जमिनीच्या वादातून वाकेश्‍वर येथे खून
वाकेश्‍वर, ता. खटाव येथील जमिनीच्या कारणावरून झालेल्या भांडणात महादेव मुगूटराव फडतरे (वय 63) यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत वडूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहीद जवानाची जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हा
शहीद जवान रामचंद्र गोपाळ धुरगुडे यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून मिळालेली जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी संशयित दिगंबर श्रीरंग शिंगाडे याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडूज येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान
येथे मध्यरात्री लागलेल्या वणव्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री अचानक लागलेल्या वणव्याने दहिवडी रस्‍त्याशेजारी असणारी फळबाग आगीत जळून खाक झाली.
भारतीय संविधान प्रास्ताविका मोडीलिपीत ; रयतच्या पुसेगाव महाविद्यालयात आगळावेगळा उपक्रम
भारतीय समाज क्रांतीचे जनक व अस्सल मराठी साहित्याचे निर्माते महात्मा जोतीराव फुले यांचे मूळ गाव कटगुण (ता.खटाव) जवळील पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य काँलेजच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या ६८ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अल्प परिचय करून दिला तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे मोडी लिपीत भाषांतर, राजमाता जिजाऊ महाराज यांनीमोडीत लिहिलेल्या पत्राचे मराठी भाषांतर करून या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन भरवून प्रजासत्ताक दिनी आगळीवेगळी भेट दिली.
धोंडेवाडीतील अपघातात श्रीराम महाराजांचा मृत्यू
मूळगाव गोंदवले ता.माण येथील व सध्या बडवाह येथील खेडीघाटमध्ये श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे संस्थापक श्रीराम महाराज रामदासी यांचा गुरुवार १८ रोजी रात्री धोंडेवाडी ता.खटाव येथील रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. मात्र सातारा येथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
खरशिंगे येथील एकाचे अज्ञाताकडून बनावट एटीएम कार्ड वापरून तीस हजार लंपास
खरशिंगे ता.खटाव येथील एकाच्या बँक खात्यावरून तीस हजार रुपये अज्ञातांनी बनावट ए टी एम चा वापर करून लंपास केल्याची घटना घडली. याबाबतची औंध पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,कृष्णत कुंडलीक सुर्यवंशी रा.खरशिंगे यांचे औंध येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे बचत खाते असून दि. पाच जानेवारी रोजी गुरगाव येथील ए टी एम सेंटर वरून बनावट ए टी एम कार्ड वापरून तीस हजार रुपये काढल्याची घटना सूर्यवंशी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबतची फिर्याद औंध पोलिसांत दाखल केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अतिग्रे करीत आहेत.
वादळी पावसामुळे औंधसह परिसरात शेतीचे अतोनात नुकसान
औंध : औंधसह परिसरास गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटे झालेल्‍या पावसाने उभी पिके आडवी झाली आहेत. सुमारे चार तास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने परिसराला झोडपून काढले. अनेक ठिकाणी खरीपाची पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; एक ठार, दोन गंभीर
वडूज : वडूज-कराड रस्त्यावर शिवाजीनगर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्‍या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शैलेश दिनकर आवळे ( वय, २२ रा. दहिवड ) असे मृत्‍यू झालेल्‍याचे नाव आहे. तर, सखाराम शंकर खुडे ( वय, ३०, रा. दहिवड (पुर्नवसन ता. खटाव) आणि निलेश शांताराम शिंदे (वय, ३० रा. गुरसाळे) अशी जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.
मराठा समाजालाही आरक्षण मिळावे: ना. रामदास आठवले
पुसेसावळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार्‍यांना आम्ही बदलून टाकण्यासाठी तयार आहोत. देशात विविध जाती आहेत. परंतु,देश एक आहे, ही भावना महत्त्वाची आहे. देशापेक्षा कोणीही व्यक्‍ती मोठी असू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
औंध येथील श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव उत्सहात साजरा
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव "आई उदे ग अंबे उदेच्या"जयघोषात गुलाल उधळून ,फळांचा प्रसाद वाटून हजारो भाविकांच्या उपस्थितीत मूळपीठ डोंगरावर मोठ्या उत्साहपूर्ण, अपूर्व मंगलमय वातावरणात पार पडला.
वडूज-कराड रस्त्यावर दुचाकींचा अपघात एक जण जागीच ठार
वडूज-कराड रस्त्यावर शिवाजीनगर येथे दोन दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक बसून एक जण जागीच ठार झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.
हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावर जिवघेणा हल्ला
कातरखटाव : वडूज येथील हवालदार धनजी वायदंडे यांच्यावर काटरखटाव येथे चार युवकांनी कूकरीने वार करून जीवघेणा हल्ला केला . यामध्ये हवलदार वायदंडे जखमी झाले आहेत त्यांच्यावर वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चितळीच्या रणरागिणी दारुबंदीसाठी सरसावल्या
सातारा: खटाव तालुक्यातील चितळी या संवेदनशील गावातील महिलांनी दारुबंदीसाठी जोर लावला असून अनेकांचे संसार उद्धवस्त करणारे दारुचे दुकान गावातून हद्दपार व्हावे या मागणीसाठी चितळीतील रणरागिणी आज जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना भेटल्या. घटस्थापनेदिवशी गावात बाटली आडवी करण्यासाठीचे मतदान व्हावे अशा आशयाचे निवेदनही या महिलांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
वडीच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
औंध : सुट्टीवर आलेला वडी ता. खटाव येथील जवान प्रवीण मधुकर येवले वय 35 वर्षे यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
गणेशोत्सवातील देखाव्याचे अनुकरण करताना गळफास
पुसेसावळी : दुष्काळी खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे सुमित प्रमोद शिंदे या सुमारे 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गणेशोत्सवातील देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून मृत्यू झाला. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हा देखावा सुमितने गणेशोत्सवात पाहिला व घरी येऊन त्याचे अनुकरण करत असताना दुर्दैवाने गळफास लागून त्याला जीवास मुकावे लागले. या हृदयद्रावक घटनेने खटाव तालुक्यात हळहळ व्यक्‍त होत आहे.
चौकीचा आंबा येथील चार दुकानांना आग
औंध : चौकीचा आंबा ता.खटाव येथील चार दुकानांना आज पहाटे पाचच्या अचानक सुमारास लागलेल्या आगीमध्ये सर्व दुकाने जळून खाक झाली असुन यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सुमारे
कर्जमाफीसाठी छप्पन कलमे लावून शेतकर्‍यांची चेष्टा
औंध : शासनामार्फत कर्जमाफी देण्यासाठी वेगळे निकष लावले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणजे शासन आपल्या मागे कर्जमाफीची इडापिडा लावते की काय? अशी भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.
अजय राऊतला पाच दिवसांची पोलिस कोठडी
वडूज : खटाव तालुक्यातील कृषी अनुदान अपहारप्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेल्या कारकून अजय राऊतला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर या प्रकरणातील दुसरा संशयित राकेश नायडूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शेतकरी अनुदान अपहार प्रकरणी सर्कल राऊतला अटक
वडूज : खटाव तालुक्यातील खरिप हंगाम नुकसान शेतकरी अनुदान अपहार प्रकरणी आज वडूज पोलिसांनी सर्कल आणि तत्कालीन कारकून अजय दशरथ राऊत याला अटक केली. या अपहार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आत चार झाली आहे.
शेतकर्‍यांची तहान भागवण्यासाठी ‘मनसे’ने पुसेसावळीत कॅनॉल फोडला
सातारा: खटाव तालुक्यातील पुसेसावळी पंचक्रोशीतील अनेक गावांना ऐन पावसाळ्यातही पाणीपुरवठा होत नसल्याने आणि याप्रश्‍नी शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे संतप्त ग्रामस्थ व शेतकरी तसेच मनसैनिकांनी ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली उरमोडी कॅनॉल फोडून कॅनॉलमधील पाणी पारगाव तलावात सोडून शेतकरी व ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी अनोखे आंदोलन केले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.