अवैध दारुधंद्यांविरोधात मेढा पोलिसांची कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
गेल्या अनेक दिवसांपासून मेढा पोलिसांची अवैध दारुधंद्यांविरोधात थंडावलेली कारवाई कालच्या छापासत्रामुळे पुन्हा जोर धरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल दि. 6 रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी जवळवाडी, ता. जावली हद्दीत गवताच्या गंजीमध्ये लपवलेला दारुसाठ्यावर छापा मारुन सुमारे 3 लाख 33 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेढ्यातील त्या शिक्षकास जामीन
विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल असलेल्या शिक्षक नितीन दिगंबर ढवळे (रा.सातारा) यांना मेढा न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
कुडाळच्या शाळेत आठवडी बाजार; चिमुकल्यांनी केली २३ हजाराची उलाढाल
विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी कुडाळमधील महाराजा शिवाजी हायस्कूलमध्ये चक्क भाजी मंडईची लगबग आज पाहायला मिळाली. ‘भाजी SS घ्या भाजी SS’ हा टिपिकल बाजारपेठेतील आवाज आज कुडाळच्या शाळेत मान्यवरांना ऐकायला मिळाला.
मेढा येथे लग्नाच्या वरातीत तुंबळ हाणामारी; दोघे अटक
लग्नाच्या वरातीत मेढा येथे दोन गटात नाच गाण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटातील लोकांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकारणी 3 जणांना अटकही करण्यात आली आहे.
शिक्षकाकडून सहकारी शिक्षिकेची बदनामी ; खंडणीसह विनयभंगांचा गुन्हा दाखल
मेढा, ता. जावली येथील एका संस्थेत कार्यरत असणार्‍या महिला शिक्षिकेस त्याच संस्थेतील शिक्षकाने बदनामी करुन विनयभंग केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून संबंधित शिक्षकास ताब्यात घेण्यात आले आहे.
कर्मचार्‍यांची दादागिरी, बेशिस्त कारभारामुळे आनेवाडी टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी
आनेवाडी: आनेवाडी टोलनाक्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, कर्मचार्‍यांची दादागिरी, गैरसोयींचा विळखा, बेशिस्त कारभार यामुळे वाहनचालकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. व्यवस्थापन जुने की नवे याचे वाहनचालकांना देणे घेणे नसते. टोलनाक्यावरील वाहतूक कर्मचार्‍यांनी सुरळीत ठेवावी याकडे महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे.
जावलीतील ९ गावांना जलस्वराज्यमधून २ कोटी ९८ लाखाचा निधी
सातारा- उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार्‍या जावली तालुक्यातील ९ गावांसाठी जलस्वराज्य योजनेतून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तब्बल २ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला असून जावली तालुक्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
मोरघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांना गावपातळीवर विरोध
सातारा : मोरघर (ता. जावळी) ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व प्रतापगड कारखान्याचे संचालक भानुदास गायकवाड यांना गावपातळीवर विरोध दिसत आहे.
मेढा डेपोच्या बेफिकीर कार्यप्रणालीमुळे जावळीकर जनता हैराण
मेढा : गत चार-पाच वर्षांच्या कालावधीत मेढा डेपोतील वाहकांच्या अरेरावीचा फटका प्रवाशी आणि डेपोला बसत आहे. त्यामुळे डेपोची प्रतिमा मलिन होऊन प्रवाशांचा मेढा डेपोवर भरवसा राहिलाच नाय... अशी म्हणायची वेळ आली आहे.
हातगेघर येथे डुक्‍कर मारण्याचे दोन बॉम्ब फुटले
मेढा : हातगेघर, ता. जावली येथे रानडुकराला मारण्याचे बॉम्ब सापडल्याने व त्यातील दोन बॉम्ब घरातच फुटल्याने संपूर्ण हातगेघर गाव हादरले. मेढा पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
शहीद रविंद्र धनावडे यांच्या कुटुंबियांना मकरंद अनासपुरेंनी दिली आर्थिक मदत
सातारा : जावळी तालुक्यातील मोहाट येथील बीएसफचे शहिद जवान रविंद्र धनावडे यांच्या कुटुंबियांना धीर देवून नाम फाउंडेशनच्या वतीने शहिद पत्नी वैशाली यांच्या नावे दिड लाख तर माता जनताबाई यांच्या नावे एक लाख रुपयाचा धनादेश मकरंद अनासपुरे यांनी दिला.
हौसाबाई पोफळे यांचे निधन
सातारा: मौजे रामवाडी पो. वालुथ, ता. जावली येथील श्रीमती हौसाबाई बबनराव पोफळे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी(दि. ११) निधन झाले. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या व धार्मिक
केडंबे-केळघर रस्त्यावर भलामोठा दगड
केळघर : मुसळधार पावसाने केडंबे-केळघर रस्त्यावर भलामोठा दगड आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
नोकरी लावतो असे सांगून २४ जणांची १० ते १२ लाख रुपयांची फसवणूक
सातारा : कुडाळ (ता. जावली) येथील दोन महिलांसह एकाने आयडीबीआय बँकेत नोकरी लावतो असे सांगून २४ जणांची फसवणूक करण्‍यात आली आहे. २४ जणांकडून ४० हजार ते ६० हजार रुपयांची रक्‍कम घेऊन १० ते १२ लाख रुपयांची
विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारावे; मुख्याध्यापक घोरपडे यांचे आवाहन
आनेवाडी: शालेय जीवनातच भावी युवा पिढी घडली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच देशसेवेचे व्रत अंगीकारायला हवे, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डी. पी. घोरपडे यांनी केले.
दहा दिवस अंधारात गेलेले कांदाटी खोरे पुन्हा उजळले; ग्रामस्थ व वीज मंडळ कर्मचार्‍यांचा कडवा संघर्ष
मेढा: कांदाटी या अत्यंत दुर्गम खोर्‍यातील लामज मुरा येथे विजेचे लोखंडी अवजड पोल अंगाखांद्यावर घेऊन सुमारे चार किलोमीटर डोंगरावर नेले. अतिवृष्टी व जोरदार वादळामुळे कोसळलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी झालेला सगळा थरारक संघर्ष थक्क करणारा आहे. स्थानिक जनतेचा कडवा पाठपुरावा अन् त्याला वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिलेली साथ यामुळे विजेपासून दहा दिवस अंधारात गेलेले कांदाटी खोरे पुन्हा विजेच्या प्रकाशाने उजळून गेले.
कण्हेर धरण परिसरातील नागरकिांना सतर्क राहण्याचे आवाहन
सातारा: कण्हेर धरणात 8.63 टीएमसी पाणीसाठ असून जलाशयाची पाणीपातळी 688.42 दलघमी आहे. धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 600 क्युसेक्स पाण्याचा विर्सग नदीपात्रात सुरु आहे. धरणाच्या खालील भागातील नदी काठचे गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षाच्या दृष्टीने
अतिदुर्गम तळदेव प्राथ. आरोग्य केंद्राचे जि. प. उपाध्यक्षांनी केले स्ट्रींग ऑपरेशन
सातारा: ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.पण,सातारा जिल्ह्यातील तळदेव प्राथ. आरोग्य केंद्रात सेवा पुरवली जात नाही.याबाबत जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी स्वत: स्ट्रींग ऑपरेशन केले.त्यामुळे खळबळ माजली आहे
तेटलीत तापाचे आणखी 3 रुग्ण
सातारा : तेटली (ता. जावली) येथे स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण सापडले असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू समुपदेशन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. दरम्यान, तेटली परिसरात आणखी 3 तापाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेरुलिंग शिक्षण संस्थेकडून फसवणूक; विद्यार्थ्यांना दाखलेच दिले नाहीत
सातारा : मेढा, ता. जावळी येथील मेरुलिंग शिक्षण संस्थेकडून अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखलेच दिले नसल्याने त्यांना पुढील शिक्षणाला मुकावे लागले आहे तसेच नोकरी करताना हा दाखला देऊ न शकल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.