वडूज-कराड रस्त्यावर दुचाकींचा अपघात एक जण जागीच ठार
वडूज-कराड रस्त्यावर शिवाजीनगर येथे दोन दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक बसून एक जण जागीच ठार झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.
हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावर जिवघेणा हल्ला
कातरखटाव : वडूज येथील हवालदार धनजी वायदंडे यांच्यावर काटरखटाव येथे चार युवकांनी कूकरीने वार करून जीवघेणा हल्ला केला . यामध्ये हवलदार वायदंडे जखमी झाले आहेत त्यांच्यावर वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चितळीच्या रणरागिणी दारुबंदीसाठी सरसावल्या
सातारा: खटाव तालुक्यातील चितळी या संवेदनशील गावातील महिलांनी दारुबंदीसाठी जोर लावला असून अनेकांचे संसार उद्धवस्त करणारे दारुचे दुकान गावातून हद्दपार व्हावे या मागणीसाठी चितळीतील रणरागिणी आज जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना भेटल्या. घटस्थापनेदिवशी गावात बाटली आडवी करण्यासाठीचे मतदान व्हावे अशा आशयाचे निवेदनही या महिलांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
वडीच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
औंध : सुट्टीवर आलेला वडी ता. खटाव येथील जवान प्रवीण मधुकर येवले वय 35 वर्षे यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
गणेशोत्सवातील देखाव्याचे अनुकरण करताना गळफास
पुसेसावळी : दुष्काळी खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे सुमित प्रमोद शिंदे या सुमारे 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गणेशोत्सवातील देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून मृत्यू झाला. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हा देखावा सुमितने गणेशोत्सवात पाहिला व घरी येऊन त्याचे अनुकरण करत असताना दुर्दैवाने गळफास लागून त्याला जीवास मुकावे लागले. या हृदयद्रावक घटनेने खटाव तालुक्यात हळहळ व्यक्‍त होत आहे.
चौकीचा आंबा येथील चार दुकानांना आग
औंध : चौकीचा आंबा ता.खटाव येथील चार दुकानांना आज पहाटे पाचच्या अचानक सुमारास लागलेल्या आगीमध्ये सर्व दुकाने जळून खाक झाली असुन यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सुमारे
कर्जमाफीसाठी छप्पन कलमे लावून शेतकर्‍यांची चेष्टा
औंध : शासनामार्फत कर्जमाफी देण्यासाठी वेगळे निकष लावले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणजे शासन आपल्या मागे कर्जमाफीची इडापिडा लावते की काय? अशी भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.
अजय राऊतला पाच दिवसांची पोलिस कोठडी
वडूज : खटाव तालुक्यातील कृषी अनुदान अपहारप्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेल्या कारकून अजय राऊतला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर या प्रकरणातील दुसरा संशयित राकेश नायडूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शेतकरी अनुदान अपहार प्रकरणी सर्कल राऊतला अटक
वडूज : खटाव तालुक्यातील खरिप हंगाम नुकसान शेतकरी अनुदान अपहार प्रकरणी आज वडूज पोलिसांनी सर्कल आणि तत्कालीन कारकून अजय दशरथ राऊत याला अटक केली. या अपहार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आत चार झाली आहे.
शेतकर्‍यांची तहान भागवण्यासाठी ‘मनसे’ने पुसेसावळीत कॅनॉल फोडला
सातारा: खटाव तालुक्यातील पुसेसावळी पंचक्रोशीतील अनेक गावांना ऐन पावसाळ्यातही पाणीपुरवठा होत नसल्याने आणि याप्रश्‍नी शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे संतप्त ग्रामस्थ व शेतकरी तसेच मनसैनिकांनी ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली उरमोडी कॅनॉल फोडून कॅनॉलमधील पाणी पारगाव तलावात सोडून शेतकरी व ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात सोडली गाढवे
खटाव तालुक्यातील खरीप पिक हंगामी निधितील झालेल्या अपहाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणी साठी गेल्या दोन दिवसापासून जनता क्रांती दलाच्या सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली दत्ता केंगार धरणे आंदोलनासाठी बसले आहेत.
उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी वाढीव वीजभाराची जोडणी पूर्ण
खटाव : माण आणि खटाव या कायम दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी वाढीव वीज भार आज जोडला आहे. त्यामुळे माण आणि खटाव परिससराला उरमोडीचे पाणी अधिक क्षमतेने येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाऊसाहेब गुदगे यांच्या विचारांची जादू कायम
मायणी : दुष्काळी खटाव-माणच्या जनतेचा शेती पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचे स्वप्न भाऊसाहेबांनी पाहिले होते. सामान्यांच्या विकासाचा ध्यास हाच भाऊसाहेबांचा विचार होता तो विचार त्यांनी हयातभर जपला. त्या विचारांमुळेच जनसामान्य त्यांच्या विचारांशी बांधले गेले होते. भाऊसाहेब आज आपल्यात नाहीत. मात्र, समाज विकासाची त्यांच्या विचारांची जादू जनसामान्यांवर कायम
पुसेसावळीत ७० हजारांचा गुटखा जप्त
पुसेसावळी : येथे गुरुवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना गुटखा व तंबाखू विक्री आणि साठा करणार्‍या संदीप लोखंडे व संजय सोलापुरे(रा. पुसेसावळी) या दोघांना सुमारे 69 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
दारूबंदीसाठी चितळीच्या महिला आक्रमक
मायणी : चितळी, ता. खटावमध्ये संपूर्ण दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या असून गावातील देशी दारूचे दुकान ताबडतोब बंद करावे, अशी मागणी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मायणी पोलिस दूरक्षेत्र कार्यालय यांच्याकडे करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी होणार्‍या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय करावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
अमोल कांबळेला सात दिवसांची पोलिस कोठडी
वडूज : खटाव तालुक्यातील 2 कोटी 93 लाखांच्या शेतकरी अर्थसहाय्य अपहार गुन्ह्यातील मुख्य आरोपी तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळेला गुरुवारी न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अमोल कांबळेला अटक झाल्यावर सर्वसामान्यांनी व्यक्‍त केलेल्या तीव्र भावना ध्यानात घेता न्यायालय परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.
उपजिल्हाधिकारी अमोल कांबळेला अटक
वडूज : खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी 2015-2016 साली शासनाकडून प्राप्त झालेल्या कृषी अर्थसहाय्य अनुदानातील 2 कोटी 93 लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल असलेला तत्कालीन तहसीलदार व विद्यमान उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे (वय 31, रा. सुर्ली, ता. केज, जि. बीड) याला बुधवारी वडूज व मायणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर वडूज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात त्याची कसून चौकशी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून
वॉटरकप स्पर्धेत भोसरे, बिदालने पटकावले नंबर
औंध : भोसरे (ता. खटाव) या गावाने वॉटरकप स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून रोख 15 लाखांचे पारितोषिक पटकावले असून पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवरील पारितोषिक वितरणानंतर भोसरे ग्रामस्थांनी गावामध्ये फटाके वाजवून आनंद व्यक्‍त केला. दरम्यान, रविवारी पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते शाहरुख खान, सुजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत भोसरे ग्रामस्थांनी पारितोषिक स्वीकारले.
बँकांमध्ये खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट
औंध : ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांमधून विद्यार्थ्यांची बँक खाती काढताना बँक अधिकारी व कर्मचार्‍यांकडून विद्यार्थी व पालकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरू आहे.
पावसाने दिली ओढ, बळीराजाच्या जीवाला घोर
खटाव : जून महिन्याच्या सुरुवातीला आशादायक चित्र निर्माण केलेल्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने खटाव तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. पेरणीनंतर उगवून आलेली पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.