बारावीचा पेपर देऊन परतणारा युवक अपघातात ठार
बारावीचा मराठीचा पेपर देऊन घरी परत जात असताना मोटारसायकलला अपघात होऊन मोरेवाडी (ता. पाटण) येथील युवक ठार झाला. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रथमेश परशराम पाटील (रा. मोरेवाडी पाटील वस्ती, कुठरे, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे.
पाटण तालुक्यात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून; संशयित ताब्यात
पाटण तालुक्यातील येराड गावात प्रेम प्रकरणातून एका युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून व्हेलेंटाईन डे दिवशीच हा प्रकार घडल्यामुळे पाटण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
कोयनेतून ७१२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी
गतवर्षीपेक्षा यावर्षी कोयना धरणात तब्बल 18 टी. एम. सि. पाणीसाठा जास्त शिल्लक आहे ही निश्‍चितच समाधानाची बाब आहे मात्र त्याचवेळी गतवर्षीपेक्षा जानेवारी अखेर येथे तब्बल 712 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे. मुबलक पाणीसाठा असतानाही कमी केलेल्या वीजनिर्मितीमुळे शासनाचा अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला आहे. येणार्‍या महत्त्वपूर्ण चार महिन्यांत हा महसूल भरून काढण्यासाठी प्रशासकीय सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे.
कोयनेत ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप
कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी ७. ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ३. २ इतकी असल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली.
कोयना धरणग्रस्तांचा पुनर्वसनासाठी एल्गार साताऱ्यात मोर्चा
कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे ५८ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. कोयना धरणग्रस्तांची प्रदीर्घ ससेहोलपट थांबवून त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम तातडीने आखून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयना धरणग्रस्तांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
चाफळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाफळ ग्रामपंचायत या माझ्या मायभूमीत जयंती साजरी करण्यात येत आहे हे माझे भाग्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ शिवसैनिक व गावचे सुपुत्र विजयसिह पाटील यांनी चाफळ ता पाटण येथे केले.
कोयनेत सौम्य भूकंप
महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी भूूकंपाचा सौम्य धक्का बसला.
राष्ट्रवादीच्या रथात अनेक महारथी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.
पंचनामे करूनही वीजवितरणकडून कागदपत्रांची मागणी
वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करूनही शेतकºयांना अनुदान देण्यासाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याची माहिती सदस्या सुभ्रदा शिरवाडकर यांनी दिली. लोकांना अनुदान मिळवून देण्यासाठी वीजवितरणने तत्काळ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत, अशी मागणी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केली. तर सर्व सदस्यांनी वीजवितरणच्या अधिकाºयांवर ताशेरे ओढले.पाटण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मासिक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती उज्ज्वला जाधव होत्या. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोयना धरणाजवळ 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप
कोयना धरण परिसरात व पाटण, कराड व चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणी जाणवलेला 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप मंगळवारी दुपारी 1 वाजून पाच मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 22. 4 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात जावळे गावच्या दक्षिणेला चार कि. मी. वर होता. त्याची खोली 9 कि. मी. अंतरावर होती. पाटण, कराड, चिपळूण, अलोरे, कोयना या विभागात हा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली.
मटका जुगारप्रकरणी पाटण तालुक्यातील दोघे हद्दपार
मटका जुगारप्रकरणी पाटण तालुक्यातील तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे. मंगेश हिंदुराव देवकांत (वय 38, रा.मल्हारपेठ), दिपक शंकर कांबळे (वय 54, रा.पाटण) व कृष्णत हरी भिसे (वय 60 रा.नवारस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
मल्हारपेठ येथे महादेव मंदिरातील कळसावर वीज कोसळली
मारूल हवेली: मल्हारपेठ (ता. पाटण) येथे रविवार दि. 24 रोजी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात महादेव मंदिरातील कळसावर वीज पडल्याने एका पुजार्‍याला विजेचा धक्का लागून तो बेशुध्द पडला. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. तर चार युवकानांही धक्का बसून ते बाजूला फेकले गेले. तसेच कळसावरील व मंदिरातील विद्युत साहित्याला फटका बसला. विजेमुळे मल्हारपेठ मधील अनेक ठिकाणी विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाटण तालुक्यातील चिटेघर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनापेक्षा रोख रक्कम देण्यासाठी उपोषण
सातारा : विकास करत असताना अनेक भूमीपुत्रांना आपल्या वडिलेापार्जीत जमीनी द्याव्या लागतात. त्याचा शासनाकडून मोबदलाही दिला जात होता. परंतु, अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांची परवड झाली आहे. त्यामुळे आता पुनर्वसनापेक्षाही रोख रक्कम देण्यासाठी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त उपोषण करु लागले आहेत. या नव्या मागण्यामुळे प्रकल्पग्रस्त
मोरगिरीत स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला
सातारा: पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील मोरगिरी येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णास कर्‍हाड येथी सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोयना धरणातील पाण्याचे ओटीभरण संपन्न
सणबूर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणातील पाण्याचे ओटीभरण तसेच पूजन बुधवारी करण्यात आले. पाटणचे आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता व्ही. जी. नारकर, कार्यकारी अभियंता डी. ए. बागडे यांची उपस्थिती होती.
पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नका - डॉ. भारत पाटणकर
ढेबेवाडी : वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित 24 ऑगस्टची बैठक जिल्हा प्रशासनाने आठवडाभर पुढे ढकलल्याने धरणग्रस्तांचा अपेक्षाभंग झाल्याची खंत व्यक्त करून प्रशासनाच्या या निर्णयाबाबत श्रमिक मुक्तीदलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी नाराजीही व्यक्त केली आहे . मात्र आता किमान 31 ऑगस्ट या दिलेल्या तारखेत बदल करू नये व आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भूकंपामुळे पाटण तालुक्यातील 10 घरांना तडे
चाफळ : शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या सौम्य भूकंपानंतर मसुगडेवाडी, पाडळोशी, पवारवाडी, खराडेवाडी (ता. पाटण) येथील दहा घरांना तडे गेले आहेत. त्याचबरोबर मसुगडेवाडीवर डोंगराचा कडा कोसळण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालकाचा ताबा सुटून कारचा अपघात
मानेगाव : पाटण नजीक गाडगौंड येथे धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून इंडीगो कारचा अपघात झाला. यामधील जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखण्यात दाखल करण्यात आले आहे.
कोयनेतून 11 हजार 792 क्युसेक विसर्ग सुरू
सातारा: कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.
कोयना धरणात 79 टक्के पाणीसाठा
सातारा: सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये एकूण 79.14 टक्के म्हणजेच 2358.518 दलघमी पाणी साठा झाला आहे. कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून 9 हजार 626 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 2 हजार 166 क्यूसेक या प्रमाणे एकूण 11 हजार 792 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.