हिवरे व जांबखुर्दचे ग्रामसेवक टेंबरे यांची बदली
कोरेगाव : वादग्रस्त ग्रामसेवक अंकुश टेंबरे यांची हिवरे व जांबखुर्द या गावांतून बदली झाली आहे. कोरेगावच्या गट विकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी टेंबरे यांची बदली चिलेवाडी गावात केली. त्यानंतर दत्‍ता सुतार यांनी मंगळवारी दुपारी हिवरे ग्रामसेवकपदाची सूत्रे हातात घेतली. ग्रामसेविका कुचेकर यांची जांब खुर्दला नियुक्‍ती करण्यात आली.
शंभू बर्गे खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक
कोरेगाव : शंभू बर्गे खूनप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी समीर सूरज बागवान व अमर उर्फ श्रीरंग संजय घाडगे दोघे रा. कोरेगाव यांना बुधवारी अटक केली. त्यांच्यासह एकूण सहा संशयितांना दि. 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
भाजपचे सरकार हे शेतकर्‍यांचेच: चंद्रकांतदादा पाटील
सातारा : ३४ हजार कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी करुन शेतकर्‍यांना तारणारे भाजप सरकार हे फक्त शेतकर्‍यांच्याच हिताचे आहे. येणार्‍या काळातही शेतकर्‍यांसाठी जे जे करावे लागेल ते ते करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन महसूल व बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटी ल यांनी जळगांव, ता. कोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात केले.
कोरेगावात एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू
कोरेगाव : आंबेडकरनगर, कोरेगाव येथील शिवनाथ एकनाथ येवले (वय 48) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. कोरेगावात सर्दी-पडसे, खोकल्याचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या माध्यमातून तत्काळ खर्‍या अर्थाने जनजागृती मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरेगावात कडकडीत बंद; रास्ता रोको
कोरेगाव : कोरेगाव येथील शंभू बर्गे या युवकाच्या खुनाचे पडसाद दुसर्‍या दिवशीही उमटले. या खून प्रकरणात सहभागी असणार्‍या राजकीय प्रतिष्ठितांना तत्काळ अटक व्हावी, या मागणीसह घटनेतील राजकीय प्रवृत्तींना पाठीशी घालणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवारी कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही झाला. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण राहिले. दरम्यान, खूनप्रकरणी एका अल्पवयीन
तीन वर्षांत केंद्र सरकारकडून साहसी निर्णय - ना. चरेगावकर
पिंपोडे बुद्रुक : गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने अनेक साहसी निर्णय घेत विकासाला गती दिली आहे. कुठेही घोटाळा होऊ दिला नाही. पारदर्शक सरकार देऊन भ्रष्टाचार, काळे धन याबाबत धडक निर्णय घेतले. तसेच राजकीय नफा तोटा न पाहता नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले. वेस्टर्न कोलफिल्ड
कुमठे येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
कोरेगाव : कुमठे (ता. कोरेगाव) येथे कर्जबाजारीपणामुळे संतोष हरिश्‍चंद्र रोमण (वय ३०) या शेतकर्‍याने दि. २३ रोजी दुपारी मोहनबाग नावच्या शिवारातील बाभळीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दारुधंद्यांविरोधात कोरेगावात रास्ता रोको
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील एकंबे रस्ता परिसरामध्ये दारु विक्री दुकाने व बीअरवार यांना परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांसह शेकडो रणरागिणींनी कोरेगाव पंचायत समितीनजीक सातारा - पंढरपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी आता कायमस्वरुपी दारुबंदीसाठी रणशिंग फुंकले असून या आंदोलनाचा वणवा कोरेगावसह संपूर्ण
शिवसैनिकांनी केले वसना योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजन
पिंपोडे बु /: उत्तर कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी येथील वसना जलसिंचन योजनेच्या दुसर्‍या टप्प्या मधून बामणकी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे जलपूजन शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केले.
राष्ट्र कार्य करणऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
सातारा: पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.
इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा: राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासठी धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
‘किसन वीर’ शेतकरी बांधवांचा शाश्‍वत मित्र - तानाजीराव शिंदे
कोरेगाव: चौधरवाडी (ता. कोरेगाव) हे गाव जरी छोटे असले तरी येथे निर्माण होणारा शेतकर्‍यांचा शेतीमाल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलेला आहे. परंतू, पाण्याअभावी शेती उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत आहे. याकामी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले आणि त्यांच्या व्यवस्थापनाने जलसंधारण कामासाठी केलेली मदत आमच्यासाठी मौल्यवान असून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना शेतकरी बांधवांचा शाश्‍वत मित्र असल्याचे प्रतिपादन,
प्रा. डॉ. विष्णुपंत जगताप यांच्या 'अक्षरांजली' स्मरणिकेचा प्रकाशनसोहळा संपन्न
सातारा, दि. १७ (प्रतिनिधी)- प्रा. डॉ. विष्णुपंत जगतापांनी आयुष्यभर समाजपरिवर्तनासाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि ज्ञानप्रसारासाठी बहुमोल कार्य केले. राजकीय वलय असतानाही त्याचा दुरुपयोग न करता स्वतंत्र विचार, स्वतंत्र बाणा जोपासला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे न्यावे. ट्रस्टने शैक्षणिक क्षेत्रात कार्य करुन हुशार परंतु गरजू विद्याथर्यांसाठी दत्तक योजना राबवावी त्यातूनच एकदे विष्णुपंत निर्माण होतील आणि तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
वसंतराव फाळके यांचा वाढदिवस उत्साहात
सातारारोड : येथील सत्यशोधक जो. ब. फाळके-पाटील विकास ट्रस्टचे चेअरमन, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय कामगार संघाचे सल्लागार वसंतराव फाळके यांचा ८१ वा वाढदिवस चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
वसना व वांगणा उपसा सिंचन योजनांचे पाणी आवर्तन सुरु; पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचना
दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने व कोरेगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणव असल्याने वसना व वांगणा उपसा सिंचन योजना तातडीने सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार दि.12 मे पासून या दोन्ही योजना सुरु झाल्या आहेत.
बिचुकल्यात श्रमदान करुन डॉ. राजेश देशमुख यांनी केला वाढदिवस
सातारा: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे ग्रामस्थांच्या बरोबरीने श्रमदान केले.
रुईमध्ये ‘एक धाव पाण्या’साठी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
पळशी : कोरेगाव तालुक्यातील 28 गावांनी पाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, या गावांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. रुई ग्रामस्थांनी पाणी फौंडेशनचा प्रसार व्हावा आणि ग्रामस्थांना श्रमदानाची गोडी लागावी, या हेतूने ‘एक धाव पाण्यासाठी’ म्हणून बुधवारी सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
बक्षीसपत्राद्वारे घेतलेल्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम
सातारा: फसवणूक करून बक्षीसपत्राद्वारे घेतलेल्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील राजाराम विष्णू देशमाने आणि कमल राजाराम देशमाने या दोघांनी केला आहे. याबाबतची माहिती या दोघांनीही मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. ही जागा आम्हाला परत मिळावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही देशमाने यांनी पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी येथील अतिसार रुग्णांची आरोग्य पथकामार्फत तपासणी
सातारा: प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली अंतर्गत मौजे पिंपरी ता. कोरेगाव येथे दि. 30.4.17 पासून अतिसार रुग्णांच्या संख्येत वाढ झालेबाबत. वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा दि. 2.5.17 रोजीचा दुरध्वनी संदेशप्राप्त झाल्यावरुन जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी आरोग्य पथकासह पिंपरी येथे दि. 2.5.17 रोजी प्रत्यक्ष रुग्णांची पहाणी केली असता पिंपरी येथे दि. 30.4.17 रोजी ग्रामयात्रा होती.
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप
सातारा : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार तिचा शारिरिक व मानसिक छळ करुन तिला पोहता येत नाही हे माहिती असूनही तिला चिंचणेर निंब हद्दीतील आरफळ कॅनॉलमध्ये ढकलून

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.