खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेसच्या मोर्चात अवघे १५ पदाधिकारी आणि ६० कार्यकर्ते
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेसने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात खंडाळा तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात अवघे 60 च कार्यकर्ते उपस्थित होते. पंधरा पदाधिकारी, 60 कार्यकर्ते आणी 30 पोलीस अशी केविलवाणी अवस्था या मोर्चाची झाली होती.
विहिरीत बुडून चिमुरड्याचा मृत्यू
खंडाळा : म्हावशी, ता. खंडाळा येथील इयत्ता पहिलीत शिकणारा वेदांत विजय राऊत हा विहिरीत बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोणंद : लोणंद - सातारा रस्त्यावर तांबवे गावच्या हद्दीत बर्गे वस्तीजवळ रविवारी रात्री भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. प्रल्हाद जयवंतराव शिंदे (वय 56) रा. कोपर्डे असे मृताचे नाव आहे.
खंबाटकी घाटात भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध
खंडाळा : पुणे - बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात होणाऱ्या नवीन बोगद्यासाठी जमीन भूसंपादन करण्यास वाण्याचीवाडी, पारगाव , खंडाळा येथील शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शविला आहे. शेतकर्‍यांनी आज मोजणी करू दिली नाही . या प्रकल्‍पामुळे खंडाळा तालुक्यातील सुमारे ८२ गटधारक शेतकरी बाधित होणार असून अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत .
अंदोरी प्राथमिक शाळेतील एलसीडी व दोन साऊंडची चोरी
लोणंद : अंदोरी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा अंदोरी या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गाचे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 32 इंची एलसीडी व दोन साऊंड असा एकूण 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
कारच्या धडकेत महिला जागीच ठार
शिरवळ : शिरवळ-लोणंद मार्गावर भोळी गावच्या हद्दीत रस्त्याकडेला नातेवाईकांशी बोलत बसलेल्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनेच्या कुटुंबियांकडून होणारा त्रास दूर करण्यासाठी सासर्‍याची पोलिसांकडे धाव
सातारा : सुनेचा छळ केल्या प्रकरणी अनेक घटना घडतात. काही वेळेला सासरच्या मंडळींना केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून तुरुंगवास भोगावा लागतो. परंतु, खंडाळा तालुक्यातील खेड बु॥ येथील सासरच्या मंडळींना सुनेच्या माहेरील बारामती तालुक्यातील कुटुंबियांकडून होणारा त्रास दूर करण्यासाठी सातारा पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे.
लुटमार करणारी टोळी गजाआड
शिरवळ : शिरवळ परिसरामध्ये महामार्गावर लूटमार करणार्‍या चौघांना शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी संशयितांनी भोळी, ता. खंडाळानजीक नीरा नदीत उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी पोहत जाऊन चौघांच्या मुसक्या आवळल्या. चौघांनाही न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सालपे घाटात टेम्पो पलटी होऊन १ ठार, १ जखमी
लोणंद : लोणंद - सातारा रस्त्यावर रात्री सालपे घाटाच्या उतारावरील शेवटच्या वळणावर टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात टेम्पोमधील एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. अपघातग्रस्त टेम्पोमध्ये अडकलेल्या या दोघांना पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. परंतु, जितेंद्रकुमार राजनारायण सिंह (वय ३८), रा. उत्तर प्रदेश याचा मृत्यू झाला, तर चालक
लोणंदजवळ ट्रक व दुचाकीची धडक होवून पिता ठार तर मुलगी जखमी
लोणंद : लोणंदपासून दोन किमीवरील रेल्वे उड्डान पुलावर मंगळवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास ट्रक व दुचाकीची धडक होवून झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यु झाला तर मुलगी जखमी झाली आहे. अपघातानंतर पुलावर रस्त्याच्या मध्यभागी ट्रक आडवा झाल्याने लोणंद-नीरा वाहतूक 1 तास वाहतूक ठप्प झाली.
खंडाळा येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले
खंडाळा : पारगाव, खंडाळा येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एजन्सीने या एटीएममध्ये पैसे भरले होते. चोरट्यांनी मशीन उचकटून रक्कम पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
पाण्याच्या टँकरसाठी पडळकर वस्तीतील महिलांचा हंडा मोर्चा
लोणंद : खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील पडळकर वस्तीतील महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळावा, या मागणीसाठी खंडाळा पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. दोन दिवसांत टँकर सुरू केला नाही तर पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला.
निपाणी येथील सराफास खंबाटकी घाटात लुटले
खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात चौघाजणांनी इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून एका सराफ व्यावसायिकाच्या गाडीचा ताबा घेतला व पिस्तुलाचा धाक दाखवून रोकड, दागिने व 5 मोबाईल, असा ऐवज लुटून नेला.
खंबाटकी घाटात आणून टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; चुलत भावानेच केला होता खून
खंडाळा : खंबाटकी घाटात आणून टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, मृत कुंडलिक मच्छिंद्र हजारे (वय 24, रा. अथणी, जि. बेळगाव) येथील असल्याची व चुलत भावानेच त्याचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून करून मृतदेह खंबाटकीत आणून टाकल्याची माहिती पो.नि. प्रकाश सावंत यांनी दिली. याप्रकरणी संशयित आप्पासाहेब हजारे यास अथणी पोलिसांनी अटक करून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त केली आहे. त्याच्या साथीदाराच्या शोधार्थ सांगली जिल्ह्यात पथक रवाना झाले आहे.
लोणंद येथील महिलेचे विषप्राशन
सातारा: खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील ठोंबरे मळ्यात राहणाऱ्या एका महिलेने शनिवारी घरगुती भांडणातून विषप्राशन केल्याची घटना घडली असून तिच्यावर येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत
मोर्वेत 8 वर्षांच्या मुलाचे महिलेकडून लैंगिक शोषण
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे आठ वर्षे वयाच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विवाहित महिलेस खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.
खून करून मृतदेह खंबाटकी घाटात फेकला
खंडाळा : अज्ञात पुरुषाचा केबलने गळा आवळून खून करून मृतदेह चारचाकी वाहनातून आणून खंबाटकी घाटात टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मृतदेहाच्या अंगावर जबर मारहाण केल्याच्या खुणा आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बांधावरून पडल्याने महिलेचा मृत्यू
लोणंद : सातारा जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी भानुदास धोंडीबा क्षीरसागर यांच्या पत्नी सौ. कमल भानुदास क्षीरसागर (वय 53 ) यांचा शेतातील बांधावरून पाय घसरून डोक्याला मार लागून मृत्यू झाला.
मोटार सुरू करण्यावरून धनगरवाडीत दोन गटांत हाणामारी
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत विहिरीवर असणार्‍या मोटारने शेतास पाणी देण्याच्या नंबरवरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी 17 जणांविरोधात शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा
शिरवळ : मूल होत नाही, निवडणूक व नवीन बांधकामासाठी माहेरहून पैसे घेऊन ये कारणांवरून विवाहितेचा मानसिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी भोर येथील पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.