मटका जुगारप्रकरणी पाटण तालुक्यातील दोघे हद्दपार
मटका जुगारप्रकरणी पाटण तालुक्यातील तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे. मंगेश हिंदुराव देवकांत (वय 38, रा.मल्हारपेठ), दिपक शंकर कांबळे (वय 54, रा.पाटण) व कृष्णत हरी भिसे (वय 60 रा.नवारस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
मल्हारपेठ येथे महादेव मंदिरातील कळसावर वीज कोसळली
मारूल हवेली: मल्हारपेठ (ता. पाटण) येथे रविवार दि. 24 रोजी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात महादेव मंदिरातील कळसावर वीज पडल्याने एका पुजार्‍याला विजेचा धक्का लागून तो बेशुध्द पडला. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. तर चार युवकानांही धक्का बसून ते बाजूला फेकले गेले. तसेच कळसावरील व मंदिरातील विद्युत साहित्याला फटका बसला. विजेमुळे मल्हारपेठ मधील अनेक ठिकाणी विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाटण तालुक्यातील चिटेघर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनापेक्षा रोख रक्कम देण्यासाठी उपोषण
सातारा : विकास करत असताना अनेक भूमीपुत्रांना आपल्या वडिलेापार्जीत जमीनी द्याव्या लागतात. त्याचा शासनाकडून मोबदलाही दिला जात होता. परंतु, अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांची परवड झाली आहे. त्यामुळे आता पुनर्वसनापेक्षाही रोख रक्कम देण्यासाठी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त उपोषण करु लागले आहेत. या नव्या मागण्यामुळे प्रकल्पग्रस्त
मोरगिरीत स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला
सातारा: पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील मोरगिरी येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णास कर्‍हाड येथी सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोयना धरणातील पाण्याचे ओटीभरण संपन्न
सणबूर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणातील पाण्याचे ओटीभरण तसेच पूजन बुधवारी करण्यात आले. पाटणचे आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता व्ही. जी. नारकर, कार्यकारी अभियंता डी. ए. बागडे यांची उपस्थिती होती.
पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नका - डॉ. भारत पाटणकर
ढेबेवाडी : वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित 24 ऑगस्टची बैठक जिल्हा प्रशासनाने आठवडाभर पुढे ढकलल्याने धरणग्रस्तांचा अपेक्षाभंग झाल्याची खंत व्यक्त करून प्रशासनाच्या या निर्णयाबाबत श्रमिक मुक्तीदलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी नाराजीही व्यक्त केली आहे . मात्र आता किमान 31 ऑगस्ट या दिलेल्या तारखेत बदल करू नये व आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भूकंपामुळे पाटण तालुक्यातील 10 घरांना तडे
चाफळ : शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या सौम्य भूकंपानंतर मसुगडेवाडी, पाडळोशी, पवारवाडी, खराडेवाडी (ता. पाटण) येथील दहा घरांना तडे गेले आहेत. त्याचबरोबर मसुगडेवाडीवर डोंगराचा कडा कोसळण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालकाचा ताबा सुटून कारचा अपघात
मानेगाव : पाटण नजीक गाडगौंड येथे धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून इंडीगो कारचा अपघात झाला. यामधील जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखण्यात दाखल करण्यात आले आहे.
कोयनेतून 11 हजार 792 क्युसेक विसर्ग सुरू
सातारा: कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.
कोयना धरणात 79 टक्के पाणीसाठा
सातारा: सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये एकूण 79.14 टक्के म्हणजेच 2358.518 दलघमी पाणी साठा झाला आहे. कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून 9 हजार 626 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 2 हजार 166 क्यूसेक या प्रमाणे एकूण 11 हजार 792 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.
कोयना धरणाखालील भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
सातारा: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे व सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरु आहे. कोयना जलाशय पाणी पातळी 2240.367 दलघमी असून जलाशयामध्ये 79 टि.एम.सी. एवढा एकूण पाणीसाठा झालेला आहे.
कोयना धरणात २४ तासांत ४ टीएमसीने वाढ
सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत दमदार पाऊस सुरू असून, गेल्या २४ तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणात आता ५२.३६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. एकूण १०५.२५ टीएमसी क्षमतेचे हे धरण निम्मे भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांत मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
कोयना धरण क्षेत्रात संततधार; पाणीसाठा 48.36 टीएमसी
पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता गेल्या चोवीस तासांत धरणातील
कोयना धरणातील नौका विहाराबाबत लवकरच निर्णय - ना. केसरकर
कोयनानगर: कोयना परिसर देखणा व निसर्गरम्य असून या परिसराच्या प्रेमात कुणीही पडावे असे हे ठिकाण आहे. या परिसराने आपल्यावर मोहिनी घातली असून मी सुध्दा या परिसराच्या प्रेमात पडलो असल्याचे भावोद्गार गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोयनानगर येथे काढले. दरम्यान, गेली अनेक वर्षे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बंद असलेल्या नौका विहाराबाबत आपण सर्वच तांत्रिक बाबीचा विचार करून एक महिन्यात याबाबत निर्णय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीसांसाठी राज्यात 35 हजार घरे बांधणार- दिपक केसरकर
सातारा:पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी व उंचावण्यासाठी राज्यात 35 हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे, अशी माहिती गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली.
वीज वितरणच्या कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी
पाटण: पावसाळय़ाला सुरूवात होत असल्याने पाटण तालुक्यातील वीजवाहक तारांचे गंजलेले पोल वीज वितरण कंपनीने तातडीने बदलणे आवश्यक आहे. मात्र यासाठी वारंवार मागणी करूनही वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांकडून करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती उज्ज्वला
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान; पुणे विभागात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी प्रथम
पुणे‍: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2016-17 साठी पुणे विभागात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडीने (ता.पाटण) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकविला तर पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) ग्रामपंचायतीने व्दितीय तर सांगली जिल्ह्यातील अलकुड (एम) (ता. कवठेमहांकाळ) या ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकविला. त्याचबरोबर विभागा
कोयना धरणातील टप्पा 4 ची वीजनिर्मिती बंद
सातारा: कोयना धरणातील पाणी कृष्णा पाणी तंटा लवादाप्रमाणे पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी 1 जून ते 31 मे या कालावधीत 67.50 टीएमसी एवढेच पाणी वळविण्याचे बंधन असल्याने एप्रिल 2017 अखेर महाजनको यांनी 67.25 टीएमसी पाणी वापरले असून उर्वरित 0.25 टीएमसी पाणी माहे मे 2017 मध्ये वापरण्याच्या दृष्टीने महाजनको अलोरे यांनी नियोजन केले आहे. त्याप्रमाणे टप्पा 4 ची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.
दौलत कृषी औद्योगिक प्रदर्शनात लाखोंची उलाढाल
ढेबेवाडी: राज्यशासनाचा कृषी विभाग व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दौलतनगर ता. पाटण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दौलत व कृषी औद्योगिक प्रदर्शनाची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. या प्रदर्शनास पाटण तालुक्यातील शेतकर्‍यांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने तीन दिवसात लाखो
वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने जमिनीचे वाटप करावे - विजय शिवतारे
सातारा जिल्ह्यात वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासकीय नियमानुसार जमिनींचे वाटप तातडीने करण्याचे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.