फलटणमध्ये एस.टी महामंडळाच्या विरोधात पत्रकार ; तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा ही जनतेची मागणी !
सातारा जिल्ह्यातील राजकारण, सत्ताकारण यावर प्रभाव असलेल्या फलटण तालुक्यातील एस.टी सेवा रामभरोसे बनली आहे. त्यामुळे जनतेचा रोष वाढला असतानाच फलटण तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एस.टी महामंडळाच्या फलटण डेपोत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. तर सामान्य जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करीत आहे.
सतत होणाऱ्या एस.टी अपघाताच्या निषेधार्थ फलटणमधील पत्रकार उद्या करणार उपोषण
सततच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या फलटण आगाराकडून अजूनही प्रवाशांच्या साठी ठोस भूमिका मंत्री दिवाकर रावते घेत नसल्याने फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार उद्या सकाळी 10 वाजता उपोषणास बसणार असल्याचे जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता व प्रा.रमेश आढाव यांनी सांगितले आहे.
भरतीसाठी गेलेल्या तरुणांची गाडी नीरा उजव्या कालव्यात बुडाली; एक तरुण बेपत्त्ता
पुणे - पंढरपूर मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीतील रावरमोशी येथे नीरा उजव्या कालव्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक जीप कोसळली. चालकाचे तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. भरती प्रशिक्षण रद्द झाल्याने महाबळेश्वर येथे नातेवाईकांना भेटून माहूरला (नांदेड) येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीमध्ये सातजण होते. त्यातील सहाजण पोहून बाहेर पडले मात्र एक जण वाहून गेला आहे. कचरू दत्ता गिरेवाड (वय २४रा.चितगिरी ता.भोकर जी .नांदेड) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फलटणमध्ये चैन स्नॅचिंग
येथील रायगड हॉटेलच्या पाठिंमागे हातातील कार्ड दाखवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात युवकांनी सौ. सुजाता रणावरे यांच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळ्यांचे दागिने हिसकावले, या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फलटण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाई अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी दादा ढेकळे राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारी
पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन वाई येथील एका महिलेस वाई, लोणंद, खंडाळा व फलटण येथे नेवून तिच्या असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार करणाऱ्या दोघां संशयित आरोपीपैकी वाखरी ता.फलटण येथील पैलवान दादा बापूराव ढेकळे याला वाई पोलिसांनी अटक केली असून, दादा ढेकळे हा फलटण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फसवणूकप्रकरणी फलटणमधील बिल्डर नितीन भोसलेवर गुन्हा दाखल
फ्लॅट देतो असे सांगून वेळोवेळो सुमारे 25 लाखापेक्षा जास्त रक्कम घेऊन अर्धवट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी फलटण येथील सक्षम बिल्डर्सचा भागीदार नितीन महादेव भोसले याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नाईकबोमवाडी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून
तालुक्यातील नाईकबोमवाडी ते तातमगिरी मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कच्च्या रोडलगत एका २५ वर्षीय युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला आहे. खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.
फलटणमध्ये जिल्ह्याधिकाऱ्यांच्या नावावर तलाठ्यांच्या 'मांडवल्या' !
तालुक्यात सध्या औद्योगिकीकरणामुळे वाणिज्य व रहिवास क्षेत्रातील विकासकामे जोरात आहेत. बांधकामांसाठी वाळूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे वाळू माफियांसाठी फलटण तालुका सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.
ऊसाला आग लागल्याने पंधरा लाखांचे नुकसान
मठाचीवाडी ता.फलटण येथे एका शेतकऱ्याने पाचट पेटवली असता, इतरत्र आग पसरून सुमारे 16 एकर उसाला आग लागून पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती बरड पोलीस दुरक्षेत्रातून दिली आहे यामुळे सुमारे अकरा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करणार : राजकुमार बडोले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर मी मंत्री झालो नसतो त्यांच्या पुण्याईने आम्हाला चांगले दिवस आल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन गेल्या अडीच वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन सामाजिक विकासाचे काम करीत आहोत, डॉ .बाबासाहेबाच्या शिक्षणाची देण म्हणुन सर्वसामान्यांना न्याय या भुमिकेतुन आम्ही काम करत असल्याचे सांगत राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग डॉ .आंबेडकरांच्या विचाराने चालविला जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री ना . राजकुमार बडोले यांनी केले.
पिंपरदजवळ एसटी व मालट्रकच्या अपघातात २५ जण जखमी
विडणी : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर पिंपरद, ता. फलटण येथे ओम्नी गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी व मालट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 जण जखमी झाले. यातील 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना फलटण येथील उपजिल्हा व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवार पेठेतील युवकाच्या खुनानंतर फलटणमध्ये तणाव
फलटण: मंगळवार पेठ (फलटण) येथील सोनल अहिवळे याचा खून झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर सोनलचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सोनलच्या नातेवाईकांसह नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे.
वाठार स्टेशन येथील हॉटेल महाराजाजवळ झालेल्या अपघातात 15 जखमी
पिंपोडे बुद्रुक : वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथे सातारा-लोणंद रस्त्यावर दोन एस.टी.बस व जीप या वाहनांचा तिहेरी अपघात झाला. अपघातात तिन्ही वाहनांच्या चालकांसह बारा प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
जोशी हॉस्पीटलतर्फे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सातारा : जिल्ह्यातील फलटण येथील अस्थिरोग उपचार व कृत्रीम सांधेरोपण शस्त्रक्रिया साठी सुप्रसिध्द असलेल्या अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि. च्या वतीने येत्या १२ ऑक्टोबर २०१७ रोजी साजर्‍या केल्या जाणारा जागतीक अस्थिरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या कामचुकार अधिकारी व ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढणार: चेतन कांबळे
फलटण : शारदानगर कोळकी परिसरात रात्रभर वीज नव्हती. महावितरणच्या अधिकार्‍यांना संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे रडगाणे गायले गेले. कोळकी येथे महावितरणचे सब-स्टेशन आहे. तसेच येथून उच्चदाब वीज वाहिन्या मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. असे असतानाही येथे महावितरणने स्थानिक देखभालीसाठी जादा कर्मचार्‍यांची नेमणूक केलेली नाही. वीजचोरी आणि वसुली होत नसल्याचं कारण पुढं केलं जात असलं तरी वीज टंचाई हेच वीज कपातीचं खरं कारण असल्याचं चेतन कांबळे यावेळी म्हणाले.
गोखळी ओढ्याला पूर आल्याने फलटण-आसू मार्गावरील वाहतूक बंद
फलटण : गोखळी (ता.फलटण) परिसरात पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे गोखळी ओढ्यास पूर आला आहे. त्‍यामुळे फलटण-आसू मार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासून बंद करणत आली आहे. आसू, शिंदेनगर मुक्कामी गेलेल्या बस गाड्या अडकून पडल्याने सर्व वाहतूक बंद झाली आहे.
फलटण तालुक्यातील तांबवेत वादळी पावसामुळे अकरा घरांची पडझड
लोणंद : तांबवे (ता. फलटण) येथे रविवारी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसाने सुमारे 11 घरांच्या भिंती व छत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसरपंच विशाल शिंदे यांनी केली आहे.
एसटीच्या धडकेने चिमूरडी जागीच ठार
फलटण : जिंती, ता. फलटण येथे सोमवारी सकाळी आई व मुलगी फलटणच्या दिशेने पायी चालत येत असताना जिंतीकडून फलटणकडे येणार्‍या एसटीने मागून धक्का दिल्याने सहा वर्षांची मुलगी ठार झाली. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुलास मारल्याच्या रागातून शिक्षकाला बेदम मारहाण
लोणंद : पाडेगाव फार्म, ता. फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकास ‘मुलास का मारले? या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी व चपलेने मारहाण केल्याप्रकरणी वडील, मुलगा व इतर अनोळखी चार ते पाच जणांविरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या व यशस्वी उद्योजक व्हा: संतोष मांढरे
सातारा: तरुणांसाठी मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेशी संपर्क करुन मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या आणि यशस्वी उद्योजक बना, असे आवाहन दहिवडी येथील उप कोषागार अधिकरी संतोष मांढरे यांनी आज केले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.