारीने सात समुद्रा पलिकडे आपली कीर्ती दिघंत पोहोचवली. त्यांचे स्मरण करुन आजही सामान्य माणूस नतमस्तक होतो. आज माहिती तंत्रज्ञानाने क्रांती केली असून जगातील कोणतीही माहिती एका क्लिकवर संकेतस्थळावर उपलब्ध होते. परंतू सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अंनिसचे डॉ. दाभोलकर, शहीद ओंबळे व संतोष महाडिक यांच्यासह मान्यवरांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. हे संकेतस्थळ अद्यावत करुन सातारच्या सुपूत्रांची कर्तबगारी शासनाने जगासमोर आणावी, अशी मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.
तरडगावचे सुपुत्र जवान निलेश चव्हाण यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू
भटिंडा (पंजाब) येथे आर्टलरी विभागात कार्यरत असलेले तरडगाव ता. फलटण येथील सुपुत्र जवान निलेश तुकाराम चव्हाण (वय 34) हे आज सकाळी 9.30 वाजता कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. जवान निलेश चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त समजताच तरडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पाचव्या स्मृतीदिनानिमित्त साताऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
तमाम हिंदुंच्या व महाराष्ट्र अस्मितेच्या रक्षणाचे जाज्ज्वल्य विचार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चेतवले. समाजमनात त्यांचे तेजस्वी विचार रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे व निमिश शहा यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा साताऱ्यात सलून दुकाने बंद ठेवून निषेध !
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याची क्लीप महाराष्ट्रभर व्हायरल झाली असून यामध्ये नाभिक समाजाच्या भावना दुखाल्या आहेत. स्वाभिमानी नाभिक संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सातारा जिल्ह्याच्या वतीने आज सलून दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या कार्यालयाला २० नोव्हेंबरपासून टाळे ठोकण्याचा इशारा
कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना वीज जोड तोडण्याची धमकी दिली जात आहे. महावितरण कंपनीने अन्यायकारक वसुली तातडीने न थांबविल्यास दि. २० नोव्हेंबरपासून कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.