बारामतीत 17 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून आत्महत्या
बारामती- येथे 11 व्या वर्गातील विद्यार्थिनीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारामतीच्या सूर्यनगर येथील ही घटना असून त्या मुलीचे नाव सायली उर्फ
सोमेश्‍वरकडून २८५0 रु. उच्चांकी उचल
सोमेश्‍वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने सन २0१६-१७ च्या चालू गळीत हंगामासाठी राज्यात विक्रमी २८५0 रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. मागील आठवय़ात सोमेश्‍वरच्या संचालक मंडळाने चालू गळीत हंगामासाठी २५५0 रु. प्रति टन उचल जाहीर केली होती.
बारामती येथे ३५५ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे उद्घाटन
दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर बारामती नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधलेल्या ३५५ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे उद्घाटन केले.
बारामती दूध संघ अध्यक्षपदी सतीश तावरे तर उपाध्यक्षपदी वैभव मोरे बिनविरोध
बारामती: तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी सतीश हरिभाऊ तावरे यांची तर उपाध्यक्षपदी वैभव शंकरराव मोरे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रशांत सुर्यवंशी व सहायक निवडणूक एस. एस. कुंभार यांच्या अधिपत्याखाली मंगळवारी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात अजित पवार यांच्या
छगन भुजबळ अटकप्रकरणी बारामतीत निषेध मोर्चा
बारामती: दिल्लीतील महाराष्ट्र सदन व मनी लॉड्रींग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अंमलबजावणी संचलनयाने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ मंगळवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्यावतीने मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.
सौ. विमल जाधव यांचे कार्य दिशादर्शक: जगताप
सातारा: आज स्पर्धेच्या युगात जो- तो सुखाच्या मागे धावत असतो. मात्र सुखाबरोबर दुख:चा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. पुरुषांच्या बरोबरीने आज महिलाही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. वाठार स्टेशन येथील दुर्गा खानावळीच्या संचालिका सौ. विमल जाधव यांनी एक सफल महिला उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला असून त्यांचे कार्य समस्त महिलांसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार बारामती एस. टी. आगाराचे प्रमुख विलास जगताप यांनी
जागेच्या ताब्यासाठी दलित बालकाला ट्रॅक्टरने चिरडले
बारामती: स्वत:चा बंगला बांधण्यासाठी शेजारची एेसपैस जागा ताब्यात घेण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका दलित कुटुंबाला दहशतीने घरदार साेडून गावातून पळवून लावण्याचा प्रयत्न केला जात हाेता. यातूनच या कुटुंबातील सहावर्षीय मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जिवे मारण्यात आले. बारामती तालुक्यातील लिमटेक गावात सोमवारी सकाळी ही संतापजनक घटना घडली.
एफआरपी लवकर मिळावी नाहीतर आत्महत्येस परवानगी द्या
पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी १५०० रूपयांचा पहिला हप्ता जाहीर केला परंतु बारामती परिसरातील कोणत्याही कारखान्याने ऊस उत्पादकांना पहिली उचल दिली नाही. उलटपक्षी काही कारखान्याचा मागील वर्षीच्या एफआरपीचा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे येथील शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आला आहे. काही ऊस उत्पादकांनी एफआरपी लवकर मिळावी अन्यथा आत्महत्येस परवानगी द्यावी, असे पत्र प्रांताधिकार्यांलना दिल्याने बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.
कृषीपंपाचे वीजबिल माफ करण्याची मागणी
बारामती: येथील जिरायती भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. शासनाने या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करावे तसेच चारा डेपो सुरु करावेत या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.