वावरहिर्‍यात युवकासह कुटूंबास बेदम मारहाण; 16 जणांविरोधात ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
वावरहिरे, ता. माण येथील एका मोबाईल दुकान चालकास जुना राग मनात धरुन तेथील 16 जणांनी घरी जावून बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यास आलेल्या त्या युवकाच्या वयोवृद्ध आजीसह कुटूंबियांसही बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे.
केस मागे घेण्यासाठी महिलेस विषारी द्रव पाजले; दहिवडी येथील घटना
दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी वडूज येथील पेडगाव रोडवरुन महिलेचे अपहरण करत जबरदस्तीने विषारी द्रव पाजल्याप्रकरणी गोंदवले येथील पाचजणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून कार्यक्रम
माण तालुक्याचे सुपुत्र व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा ६० व वाढदिवस शुक्रवारी साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त विविध कार्यकाम आयोजन केल्याची माहिती माणदेश फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सुनील बाबर यांनी दिली .
चोरट्याचा सरस्वती पसंस्थेवर दरोड्याचा प्रयत्न; लोधवडे येथील घटना
लोधवडे ता. माण येथे रविवारी मध्य रात्री अज्ञात चोरट्यानी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला. या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र पतसंस्थेच्या मागील बाजूने श्वान फिरून जागेवरच घुटमळत होत दरोडा यशस्वी होत नसल्यानं दरोडेखोर आपले साहित्य तिथे टाकून पळाले .
सोकासन अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी
सोकासन ता.माण येथील अत्याचार व अँट्रासिटी गुन्ह्यामधील फरार संशयित आरोपी संदीप प्रकाश वीरकर (वय २४) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अत्याचार प्रकरणातील पलायन केलेला संशयित आरोपी संदीप वीरकर याला दहिवडी पोलिसांनी मुंबईतून पकडून आणून अटक केली. त्याला या प्रकरणात मदत करणारी महिला अजून फरार आहे.
कोतवालाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या सहा वाळू माफियांवर गुन्हा
चोरटी वाळू घेवून झरे (आटपाडी ) निघालेल्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला याचा राग धरत वावरहिरे येथील कोतवाल कृष्णदेव दत्तात्रय गुजर वय ३४ यांना रविवारी जबर मारहाण करून पसार झालेल्या सहा वाळू माफियांवर शासकीय कामात अडथळा, विनापरवाना वाळूचे उत्खनन करून ,जिवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे म्हसवड पोलिसात दाखल झाले असून याचा तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
जिल्ह्यात वाळू माफियांचा धिंगाणा संपता संपेना ; अपहरण करून कोतवालास बेदम मारहाण
काल खटाव तालुक्यातील वर्धनगडनजीक तलाठ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न माण तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने केला होता ही घटना ताजी असतानाच आज वाळू माफियांनी कहर करत वाळू उपशावर कारवाई का करतो? असे म्हणून विरकरवाडी ता.माण येथे वाळू माफियांनी कोतवाल याला बेदम मारहाण करुन त्याचे अपहरण करुन सांगली जिल्ह्यात नेल्याने खळबळ उडाली. घडलेल्या घटनेची तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली असून जखमी कोतवालावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, म्हसवड पोलिसांनी जखमीचा जबाब घेतला असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
संतप्त नागरिकांनी म्हसवड पालिकेसमोर कचरा टाकला
म्हसवड : डॉ. आंबेडकरनगर येथील कचर्‍याची विल्हेवाट वेळेत न लावल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी कचरा उचलून थेट म्हसवड पालिकेसमोर टाकून चांगलाच धडा शिकवला.
दहिवडी येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ शाखेला आग
दहिवडी : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या दहिवडी शाखेत बुधवारी रात्री आग लागून कागदपत्रे आणि काल आलेले नवे संगणक व स्ट्रॉंग रूममधील साहित्य जळून खाक झाले.
माणचे कृषी अधिकारी राजेश जानकर निलंबित
सातारा : माण तालुक्यात जलयुक्‍त शिवार योजनेतून केलेल्या कामात चुकीच्या पद्धतीने काढलेले टेंडर तसेच कोकणात जलसंधारणाच्या कामात केलेल्या चुकीच्या कामांमुळे माणचे तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत राज्य शासनाने त्यांच्या निलंबनाचे सोमवारी आदेश काढले आहेत. मात्र, जानकरांवरील कारवार्ईसंदर्भातील कोणतेही पत्र मिळाले नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालयातून देण्यात आली.
विद्युत मोटारी चोरणारी टोळी गजाआड
दहिवडी : मलवडी व परिसरातील विद्युत मोटारी चोरणारे रॅकेट दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणले असून पाचजणांना गजाआड केले. या टोळीकडून सहा विद्युत पंप व 2 मोटारसायकल असा 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सर्व संशयीतांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, चोरीचे रॅकेट सापडल्यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वृक्ष माझा सखा उपक्रम जिल्ह्यात राबवावा
म्हसवड : विद्यार्थ्यांमध्ये झाडांबद्दल मित्रत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वृक्ष माझा सखा हा उपक्रम माण तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हाभर राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विद्युत मोटारी चोरणारी टोळी अखेर गजाआड
म्हसवड : म्हसवडसह जांभुळणी, पुळकोटी परिसरातील अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी चोरून धुमाकूळ घालणार्‍या पाच जणांच्या टोळीला म्हसवड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 52 हजारांच्या तीन विद्युत मोटारी हस्तगत केल्या असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कीटकनाशक तोडांवर उडाल्याने एकजण अत्यवस्थ
सातारा: माण तालुक्यातील किरकसाल येथे कीटकनाशक तांेडावर उडाल्याने एकाला उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक
आटपाडी-मुंबई बस माणगंगा पुलावरून कोसळली
सातारा: आटपाडीहून मुंबईकडे निघालेली बस दहिवडी (ता. माण जि. सातारा ) नजीक माणगंगा पुलावरून सुमारे वीस फूट खाली कोसळली. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
‘जीएसटी’च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून लूट
म्हसवड : केंद्र सरकारने जीएसटी करप्रणाली अंमलात आणली तरी सर्वसामान्यांना याची पूर्णपणे माहिती नसल्याने अनेक व्यापारी ग्राहकांची लूट करत आहेत. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकार
अवैध दारू विक्री प्रकरणी दोघांना अटक
म्हसवड : म्हसवड व पळसावडे (ता. माण) येथे बेकायदा बिगरपरवाना दारू विक्री म्हसवड पोलिसांनी दोघांना अटक करून सुमारे 20 वीस हजारांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
म्हसवड : म्हसवड-माळशिरस रस्त्यावर मासाळवाडी फाट्याजवळ बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने लग्नकार्य उरकून घराकडे दुचाकीवरून निघालेले वरकुटे, ता. माण येथील बाळासाहेब माने (वय 52) जागीच ठार झाले, तर नवनाथ काळेल हे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोने तीन पलट्या खाल्ल्याने जीपमधील चौघे जण जखमी
पवारांच्या गाडीत चक्क आ. जयकुमार गोरे ...!
खटाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी चक्क एकाच गाडीतून फेरफटका मारल्याने जिल्हा राष्ट्रवादीसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेली दहा वर्षे राष्ट्रवादीला अंगावर घेणार्‍या आ. जयकुमार गोरेंशी खा. शरद पवार यांनी गाडीत गुफ्तगू साधले . शरद पवारांनी गेल्या दोन दिवसांत सातारा जिल्ह्यात एकीकडे टोमणे आणि दुसरीकडे गुदगुल्यांचे राजकारण केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
माण-खटावसाठी 1 कोटीचा निधी : खा. पवार
दहिवडी : माण तालुक्यातील बिदालच्या ग्रामस्थांची श्रमदानाची तयारी व एकी पाहून गावातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. तसेच कायमस्वरूपी दुष्काळी असणार्‍या माण-खटावच्या कामांसाठी एक

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.