आता व्हॉट्सअॅपवरही ग्रुप कॉलिंग फीचर
लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देते. आता व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंगचे फिचर देणार आहे.या फिचर बाबात युझर्समध्ये चांगली चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओची धमाकेदार ऑफर
रिलायन्स जिओने प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार निर्णय घेतला आहे. टेलिकॉम क्षेत्रातील किंमतयुद्धात महत्वपूर्ण सहभाग नोंदवणार्‍या जिओने आता 26 जानेवारीपासून त्यांच्या 1 जीबी आणि 1.5 जीबी प्रतिदिन डाटा वापरकरर्त्यांना आणखी 500 एमबी लिमिटवाढ दिली आहे. कंपनीच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. तर रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत 26 जानेवारीपासूनच सध्याच्या 98 रूपये पॅकची मुदत 14 दिवसांवरून 28 दिवसांपर्यंत वाढवली आहे. जिओने ग्राहकांना नेहमीच वाढीव लाभ दिले आहेत. प्लॅननुसार 50 टक्के जादा डाटा देतानाच जिओने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 50 रूपये कमी प्लॅनवर आकारले आहेत. 26 जानेवारीपासून 1 जीबी डाटा मर्यादा 1.5 जीबी होईल, तर 1.5 जीबी डाटा मर्यादा 2 जीबीपर्यंत वाढणार आहे.
एका क्लिकवर महिनाभराचे कॉल डिटेल्स
मोबाईलमधील जुने कॉल डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे खूप कठीण काम आहे. आता मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर ही प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे. आता mubble app नावाच्या अ‍ॅपमुळे जुने कॉल डिटेल्स शोधणे सहज शक्य होणार आहे. तुम्हाला 7-30 दिवस जुने कॉल डिटेल्स mubble app या अ‍ॅपमुळे शोधणे शक्य होणार असून ते पीडीएफ फाईलच्या स्वरूपात मिळतील. जो इमेल आयडी अ‍ॅपमध्ये द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अवघ्या दोन मिनिटांत परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील.
भारतात लवकरच मिळणार ४ कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा हा स्मार्टफोन !
ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.
कोल्हापूरातील करवीर वाचन मंदिरात अंधांसाठी अब्रार सॉफ्टवेअर
करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत. ब्रेल ग्रंथालयात विविध नामवंत लेखकांची पुस्तके, चरित्रे आहेत. या पुस्तकांनी अंध व्यक्तींच्या जीवनात जगण्याची असीम जिद्द निर्माण केली. आठवड्यातून किमान चार ते पाच अंध व्यक्ती या ग्रंथालयात येऊन वाचनाचा आनंद मिळवितात.
नव्या वर्षी 'या' मोबाईलमध्ये होणार व्हॉट्सअॅप बंद !
व्हॉट्सअॅप आज आपल्या आयुष्यातील एक भाग झालाय.सकाळी उठल्या उठल्या आपण सगळेच पहिलं दर्शन घेतो ते व्हॉट्सअॅपचं. व्हॉट्सअॅप थोड्या वेळ बंद पडलं, तरी राहवत नाही. पण आता कदाचित तुमच्या फोनवरचं व्हाॅट्सअप बंद कायमचं बंद पडू शकतं.
व्हॉटस् अ‍ॅपवर आता मित्रांचा ठावठिकाणाही कळणार!
सध्या व्हॉटस् अ‍ॅपशिवाय अनेकांचे पान हलत नाही. जगभर लोकप्रिय असलेल्या या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक नवे फिचर्स आणले जातात. व्हिडीओ कॉलिंगसारख्या अशाच काही वैशिष्ट्यांमुळे व्हॉटस् अ‍ॅप दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आहे. आता आणखी एक नवं फिचर व्हॉटस् अ‍ॅपने यूजरसाठी आणलं आहे. या फिचरमुळे आता व्हॉटस् अ‍ॅपवरून लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहे. अनेक द‍ृष्टीने हे फिचर महत्त्वाचं ठरणार आहे.
स्वस्त iPhone चं गणित अन् कामगारांचा छळ
बीजिंग: आयफोन ५ एस आणि आयफोन एसई या दोन हँडसेटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. या दरकपातीनंतर आयफोन ५ एस १५ हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 'अॅपल'नं हालचाली सुरू केल्या आहेत.
व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण वाढले
मुंबई : गेल्या दोन महिन्यात व्हॉट्सअॅपवरील गोपनीय व्हिडिओ, फोटो आणि फाईल्स हॅक करुन त्यांचा गैरवापर झाल्याच्या 50 हून जास्त तक्रारी मुंबई सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोडचा अॅक्सेस मिळवून व्हॉट्सअॅप अकाऊण्ट सहजरित्या हॅक करता येतं, असा दावा सायबर पोलिसांनी केला आहे.
जिओचं समर सरप्राइज; 100 जीबी डेटा मिळणार मोफत
मुंबई: रिलायन्स जिओ प्राइम ऑफर 15 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या यूजर्सनं प्राइम मेंबरशीप घेतली नव्हती. त्यांना ती घेता येणार आहे. याबरोबरच जिओनं आपल्या ग्राहकांसाठी समर सरप्राइज ऑफरही आणली आहे.
शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम
मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि Mi.comवर या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. पहिल्याच दिवशी विक्रीमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोन एक नवा विक्रम रचला आहे.
व्होडाफोनचा 346 रुपयात दररोज 1 जीबी 4G डेटा
मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात 'सॅमसंग' प्रमुखांना अटक
सेऊल: जगभरात स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा दबदबा निर्माण करणाऱ्या सॅमसंग कंपनीचे प्रमुख जे. वाय. ली यांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना लाच देऊ केल्याचा आरोपातंर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.
Nokia 3310 पुन्हा लॉन्च होणार
नवी दिल्ली: Nokia आपला अँड्रॉइड स्मार्टफोन Nokia 6 लॉन्च करून टेक मार्केटमध्ये री-एंट्री केली आहे. फ्लॅशसेलमध्ये या
‘आयडिया’ला ‘जिओ’चा फटका, 3 महिन्यात 385 कोटींचा तोटा
नवी दिल्ली : रिलायन्स जिओमुळे भारतातील मोठ-मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना फटका बसला आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्ये
मोटोरोलाच्या मोटो जी5 प्लसचे फोटो, फीचर्स लीक
मुंबई: मोटोरोलचा आगामी स्मार्टफोन मोटो जी5 प्लसचे फोटो आणि फीचर्स लीक झाले आहेत. मोटोरोला जी5 प्लस स्मार्टफोनच्या कथित फोटोबाबत टेकअपडेट3 नं माहिती दिली आहे. या फोटोमध्ये डिव्हाइसच्या रिअरवर एक फिंगरप्रिंट सेन्सर
आयफोन 6 अवघ्या 9,990 रुपयात
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आयफोन 6वर एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल 22,000 रु. ची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन अवघ्या 9,990 रुपयात तुम्ही खरेदी करु शकता.
'नूबिया Z 11' आणि 'नूबिया N 1' भारतात उपलब्ध
नवी दिल्ली : नूबिया कंपनीचे दोन जबरदस्त स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. ‘नूबिया Z 11’ आणि ‘नूबिया N 1’ हे दोन स्मार्टफोन सोमवार म्हणजे आजपासून अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
ग्राहकांना ४ जी सेवा ३१ मार्चपर्यंत मोफत
मुंबई: रिलायन्स जिओ वेगाने प्रगती करत असून गेल्या काही काळात कंपनीने फेसबुक, व्हॉटसअॅप, स्काईपपेक्षा वेगाने प्रगती केली आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी सांगितले. ते गुरूवारी मुंबईत आयोजित
नोटाबंदीनंतरच्या ३ दिवसात तब्बल १ लाख आयफोन विकले गेले
कोलकाता: नोटाबंदीचा निर्णय जसा जाहिर झाला, तशी सोन्याची खरेदी वाढली. पण आणखी एका कंपनीची या नोटाबंदी निर्णयामुळे भरभराट झाली आहे. ती कंपनी म्हणजे अॅपल. ट्रेडच्या अंदाजानुसार, नोटाबंदीनंतरच्या ३ दिवसात तब्बल १ लाख

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.