राष्ट्रवादीच्या रथात अनेक महारथी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.
चंचळीत ऊस ट्रॉलीच्या धडकेत युवक ठार
चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी दिलीप कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले.
अंडर:१९ विश्वकप क्रिकेट : भारत उपांत्यपूर्व फेरीत
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत
भारताचा आणखी एक दणदणीत विजय
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पापुआ न्यू गिनीवर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील कर्णधार पृथ्वी शॉने सुपर कामगिरी केली
टी-20 मध्ये अंपायर्सची गंभीर चूक
कर्नाटकच्या डावादरम्यान अंपायर्सनी केलेली चूक हैदराबादच्या संघाला चांगलीच महागात पडली. या चूकीमुळे हैदराबादला अवघ्या दोन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटकने हैदराबादच्या संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला
उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या
उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा वाढीव विद्युत भार त्वरित उपलब्ध करुन देण्याबरोबरच हाय टेन्शन लाईनचे काम येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. आ. जयकुमार गोरे यांच्या मागणीवरुन उरमोडी योजनेच्या वाढीव विद्युत भार आणि एच टी लाईन टाकण्याच्या कामाबाबत उर्जामंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आ. जयकुमार गोरे, महापारेषणचे मुख्य कार्यकारी संचालक राजूकुमार मित्तल, प्रकल्प संचालक आर. डी. चव्हाण, संचालन संचालक जी. टी. मुंडे, अधिक्षक अभियंता सिन्हा, कार्यकारी अभियंता गायकवाड आदींची उपस्थिती होती.
भारताची स्किइंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी
भारताच्या आंचल ठाकुरने इतिहास रचाला. तिने आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. याचबरोबर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे. आंचल ठाकुर हिमाचल प्रदेशची खेळाडू आहे.
युसुफ पठाणला बीसीसीआयने केलं निलंबित
गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं निलंबन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी
महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने धक्कादायक कामगिरी करत रेल्वेची ३२ वर्षांची विजयी परंपरा खंडित करताना जेतेपद पटकावले.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. विराट कोहली आयपीएलचे सामने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातून खेळतो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहलीला आयपीएलसाठी 17 कोटी रूपये दिले आहेत. आयपीएल 2018च्या रिटेन डेडलाइन वर आरसीबीने कॅप्टन कोहलीला टीममध्ये कायम ठेवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. आरसीबीसोबत खेळायचे 17 कोटी रूपये घेऊन विराट कोहलीने रायसिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकलं आहे.
... तरी भारताचे अव्वल स्थान कायम
द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिन्ही कसोटी गमावल्या, तरी जागतिक क्रमवारीतील टीम इंडियाचे पहिले स्थान कायम राहीलच मात्र द. आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानासाठी टीम इंडियाच्या बरोबरीला येईल. सध्या टीम इंडिया 124 गुणांसह अव्वलस्थानावर असून, द. आफ्रिका 13 गुणांनी पिछाडीवर आहे.
पुण्यातील 19 वर्षांची तरुणी सायकलवरुन करणार जगभ्रमंती
पुण्यातील 19 वर्षाची तरुणी 130 दिवसांमध्ये सायकलवरुन जगभ्रमंती करणार आहे. हा तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास आहे. मूळची पुण्याची असणाऱ्या या 19 वर्षीय मुलीचे नाव वेदांगी कुलकर्णी असे आहे. जगभरातील प्रत्येक देशांमध्ये सायकलवरुन प्रवास करुन ती नवा विक्रम आपल्या नावे करण्याच्या तयारीत आहे. वेदांगी कुलकर्णी इंग्लंडमध्ये बॉर्नमाऊथ युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स विभागात दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. वेदांगी आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरापासून सुरुवात करणार आहे. वेदांगीला सायकलवरुन स्वार होत संपूर्ण जगाला सर्वात वेगवान फेरी मारुन नवा विक्रम आपल्या नावे करायचा आहे. यासाठी तिनं आपली तयारीही सुरु केली आहे. ती रोज 320 किमी सायकल चालवण्याचा सराव करत आहे. विशेष म्हणजे जगभ्रमंतीसाठी वेदांगीनं कोणत्याही संघटनेचा पाठिंबा घेतला नाही.
बॉक्सिंगमध्ये साताºयाचे नाव जगभर करा : गोपाल देवांग यांचे गौरवोद्गार
‘मेरी कोम, विजेंद्रसिंह यांच्यापेक्षा महाराष्ट्रातूनही चांगले बॉक्सर घडू शकतात. हा खेळ फिजिकल फिटनेस येतो. तसेच जेणे करून ते तुमचं, तुमच्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करतील,’ असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांनी व्यक्त केले.सातारा तालीम संघाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७७ व्या युवा मुलांच्या व १६ व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग बोलत होते.
मुंबई उपनगर, सांगली, ठाण्यासह पुणे अंतिम फेरीत
येथील जोशी मैदानात सुरू असलेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मान्यताप्राप्त, रोटरी क्लब चिपळूण व चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन आयोजित 45 व्या कुमार व मुली 18 वर्षांखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी ‘आमदार चषक’ खो-खो स्पर्धेत कुमार गटात अंतिम फेरीत मुंबई उपनगरचा सामना सांगलीशी तर मुलींमध्ये गतवर्षीप्रमाणेच ठाण्याचे द्वंद्व गतविजेत्या पुण्याशी रंगणार आहे.
महाराष्ट्र केसरीत खटावच्या प्रशांतला ब्रॉंझपदक
महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्याच्या चारच दिवस आगोदर प्रशांतच्या वडीलांचे निधन झाले होते. कुस्तीमधले मुख्य प्रेरणास्थान त्याचे वडीलच होते. त्यांच्या जाण्याने प्रशांतची स्पर्धेत सहभागी होण्याची मानसिकताच राहिली नव्हती. तथापि, समस्त जाखणगावकर आणि कुस्तीपरिवारातील त्याच्या मित्रांनी दिलेल्या मानसिक पाठबळामुळे त्याचे मनोर्धैर्य पुन्हा उंचावले. स्पर्धेत मिळवलेले पदक हे त्याने त्याच्या स्वर्गीय वडीलांना अर्पण केले.
टी-२० मालिकेने हात दिला !
जवळपास वर्षभराच्या अंतरानंतर पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविणारा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने प्रभावी कामगिरीही करून दाखविली. ही मालिका आपल्याच्या कारकीर्दीला नवे वळण देणारी ठरली अशी भावना उनाडकटने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर वानखेडे स्टेडियमवर व्यक्त केली. या सामन्यात तो सर्वोत्तम ठरला.
अभिजित कटके महाराष्ट्र केसरी
पुण्याच्या अभिजित कटके याने सातारच्या किरण भगतला 10 वि. 7 गुणांनी नमवून 61 महाराष्ट्र केसरीचा किताप पटकाविला. शेवटच्या 50 सेकंदात कुस्तीला कलाटणी देऊन अभिजितने या किताबाला गवसणी घातली. गतसाली अभिजितला उपमहाराष्ट्र केसरीवरच समाधान मानावे लागले होते. सन 2009 नंतर पुण्याला तब्बल आठ वर्षांनी कटकेच्या रूपाने हा किताब मिळाला. ही रोमहर्ष लढत पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र लोटला होता.1 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भूगाव येथील मामासाहेब मोहोळे क्रीडानगरीत स्पर्धा झाली.
खासदार करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबद, नाशिक संघांचे वर्चस्व
येथे सुरू असलेल्या 20 व्या राज्य युथ अजिंक्‍यपद व निवड चाचणी खासदार करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबद, नाशिक संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत वर्चस्व सिद्ध केले.
पुण्याचा अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी; अंतिम फेरीत किरण भगतवर केली मात
यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब पुणे शहर विभागाचा आघाडीचा मल्ल अभिजित कटके याने जिंकला आहे. अभिजितने त्याचा मित्र व साताऱ्याचा किरण भगत याला फायनलमध्ये धूळ चारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत ही मानाची कुस्ती झाली.
सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा : सुजीत शेडगे
जीवनात बुध्दीमत्तेबरोबरच शारिरिक जडणघडणही तितकीच महत्वाची आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, ध्येय, कष्ट आणि सातत्यही हवेच. जीवनात खेळांचे महत्व मोठे आहे. आपण सर्वांनी सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा.आज विजय मिळवला तर हुरळून जाउ नका आणि हरला तर खचून जाउ नका, असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ मल्लखांबपटू आणि मार्गदर्शक सुजीत शेडगे यांनी काढले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.