शेतकऱ्यांसाठी बळीराजा स्वाभिमानी एकत्र
गेल्‍या तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटनांनी एकत्रित येत कराडमध्ये धुळ्यातील धर्मा पाटील यांना न्याय मिळावा, म्हणून रास्तारोको आंदोलन केले होते. तीन वर्षापूर्वीपर्यत या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते स्वाभिमानीच्या झेंड्याखाली एकत्र होते. आता शेतकरी हितासाठी बळीराजाने चर्चेची तरारी दर्शवली आहे. त्यामुळेच बळीराजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता स्वाभिमानीची भूमिका काय असेल? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
जेष्ठ तमाशा कलावंत रामचंद्र बनसोडे-करवडीकर यांचे निधन
येथील जेष्ठ तमाशा कलावंत रामचंद्र बनसोडे-करवडीकर यांचे (वय ७५) यांचे बुधवारी दुपारी करवडी (ता. कराड) येथे दिर्घ आजाराने निधन झाले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांचे ते पती होत.
१ एप्रिलपासून बेकायदा रिक्षांवर हातोडा
31 मार्चपर्यंत रिक्षा आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून ज्या रिक्षा चालकांकडे योग्य ती कागदपत्रे नसतील आणि यापूर्वीच स्क्रॅपमध्ये काढलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले आहेत.
विहीरीत पडून बिबट्याचा दुर्देवी अंत
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील रासाटी: आंबेघर गावातील धनगरवाडा येथील विहीरीत पडून बिबट्याचा दुर्देवी अंत झाला. बिबट्या ज्या विहीरीत पडला. त्याला कठडा नव्हता. त्यात एक मृत मांजरही सापडले आहे. त्यामुळे त्या मांजराचा पाठलाग करत आलेल्या बिबट्याला विहीर न दिसल्याने तो त्यात पडला असावा, असाही अंदाज व्यक्त होतो आहे. त्या विहीरीला कठडे बांधण्यासाठी निधी मंजूर असतानाही ते न बांधल्याने बिबट्याचा अंत झाला. वन्य जीव विभागाच्या गचाळ कारभारामुळे बिबट्या मेल्याने वन्यजीव प्रेमींसह स्थानिक नागरीकांच्या संतप्त भावना आहेत.
एकाच घरात ब्रिगेडियर कॅप्टन अन् लेप्टनंटही
कराड तालुक्यातील कोणेगावला देशसेवेची परंपरा आहे. या गावाला सैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. ही परंपरा जपत या गावाने आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. या गावचे सुपूत्र सुरेश चव्हाण यांच्या घरात तीन लाल दिवे असून ते स्वतः ब्रिगेडियर तर त्यांची दोन्ही मुले लेप्टनंट व कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.
कराडात आज हिंदू एकताचे उपोषण
लोकशाही मार्गाने आम्ही हिंदू समाजात लव्ह जिहादविरुद्ध पदयात्रा काढणार होतो. मात्र, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर घाला घालत लोकशाहीचा अवमान करत परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आज आम्ही कराडमध्ये लाक्षणिक उपोषण करणार आहोत. सायंकाळपर्यंत परवानगी न मिळाल्यास आम्ही हे उपोषण पदयात्रेला परवानगी मिळेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा इशारा हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रांताध्यक्ष नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिला आहे.
कार्वे मारामारी: १२ जणांवर गुन्हे
कार्वे ता. कराड येथे युवकांच्या दोन गटात जुना वाद उफाळून येऊन मारामारी झाली. यात तीनजण जखमी असून परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या 12 जणांवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी ही मारामारी झाली होती. विजय शिरीष थोरात (वय22), ओंकार धनाजी पाटोळे (वय 18) व अमन मुल्ला अशी जखमींची नावे आहेत.
कराड येथील न्यायालयाच्या आवारात 21 जानेवारीला कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 21 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत कराड येथील न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव वर्षा पारगावकर यांनी दिली आहे.
लग्नाचा बनाव रचून वृद्धाची पाच लाखाची फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा
बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील 70 वर्षांच्या वृद्धाचे लग्न लावून देण्याचा बनाव करून त्या वृद्धाचाची सुमारे पाच लाखांची फसवणूक केली आहे. ३ लाखांची रोकड व ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. महेंद्र कदम यांची निवड
सीमाभागातील जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या 15 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द साहित्यिक व टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांची निवड झाली आहे. मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीतर्फे हे एकदिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. या संमेलनात कविसंमेलन, कथाकथन तसेच परिसंवादाचा लाभ श्रोत्यांना होणार असल्याचे गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे यांनी सांगितले.
वानरांच्या टोळीला ग्रामस्थांनीच केले जेरबंद
किवळ, ता. कराड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले.
मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर
इंग्रजीमधील फलक न हटवल्याने आठ दिवसांची मुदत देत मनसे पदाधिकाऱ्यांनी कराडचे शॉप इन्स्पेक्टर अनिल पाटील यांना सोमवारी अक्षरश: धारेवर धरले. त्यानंतर इंग्रजी फलक लावलेल्या दुकानदारांना मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनिल पाटील यांनी समज देत कारवाईचे संकेत दिले आहेत.
गमेवाडीत आढळला मृत बिबट्या
तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.गमेवाडीत खाणसाळ नावाचे शिवार आहे. या शिवारात दीपक रघुनाथ जाधव यांची शेतजमीन आहे. शेतात ऊस असून, सोमवारी सकाळी दीपक जाधव हे वैरणीसाठी फडात गेले होते.
खंडणीसाठी बाजार समितीच्या संचालकाला धमकावले; भूमाता बिग्रेडच्या कार्यकर्तीसह पाच महिलांवर गुन्हा
बलात्काराच्या गुन्ह्यासह जातीवाचक शिवागीळ केल्याची तक्रार देण्याची धमकी देवून एक फ्लॅट व दहा लाखांची खंडणी मागितल्यामुळे रेथील बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर यांनी आत्महत्येचा प्ररत्न केला. अशोक पोतलेकर रांनी दिलेल्रा फिर्यादीनुसार भूमाता ब्रिगेडच्रा माधुरी टोणपे, माधुरी सोनटक्के यांच्यासह तीन महिलांवर शहर पोलिसात खंडणीसहत्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोतलेकर रांनी 28 डिसेंबर रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर 3 जानेवारीला पोतलेकर शुद्धीवर आले. त्यानंतर पुणे रेथील खासगी रूग्णालरात उपचार सुरू आहेत. त्यांनी काल सकाळी पुणे पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार आज येथील शहर पोलिसात ठाण्यात माधुरी टोणपेसह चार महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कालवडेत एकाचा निर्घृण खून
कालवडेत एकाचा निर्घृण खून, गावात खळबळ : खिंडीत आढळला मृतदेह; पोलिसांकडून कसून तपास कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.बबन हिंदुराव गाडे (रा. कालवडे, ता. कऱ्हाड ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कालवडे ते नांदगाव जाणाºया रस्त्यावर डोंगरातील खिंडीत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.
कराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने अचानकपणे दुकाने, हॉटेल वाहनांची तोडफोड केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत सुमारे पंधरा वाहनांची मोडतोड झाली असून, अनेक दुकानांच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दरम्यान, ढेबेवाडी फाट्यावर टायर पेटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे कराड शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद कराडमध्ये; वाहने, दुकानांची तोडफोड,तुफान दगडफेक
कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
शेतीची वीज बिले भरणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटन
शेतकरी वीज कंपनीला कोणतेही देणे लागत नाहीत. शेतकरी वीज बिलांचा भरणा करणार नाही. त्यामुळे कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना निवेदनाद्वारे दिला आहे.
वीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू
चिंचेवाडी येथे विद्युतखांबावर काम करत असताना खांबावरून पडून रामचंद्र बंडू चव्हाण वय 42 या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. यामुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
पाल यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांकडून मानकऱ्यांना नियमावली
श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा दि.29 डिसेंबर 2017 ते 4 जानेवारी 2018 मौजे पाल ता. कराड येथे साजरी होत आहे. दि.31 डिसेंबर 2017 हा यात्रेचा मुख्य दिवस असून मिरवणुकीसंबंधी मानकरी लोकांना वागण्याबाबत खालील नियम करण्यात आलेले आहेत.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.