विद्युत मोटारी चोरणारी टोळी गजाआड
दहिवडी : मलवडी व परिसरातील विद्युत मोटारी चोरणारे रॅकेट दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणले असून पाचजणांना गजाआड केले. या टोळीकडून सहा विद्युत पंप व 2 मोटारसायकल असा 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सर्व संशयीतांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, चोरीचे रॅकेट सापडल्यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वृक्ष माझा सखा उपक्रम जिल्ह्यात राबवावा
म्हसवड : विद्यार्थ्यांमध्ये झाडांबद्दल मित्रत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वृक्ष माझा सखा हा उपक्रम माण तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हाभर राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विद्युत मोटारी चोरणारी टोळी अखेर गजाआड
म्हसवड : म्हसवडसह जांभुळणी, पुळकोटी परिसरातील अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी चोरून धुमाकूळ घालणार्‍या पाच जणांच्या टोळीला म्हसवड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 52 हजारांच्या तीन विद्युत मोटारी हस्तगत केल्या असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कीटकनाशक तोडांवर उडाल्याने एकजण अत्यवस्थ
सातारा: माण तालुक्यातील किरकसाल येथे कीटकनाशक तांेडावर उडाल्याने एकाला उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक
आटपाडी-मुंबई बस माणगंगा पुलावरून कोसळली
सातारा: आटपाडीहून मुंबईकडे निघालेली बस दहिवडी (ता. माण जि. सातारा ) नजीक माणगंगा पुलावरून सुमारे वीस फूट खाली कोसळली. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
‘जीएसटी’च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून लूट
म्हसवड : केंद्र सरकारने जीएसटी करप्रणाली अंमलात आणली तरी सर्वसामान्यांना याची पूर्णपणे माहिती नसल्याने अनेक व्यापारी ग्राहकांची लूट करत आहेत. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकार
अवैध दारू विक्री प्रकरणी दोघांना अटक
म्हसवड : म्हसवड व पळसावडे (ता. माण) येथे बेकायदा बिगरपरवाना दारू विक्री म्हसवड पोलिसांनी दोघांना अटक करून सुमारे 20 वीस हजारांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
म्हसवड : म्हसवड-माळशिरस रस्त्यावर मासाळवाडी फाट्याजवळ बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने लग्नकार्य उरकून घराकडे दुचाकीवरून निघालेले वरकुटे, ता. माण येथील बाळासाहेब माने (वय 52) जागीच ठार झाले, तर नवनाथ काळेल हे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोने तीन पलट्या खाल्ल्याने जीपमधील चौघे जण जखमी
पवारांच्या गाडीत चक्क आ. जयकुमार गोरे ...!
खटाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी चक्क एकाच गाडीतून फेरफटका मारल्याने जिल्हा राष्ट्रवादीसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेली दहा वर्षे राष्ट्रवादीला अंगावर घेणार्‍या आ. जयकुमार गोरेंशी खा. शरद पवार यांनी गाडीत गुफ्तगू साधले . शरद पवारांनी गेल्या दोन दिवसांत सातारा जिल्ह्यात एकीकडे टोमणे आणि दुसरीकडे गुदगुल्यांचे राजकारण केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
माण-खटावसाठी 1 कोटीचा निधी : खा. पवार
दहिवडी : माण तालुक्यातील बिदालच्या ग्रामस्थांची श्रमदानाची तयारी व एकी पाहून गावातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. तसेच कायमस्वरूपी दुष्काळी असणार्‍या माण-खटावच्या कामांसाठी एक
बिदालवासीयांच्या श्रमदानाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
दहिवडी : माण तालुक्यातील बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्यासाठी व गाव पाणीदार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हातात घेतली आहेत. रविवारी सुमारे 2,475 गावकर्‍यांनी श्रमदान करत नवा इतिहास घडवला असून, एका दिवसात तब्बल 210 लूज बोल्डर (छोटे बंधारे) श्रमदानातून बांधले आहेत. या विक्रमाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद झाली आहे.
तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होणार
म्हसवड: म्हसवड शहरात गत २७ वर्षापासून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जात असून यानिमित्त शहरात विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाचे मोठे कार्यक्रमासह साहसी खेळाचे प्रदर्शन दाखवण्याची येथील परंपरा असून येथील शिवजयंती महोत्सव हा ३ दिवस चालत असल्याने हा महोत्सव पाहण्यासाठी शहरात यात्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. यंदाही त्याच पध्दतीने हा महोत्सव प्रथेनुसार अक्षयतृतीयेला साजरा करणार असल्याची माहिती शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक गणोश रसाळ यांनी दिली.
उरमोडीचे पाणी माणगंगा नदीत सोडण्याची मागणी
सातारा: माण तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत तत्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ
धनादेश न वटल्याने महिला पोलिसास एक महिन्याचा कारावास
बिजवडी: हातउसणो पैसे घेतल्याच्या बदल्यात ते पैसे परतफेड करण्यासाठी दहिवडी, ता. माण येथील महिला पोलीस कर्मचार्‍याने फिर्यादी बबन बोराटे यांना दिलेला चेक बाउन्स झाल्याप्रकरणी
दहिवडी पोलिसांचे दारू, जुगार अड्डय़ावर छापे
बिजवडी: माण तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू व जुगारअड्डयावर दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी छापे टाकून
तहसीलदारांच्या वाहनाला वाळूच्या ट्रॅक्टरची धडक
म्हसवड: माण तालुक्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाधववाडी, ता. माण येथे माण तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा माने गेल्या होत्या. त्यादरम्यान वाळू खाली करुन आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या वाहनाला ठोकर दिली. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलिसांत दाखल झाली आहे.
वाळू चोरट्यांकडून जप्त केलेली वाळू गायब
म्हसवड : विना परवाना रात्री अपरात्री माण गंगा नदी पाञातील वाळूची चोरटी तस्करी करणाऱ्या वाळू चोरट्यावर जरब बसवण्यासाठी म्हसवड तलाठी व सर्कल आणि म्हसवड
मोही येथील अपघातात दुचाकीस्वार ठार
दहिवडी: मोही (ता. माण) येथून शिंगणापूरकडे चाललेल्या मोटरसायकलस्वारास ट्रकने (क्र. एमएच ११ - एएल 00१९) धडक दिल्याने दिनकर तातू मोटे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला आहे.
कोतवालाच्या अंगावर वाळूचा ट्रक घालण्याचा प्रयत्न
दहिवडी: पळशी (ता. माण) येथील माणगंगा नदीमधून वाळूची तस्करी करुन वाळू भरलेला ट्रक
बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार: शिवाजीराव चव्हाण
​म्हसवड - येथील एस टी महामंडळाच्या बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु व्हावे व प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.