‘सातारा टुडे’चा दणका; ‘श्रीराम’च्या निवृत्त कामगारांच्या घामाचे दाम खाणारे ‘दाढीवाले’ अखेर गुडघ्यावर
फलटण येथील ‘श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटी फंडाचे सुमारे सहा कोटी रुपये गेल्या सहा वर्षापासून घशात घालणार्‍या ‘श्रीराम’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दाढीवाल्या बाबांच्या विरोधात श्रीरामचे सुमारे 150 निवृत्त कामगार सलग गेल्या 15 दिवसांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी फलटण येथील अधिकारगृहासमोर उपोषणास बसले होते. याची दखल घेवून सातारा टुडे ने याबाबत आवाज उठवून कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दाढीवाल्या बाबांनाही भाजून काढले होते. या प्रकरणात प्रशासनानेही ‘शेपटी’ घातल्यामुळे या कामगारांना न्याय मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू, सातारा टुडे ने याबाबत आवाज उठवून फलटण तालुक्यामध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे ‘मनाची नाही, तर जनाची’ लाज बाळगून श्रीरामच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दाढीवाल्या बाबांनी काल दुपारी या निवृत्त कामगारांसमोर गुडघे टेकवून तडजोडीचा मार्ग अवलंबलेला आहे.'
सातारा टुडे'चे ‘ते’ वृत्त ठरले खरे; फलटण येथील लाचखोर तलाठ्यावर गुन्हा दाखल
फलटण येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी फलटण तहसिल कार्यालयातील उपविभागीय अधिकारी, फलटण यांनी नेमलेल्या अवैद्य गौण खनिज प्रतिबंध पथकातील तलाठ्यावर पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. परंतू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होणार आहे, याची कुणकूण लागल्याने संबंधित तलाठ्याने मागणी केलेली रक्कम न स्वीकारताच पळून गेला होता. या प्रकरणातून वाचण्यासाठी संबंधित तलाठ्याने फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरच शासकीय कामात अडथळा आणणे व ऍट्रोसिटी अन्वये तक्रार दाखल केली होती. दरम्यान, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आज दुपारी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्या लाचखोर तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हातातील पिशवीला हिसका मारून २ लाख लंपास
शहरातील मध्यवर्ती व नेहमी गजबजलेल्या नरसिंह चौकातून दोन महिला चालत जात असताना एका मोटारसायकलस्वाराने हातातील पिशवीसह दोन लाख रुपये चोरून नेले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
फलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात
मुंबईहून आटपाडीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला वडजल (ता. फलटण) येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
‘श्रीराम’च्या निवृत्त कामगारांचे घामाचे दाम खाणार्‍या 'दाढीवाल्या' प्रवृत्ती आता ठेचायलाच हव्यात !
फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या (अर्कशाळेसहित) सुमारे दीडशे पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचे कारखान्याने ग्रॅज्युईटी फंड सुमारे सहा वर्षांपासून थकविल्यामुळे येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज हे सर्वच कामगार सत्तरीच्या घरात आहेत. प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये ग्रॅज्युईटी फंड विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांनी परस्पर हाणल्यामुळे या कामगारांचे घामाचे 'दाम' गेल्या सहा वर्षापासून या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दाढीवाल्या बाबांच्या घशामध्ये अडकले आहेत. राज्यभरात निर्विकार चेहरे मिरविणारे फलटण नरेश, त्यांचे दाढीवाले बंधू मढ्याच्या टाळूवरचे लोणीही सोडत नाहीत. अशा प्रवृत्तींच्या रक्तातच 'हरामखोरपणा' असल्यामुळे हे कामगार सुमारे आठ दिवसांपासून फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत. परंतू प्रशासनाकडून राजकीय दबावापोटी या कामगारांची साधी दखलही घेण्याची तसदी कोणी घेताना दिसत नाही.
नीरा देवधर जो पूर्ण करेल त्याच्या सोबत आम्ही: रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण, खंडाळा व माळशिरस तालुक्यासाठी वरदान ठरत असणारा नीरा देवधर प्रकल्प जो पक्ष पूर्णत्वास नेईल त्याच्या बरोबर आम्ही येऊ असे मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी इस्लामपूर तालुका माळशिरस येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
खोटे गुन्हे दाखल करुन विरोधकांना संपविण्याचा फलटणमधील सत्ताधार्‍यांचा नवीन 'फंडा'
शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतू एका निर्दोषाला शिक्षा होवू नये, असा आपला कायदा सांगतो. कायद्याने वागा, कायद्याने चाला असा संदेश आपल्या लोकशाहीने सामान्यजनांना दिलेला आहे. मात्र, काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी कायद्याचा कसा दुरुपयोग करतात, याचे उत्तम उदाहरण सध्या फलटण तालुक्यात बघावयास मिळत आहे. ज्याच्यावर खरोखरच अन्याय-अत्याचार झाला आहे, त्याला फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागते. परंतू गुंडापुंडांच्या व राजकीय व्यक्तींच्या खोट्या तक्रारींसाठी मात्र फलटण शहर पोलिसांकडून पायघड्या घातल्या जातात.
स्वराजला अल्ट्रामेगाची मान्यता; आणखी ११०० कोटी गुंतवणार
निंभोरे (ता.फलटण) येथील स्वराज इंडिया अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजला अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा दर्जा मिळाला आहे. याबाबतच्या कराराची मूळ प्रत नुकतीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. दरम्यान, यामुळे तालुक्यातील कृषी क्षेत्राला औद्योगिक झळाळी मिळणार आहे.
फलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक
जेष्ठ नागरिकांना मासिक ३ हजार रुपये पेंशन मिळवून देण्याचे अमिष दाखवून काही लोक शहरातील व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फलटणमध्ये तहसील व प्रांत कार्यालयाच्या परिसरात काही लोकांनी जेष्ठ नागरिकांना फसवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अशा लोकांना ताबडतोब पकडून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी जेष्ठ नागरिक करू लगले आहेत.
फलटण : गुटखा व्यापाऱ्याच्या बंगल्यावर छापा
शहरातील लक्ष्मी नगर परिसरात असणाऱ्या एम. आरमगम या बंगल्यावर आज सकाळी पावणे बारा वाजण्‍याच्या सुमारास पोलिस व अन्न व भेसळ विभाग सातारा यांनी छापा टाकला. यामध्ये गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. अन्न व भेसळ अधिकारी व शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी केली असून गुटखा व रोख पैसे तसेच दागिने याचे मोजमाप सुरू आहे.
ऊस ट्रॉलीच्या धडकेत १ ठार
आसू, पवारवाडी (ता. फलटण) येथे उसाच्या ट्रॉलीला धडक बसून एक जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
टाकळवाड्यात दोन गॅस टाक्यांचा स्फोट ; लाखो रुपयांचे नुकसान
टाकळवाडा ता.फलटण येथे शॉर्टसर्किटमुळे पाच घरांना भीषण आग लागून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांना आग लागल्यानंतर काही वेळातच घरात असणाऱ्या गॅस सिलेंडरनीसुद्धा पेट घेतला त्यानंतर कानठळ्या बसवणारे स्फोट झाले.
सातारा टुडे'चा दणका; फलटणमधील बेकायदेशीर ओपन स्पेस बांधकामाप्रकरणी गुन्हा दाखल
फलटण येथील माळजाई मंदिरालगत सोसायटीसाठी राखीव असणार्‍या सुमारे 13 गुंठे भूखंडावर येथील श्रीमती यशोधराराजे नाईक-निंबाळकर व त्यांचे सहकारी जयंत गोपाळ जोशी, मिलींद गोविंद सहस्त्रबुद्धे या सर्वांनी संगनमत करुन बोगस दस्तावेज तयार करुन त्या भूखंडावर निवासी व व्यावसायिक इमारत बांधकाम सुरु करुन बाजूला असलेल्या सुमारे 53 गुंठे जागेलाही पत्र्याचे कुंपन केले होते. यासंदर्भात फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. सचिन शिंदे व संबंधित सोसायटीमधील नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी, सातारा व फलटण नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या संदर्भात लेखी तक्रार केली होती. या अनुषंगाने फलटण नगरपालिकेतील विरोधी पक्षामधील नगरसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. तसेच 26 जानेवारी रोजी फलटण येथील अधिकारगृहासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे फलटण पालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले होते. या संदर्भात सातारा टुडे ने वारंवार याबाबत सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे काल दुपारी माळजाई गृहनिर्माण संस्था भाग 2 च्या सर्व पदाधिकार्‍यांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
कॉँग्रेसच्या संविधान बचाव रॅली मध्ये फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा : जयकुमार शिंदे
संपूर्ण राज्यामध्ये दि. 26 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात संविधान बचव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी याबाबतची बैठक जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन झाली.
फलटणमध्ये कोळकी हद्दीत कंटेनर पलटी
सांगोल्‍यावरून वाशी मुंबईकडे डाळिंब घेऊन जाणारा कंटेनर कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर पलटी झाला. या अपघातात चालक गंरीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कौसर नासिर मिया आलम (वय 28 रा. झारखंड) असे जखमी झालेल्‍या चालकाचे नाव आहे.
फलटणमधील राखीव भुखंडावर अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत : समशेरसिंह नाईक-निंबाळकर
येथील सोसायटीसाठी राखीव असलेल्या भुखंडावर श्रीमती यशोधराराजे उदयसिंह नाईक-निंबाळकर यांनी बोगस दस्तावेज तयार करुन त्या भुखंडावरच निवासी आणि व्यवसायिक इमारत उभारण्याचे काम फलटणच्या राजे गटाच्या पाठिंब्याने सुरु केले होते. त्याला फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी मान्यता दिली नसतानाही मुख्याधिकार्‍यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून बिनदिक्कतपणे हे काम सुरु आहे.
माहिती अधिकार अर्जामुळे फलटणमधील प्राथमिक शिक्षक लागले कामाला
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर त्या गोष्टीचा ऊब येतो. त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकार कायद्याचा जेवढा फायदा आहे, त्यापेक्षा कित्येकपटीने तोटेही असल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही महाभाग जाणीवपूर्वक त्रास अथवा ब्लॅकमेल करण्यासाठी या चांगल्या कायद्याचा विनाकारण दुरुपयोग करीत असतात. असाच काहीसा प्रकार फलटण तालुक्यात घडला आहे.
फलटण न.पा. मुख्याधिकारी गो.रा. खैरनार 'मूड'मध्ये ; अतिक्रमणावर चालवणार बुलडोझर
येथील शिवाजी चौक, नाना पाटील चौक, डेक्कन चौक, महावीर चौक, रिंग रोड, याठिकाणी असणारे अतिक्रमण आठ दिवसात काढा अन्यथा अतिक्रमणाला बुलडोजर लावणार असे आज मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या व्यापर्‍यांच्या बैठकीत सांगितले आहे. मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी यापूर्वी नियुक्तीवर असताना सांगोला आणि शिर्डीमध्ये अतिक्रमणावर हातोडा चालवलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच धर्तीवर मुख्याधिकारी जाधव फलटणमध्ये मुंबई पालिकेचे तत्कालीन 'हातोडा' फेम आयुक्त गो.रा. खैरनार मूडमध्ये आले असल्याचे बोलले जात आहे.
सुपारी देवून गुंडाकरवी केली विद्यार्थ्यास बेदम मारहाण; फलटणमधील प्रतिष्ठीत हायस्कूलच्या मुख्याध्यापकाचा प्रताप
येथील प्रतिष्ठीत समजले जाणार्‍या एका हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकाने जुना राग मनात ठेवून इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यास गुंडांकरवी सुपारी देवून गंभीर मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वडिलांच्या ट्रँक्टरखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू
वडील ट्रँक्टर मागे घेत असताना पाठीमागच्या चाकाखाली तेरा महिन्यांचा चिमुकला सापडल्यामुळे 'त्या' चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विडणी ता. फलटण येथे घडली आहे. या घटनेमुळे विडणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.