विंग व कोळे परिसरात आजपासून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरे
कराड: कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत येणार्‍या विंग, कोळे परिसरातील प्रत्येक गावांतील महिलांसाठी मोफत रक्तातील साखर, हिमोग्लोबीन व रक्तदाब तपासणी शिबिर शुक्रवार दि.२१ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे. या शिबीराचा प्रारंभ आज, शुक्रवार, दि. २१ जुलै रोजी विंग होत असून या शिबिराचे गावनिहाय आराखडा तयार केला असून प्रत्येक गावांत नियोजित दिवशी सकाळी १०.३० वाजता शिबिराचे उद्‌घाटनाने होणार आहे. या मोफत तपासणीसह मोफत औषधोपचार शिबिराचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन कराड पंचायत समिती उपसभापती
भूलतज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचे २२ पासून कराड येथे आयोजन
सातारा: राज्यातील भूल शास्त्रातील पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व भूलशास्त्रतज्ञ यांची एकत्रित राज्यस्तरीय परिषद व कार्यशाळा कृष्णा वैद्यकिय संशोधन संस्था व अभिमत विद्यापीठ येथे दि. २२ ते २३ जुलै २०१७ रोजी दोन दिवसांची परिषद होणार आहे. महाराष्ट्रात राज्य भूलतज्ञ विभाग कृष्णा मेडीकल कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजीत केली आहे. अशी माहिती मुख्य संयोजक डॉ. अविनाश भोसले यांनी दिली.
कृष्णा पुलावर वाहतुकीची कोंडी कायम
कराड : कराड विटा मार्गावरील कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची येˆजा असल्याने याठिकाणी प्रचंड वाहतूकीची कोंडी होते. याठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर जुन्या पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर नव्या पुलावरील डांबर निघून गेला आहे. डांबरीकरण निघाल्याने पुलाच्या दर्जाबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले
कराड तालुक्‍यात वाठार परिसरात बिबट्याचे दर्शन
कराड : कराड तालुक्‍यात वाठार परिसरात चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्‍याने शेतकर्‍यांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक बछडा व मादीसह चार बिबट्यांचा वावर असल्याची भिती वर्तवण्‍यात येत आहे.
कराडात घरफोडी सत्र सुरूच
कराड : मुंढे येथील सतनाम एजन्सी फोडल्याची घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी कराड शहर व विद्यानगर परिसरात भरदिवसा चोरी केली. शहरातील बुधवार पेठेतील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या फ्लॅटसह विद्यानगर येथील अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून सुमारे साडेनऊ लाखांचे अंदाजे 32 तोळ्यांचे दागिने व रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुपारी घडलेल्या या घटना रविवारी
सतनाम एजन्सीमधून २० लाखांची तंबाखू, सिगारेटसह रोख रकमेची चोरी
कराड : कराड विमानतळ (मुंढे, ता. कराड) परिसरात कराड-चिपळूण राज्यमार्गालगत असणाऱ्या सतनाम एजन्सीमधून सुमारे २० लाखांची तंबाखू, सिगारेट बॉक्ससह रोख रक्कम चोरून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.
कोपर्डी अत्‍याचार प्रकरणी कराडमध्‍ये जोरदार निदर्शने
कराड : कोपर्डी अत्याचाराचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी कराड तहसील कार्यालयासमोर गुरूवारी जोरदार निदर्शने केली. तर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून 'मूक मोर्चा' काढण्यात आला. त्याचबरोबर ९ ऑगस्टला मोठ्या संख्येने मुंबईतील धडक मोर्चात सहभागी होण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.
माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
वहागाव: वाळू ठेक्यातील रक्कम परत न दिल्याने कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वरच्या माजी सरपंचासह अन्य एकावर कराड शहरातील दोघांनी त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला.
कराडमध्ये फुटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक दुरूस्तीचे काम सुरू
कराड : गेल्या काही महिन्यांपूर्वी कराड शहरातील फुटपाथवर नगरपालिकेकडून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते. मात्र, सध्या पेव्हिंग ब्लॉकच्या फरशा अनेक ठिकाणच्या तुटल्या आहेत तर काही फरशा खचल्या आहेत. पालिकेने पेव्हिंग ब्लॉकची दुरूस्ती केली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एसटीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; पाच जखमी
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास वडोली निळेश्‍वर एसटीने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पाचजण जखमी झाले असून एसटीसह ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्ररकणी एसटी चालक निवास दिनकर शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्यात १००९ पाणीपुरवठा योजना राबविणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रेठरे बुद्रुक : प्रत्येक ग्रामस्थाला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी राज्य शासन व केंद्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या चार वर्षांत राज्यात 1009 पाणीपुरवठा योजना राबविण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कासारशिरंबेत शेतकर्‍याच्या मुलाची कर्जाला कंटाळून आत्महत्या
कराड : कासारशिरंबे ता. कराड येथील शेतकर्‍याच्या मुलाने कुटूंबावरील कर्जाला कंटाळून जनावरांच्या गोठय़ात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, दि. २१ रोजी रात्री
औरंगाबाद पोलिसांचा कराडात छापा
कराड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नातेवाईक असल्याचे सांगून करोडो रुपये उकळणार्‍या औरंगाबादमधील भामट्याचे कराडपर्यंत लागेबांधे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी कराड पोलिसांच्या मदतीने शेणोली परिसरातील एका
शेतकर्‍यांनो फासाकडे नको, शिवाराकडे पावले वळवा: खा. राजू शेट्टी
मसूर: 'देशातील १२६ कोटी जनतेला दोन वेळचे अन्न देणारी बाजारपेठ जगात कोठेही नाही. शेतकर्‍यांच्या पोटातली भूक डोक्यात गेली तर अराजक माजेल, मग कोणालाच जीवन जगता येणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी व्यथित होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय
साहित्यिकांनी स्त्रियांच्या कोंडलेल्या भावना आणखी प्रगल्भतेने मांडाव्यात; गुंफण संमेलनात सूर
मसूर: मराठी ग्रामीण साहित्यिकांनी स्त्रियांचे वास्तव आयुष्य वेगळ्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. हे वास्तव मांडण्यासाठी अजूनही काम आहे. साहित्यिकांनी स्त्रियांच्या कोंडलेल्या भावना आणखी प्रगल्भतेने मांडाव्यात, असा सूर मसूर (ता. कराड) येथे १४ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनातील 'ग्रामीण स्त्री, साहित्यातील आणि वास्तवातील’ या परिसंवादात व्यक्त झाला.
टोलगुंडांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
उंब्रज: पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे ता. कराड येथील टोल नाक्यावर पत्रकारास मारहाण करून मोबाईल हिसकावून घेणार्‍या दोन टोलगुंडांची रविवारी येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सचिन लिबे, वय २९ रा. मंगळवार पेठ कराड, रमेश वामन आमणे, वय
दुचाकीच्या धडकेत पाच जखमी
उंब्रज : चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गाच्या सेवारस्त्यावरून चरेगावकडून शितळवाडीकडे पायी निघालेल्या एकाच कुटूंबातील ३ जणांना मोटर सायकलस्वाराने धडक दिल्याने ५ जण जखमी झाले. दि. १६ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अविनाश मोहिते यांच्यासह चौघांच्या जामिनावर युक्तिवाद
कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाईस चेअरमन सुरेश पाटील यांच्यासह चौघांनी कराडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी सरकार पक्ष तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे याप्रकरणी
कोळेचा लाचखोर तलाठी रंगेहाथ सापळय़ात
कराड : नोटीस ऑफ लिज पेंडन्सी दस्ताची फेरफारला नोंद घेऊन तसा फेरफार उतारा देण्यासाठी बाराशे रूपयांची लाच स्वीकारताना कराड तालुक्यातील कोळे सजाचा लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात बुधवारी रंगेहाथ सापडला. पंढरीनाथ विठोबा कोळी वय ५५ रा.
फसवणूकप्रकरणी बिल्डरवर गुन्हा
कराड : साठेखतातील तरतुदीप्रमाणे साडेतीन वर्षापूर्वी फ्लॅटचा ताबा देणे बंधनकारक असतानाही ताबा न देणार्‍या बिल्डरसह चौघांविरूद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.