दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद; मेढा पोलीस ठाण्याची कारवाई
महाबळेश्‍वर येथे साखरेची पोती भरलेल्या ट्रकची ताडपत्री कापून साखर चोरी करणारी टोळी छोटा हत्ती या चारचाकी वाहनातून मेढ्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी केळघर येथील घाटामध्ये सापळा रचला होता. यावेळी त्यांनी साखरेची पोती चोरणार्‍या चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
महाबळेश्वर येथील अंतर्गत वाहतुकीत बदल
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (1) (ब) प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाबळेश्वर शहरातील रस्त्यावरील वाहतुकीसंबंधीचे आदेश दि. 10 ते 14 फेब्रुवारी 2018 पर्यंत जारी केले आहेत. त्यानुसार लिंगमळा फाटा ते लिंगमळा धबधबा ते भेकवली फाटा-वन वे (एकेरी वाहतूक) तसेच भेकवली फाटा ते खालचा लिंगमळा सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी (नो एंट्री) राहील. विमल गार्डन ते नगरपालिका रोड मार्ग दि महाबळेश्वर क्ल वन वे (एकेरी वाहतूक) राहील. दि महाबळेश्वर क्लब ते नगरपालिका रोड मार्ग विमल गार्डन सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी राहील
एस.टी. महामंडळाच्या महाबळेश्वर आगारातील ‘शिवशाही' महाबळेश्वर-पुणे’ बस सेवेचा शानदार शुभारंभ
'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी विविध सुखकर सेवा सुविधा देण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वर हून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्यावरून महाबळेश्वरला येणाऱ्या प्रवाशी पर्यटकांसाठी नुकतीच ‘शिवशाही' महाबळेश्वर - पुणे’ बस सेवा सुरु झाली असून
व्हॉट्सअ‍ॅपवर धार्मिक भावना दुखावल्याने एकास अटक
सातारा : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हेमंत कृष्णा खामकर (वय 30, रा. महाबळेश्‍वर) या युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून, सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांवर आयटी अ‍ॅक्ट व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
वेण्णा लेकमध्ये बुडून एकाचा मृत्यू
महाबळेश्‍वर : येथील प्रसिद्ध मधुसागर या संस्थेचे संचालक व महाबळेश्‍वर नगरपालिकेचेे निवृत्त कर्मचारी शंकर लक्ष्मण शिंदे (वय 60, रा. कोळी आळी, महाबळेश्‍वर) यांचा वेण्णा लेकच्या तलावाच्या मागील बाजूस असलेल्या हनुमान मंदिर परिसरात बुडून मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे ते हनुमान मंदिरामध्ये पूजेसाठी आले होते. वेण्णा लेक तलावात पोहण्यासाठी उतरले असता ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.
हरित लवादाचा निर्णय झुगारुन महाबळेश्‍वरात 150 झाडांची कत्तल ; महाबळेश्‍वरमधील पर्यावरण र्‍हासाच्या मार्गावर
ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट, पुणे (हरित लवाद) चा आदेश झुगारुन महाबळेश्‍वर येथील 70/2 या गट नंबरमधील तब्बल 150 झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण महाबळेश्‍वरच ग्रीन झोनमध्ये येते. येथे बांधकाम करण्यासाठीही मोठ्या परवानग्यांच्या दिव्यातून जावे लागते. झाडांच्या तोडीबाबत अतिशय कडक नियम असतानाही महाबळेश्‍वर नगरपरिषद आणि महसूल विभाग यांना अंधारात ठेवून मुंबई आणि पुणे येथील बड्या धेंडांनी त्यांच्या बांधकामासाठी तब्बल 150 झाडांची कत्तल केली आहे.
पाईनवूड्‌स कॉलेजमधील अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत संबंधितांवर कारवाईची मागणी
सातारा : पाईनवूड्‌स इंटरनॅशनल स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी, ता. महाबळेश्‍वर या कॉलेजमधील अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक लिपारे यांनी पांचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांच्याकडे केली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजी यांचे निधन
सातारा : सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी (वय 98) यांचे वृध्दापकाळाने भिलार (ता.महाबळेश्वर) येथे पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
म’श्‍वर ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांची भेट
महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींमुळे आरोग्यमंत्री ना. दीपक सावंत यांनी मंगळवारी भर पावसात ग्रामीण रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रूग्णालयातील दूरवस्था व गैरसोयींबाबत पाहणी केली. येथील गैरसोयी दूर करण्यासाठी ना. सावंत यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीकांत भोई यांच्या उपस्थितीत त्याच ठिकाणी बैठक घेऊन सूचना केल्या.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
महाबळेश्वर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी महाबळेश्वरपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भेकवली लिंगमळा रस्त्यावर घडली. रामचंद्र हणमंत रुईघरे (३२, रा बालेघर, ता. वाई) मृत तरुणाचे नाव आहे.
म’श्‍वरमध्ये आपत्कालीन व्यवस्थेचे धिंडवडे
महाबळेश्‍वर : गेल्या आठवड्यात वळवाच्या पावसाने महाबळेश्‍वरला झोडपून काढले होते. संपूर्ण तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. घरावरील पत्रे उडाले, झाडे व विद्युत पोल उन्मळून पडले. विद्युत पोल पडल्याने दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होता तर वळवाच्या पावसानंतरही पाणी पुरवठाही विस्कळीत झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या घटना झाल्यानंतर तत्काळ प्रशासनाने कार्यवाही करणे आवश्यक असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या घटना गंभीर असताना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थेचे धिंडवडे निघाले.
महाबळेश्‍वर पोलीस वसाहतीचे काम युध्दपातळीवर सुरू
महाबळेश्‍वर: कोल्हापूर विभागाचे पोलीस प्रमुख विश्‍वास नांगरे पाटील यांच्या महाबळेश्‍वर भेटीनंतर महाबळेश्‍वरातील रखडलेले पोलीस वसाहतीचे काम आता युध्द पातळीवर सुरु झाले असून पावसाळ्याच्या आधी वसाहतीच्या पहिल्या टप्प्यांमधील १२ खोल्यांचे आर.सी.सी. काम पूर्ण होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. सा. बां. खात्याकडून सध्या सुरु असलेल्या युद्ध पातळीच्या कामामुळे महाबळेश्‍वर पोलीस ठाण्याचा कर्मचारी थोडा सुखावल्याचे चित्र येथे पहावयास मिळत
देशातील पहिल्या पुस्तकाच्या गावास खा. शरद पवार यांची कुटुंबीयांसमवेत भेट
भिलार : देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळख प्राप्‍त झालेल्या भिलार या गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कुटुंबीयांसमवेत भेट दिली. गावातील घराघरांत सजलेल्या दिवाणखान्यांमध्ये सजवून ठेवलेली पुस्तके चाळण्याचा मोह खा. पवार यांना आवरता आला नाही. तब्बल तासभर शरद पवार भिलारमध्ये पुस्तकवेडे बनून राहिले. ‘शिवचरित्र’, ‘एक भाकरी चुलीवरची’, ‘वपूर्झा’ अशा पुस्तकांची लज्जत शरद पवार यांनी स्ट्रॉबेरीप्रमाणेच चाखली. विशेषत म्हणजे स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे यांच्या कुटुंबाशी त्यांनी आपल्या कुटुंबाची ओळख करुन दिली.
पुस्तकाचे गाव ‘भिलार’ने देशात इतिहास रचला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. आता पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार असून, भिलार वासियांनी या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. तथापि, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रम घडवून आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाचगणी येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन फित कापून आज झाले. यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत संदेश लिहून पोलीसांना शुभेच्छा दिल्या.
मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानाकडे पाठपुरावा करणार: ना. देवेंद्र फडणवीस
सातारा: मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीशः पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्र देशात पायोनिअर राज्य असेल: सुधीर मुनगंटीवार
सातारा: वन विभागाने ग्रीन आर्मीची संकल्पना मांडली 25 लाख सदस्य केले लवकरच 1 कोटी सदस्य संख्या करुन जगात सर्वात मोठी आर्मी असेल. महाराष्ट्र देशात पायोनिअर असेल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरातील तापमान मुंबईपेक्षाही जास्त
महाबळेश्वर : यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान हे आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे.
महाबळेश्‍वर तहसिल कार्यालयातील लिपीक 'एसीबी'च्या जाळ्यात
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत अधिग्रहण केलेल्या वाहनांचे बिल काढण्याकरता १५ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी महाबळेश्‍वर येथील तहसिल कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अमोल अशोक सलागरे वय ४०, रा. ४१७, मरे पेठ, महाबळेश्‍वर याला सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी रंगेहात पकडले.
राजकारणासाठी युगपुरुषांच्या नावाचा वापर करणाऱ्या नेत्यांबद्दल महाबळेश्वरकरांचा संताप अनावर
सातारा - छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तर घट्नाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा हक्क दिला या युग पुरुषांच्या नावचा वापर महाबळेश्वर येथील स्थानिक नेते वाहानतळाच्या नामकरनावरून करत आहेत त्यामुळे महाबळेश्वरकारांचा संताप अनावर झाला आहे

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.