सुनीत जाधवचा परफेक्ट पंच! सलग पाचव्यांदा ठरला महाराष्ट्र श्री
डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणा-या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.
भारताचा ऐतिहासिक विजय, मालिका ५-१ ने जिंकली
भारतीय संघाने सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव करत मालिका ५-१ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवत २०४ धावांचं लक्ष्य भारताला दिलं. प्रत्युत्तरात भारताने फक्त ३२.१ षटकांत २ गडी गमवत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.
सातारचा केदार देशमुख राष्ट्रीय फुटव्हॉली स्पर्धेत चमकला
केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
खातगुणच्या रुचिरा लावंडला शिवछत्रती क्रीडा पुरस्कार जाहीर
सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा डबल धमाका
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या एकेरी आण दुहेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने भारताने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने हाँगकाँगला ३-२ अशी मात दिली. सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेचे नेतृत्व सिंधूकडे सोपवण्यात आले असून नेतृत्वाला साजेशा खेळ करत सिंधूने भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.
महाराष्ट्राचा दबदबा ; ७ पदकांची कमाई
खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या 7 व्या दिवशी, मंगळवारी भारोत्तोलनात महाराष्ट्राच्या जेर्मी लालरीनुंगा व तृप्ती माने यांनी सुवर्णपदके पटकावली. यासह मुले व मुलींच्या भारोत्तोलनात महाराष्ट्राने 2 रौप्य व 3 कांस्यपदकांची कमाई करून महाराष्ट्राला पदकतालिकेत आघाडी मिळवून दिली. राज्याला एकूण 59 पदके मिळाली आहेत.
ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळून भारताने चौथ्यांदा जिंकला अंडर-19 वर्ल्ड कप
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे U-१९ विश्वचषकात भारताला विजयासाठी २१७ धावांचं आव्हान मिळालेलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार जेसन संघाने घेतलेला फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही.
मेरी कोमची सोनेरी कामगिरी
भारताची अव्वल महिला बॉक्सिंग खेळाडू एम. सी. मेरी कोम, विलाओ बसुमतरी, लोवलिना बोगरेहेनने इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. याचप्रमाणे एल. सरिता देवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांमध्ये संजीतने सुवर्ण कामगिरी केली. त्याचा प्रतिस्पर्धी जागतिक पदकविजेत्या शिवा थापाने माघार घेत रौप्यपदकावर समाधान मानले.
बजेट सर्वांना खूश करणारं नसेल; पंतप्रधान मोदींचे संकेत
केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारं अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारं नसणार आहे. यामध्ये सरकारकडून आर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (21 जानेवारी) दिलेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
​दृष्टिहीनांचा वर्ल्डकप भारताने जिंकला; अंतिम सामन्यात पाकिस्तानला चारली धूळ
भारतीय संघाने रोमहर्षक लढतीत पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत दृष्टिहीनांच्या वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. सुनील रमेश भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. त्याने तडाखेबंद ९३ धावांची खेळी केली. शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.
सनातन संस्थेकडून व संघ परिवाराकडून माझ्या जिवितास धोका : पद्मश्री लक्ष्मण माने
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची उपशाखा असणार्‍या सनातन संस्थेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचे पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादीच्या रथात अनेक महारथी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.
चंचळीत ऊस ट्रॉलीच्या धडकेत युवक ठार
चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी दिलीप कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले.
अंडर:१९ विश्वकप क्रिकेट : भारत उपांत्यपूर्व फेरीत
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत
भारताचा आणखी एक दणदणीत विजय
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पापुआ न्यू गिनीवर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील कर्णधार पृथ्वी शॉने सुपर कामगिरी केली
टी-20 मध्ये अंपायर्सची गंभीर चूक
कर्नाटकच्या डावादरम्यान अंपायर्सनी केलेली चूक हैदराबादच्या संघाला चांगलीच महागात पडली. या चूकीमुळे हैदराबादला अवघ्या दोन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटकने हैदराबादच्या संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला
उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या
उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा वाढीव विद्युत भार त्वरित उपलब्ध करुन देण्याबरोबरच हाय टेन्शन लाईनचे काम येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. आ. जयकुमार गोरे यांच्या मागणीवरुन उरमोडी योजनेच्या वाढीव विद्युत भार आणि एच टी लाईन टाकण्याच्या कामाबाबत उर्जामंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आ. जयकुमार गोरे, महापारेषणचे मुख्य कार्यकारी संचालक राजूकुमार मित्तल, प्रकल्प संचालक आर. डी. चव्हाण, संचालन संचालक जी. टी. मुंडे, अधिक्षक अभियंता सिन्हा, कार्यकारी अभियंता गायकवाड आदींची उपस्थिती होती.
भारताची स्किइंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी
भारताच्या आंचल ठाकुरने इतिहास रचाला. तिने आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. याचबरोबर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे. आंचल ठाकुर हिमाचल प्रदेशची खेळाडू आहे.
युसुफ पठाणला बीसीसीआयने केलं निलंबित
गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं निलंबन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी
महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने धक्कादायक कामगिरी करत रेल्वेची ३२ वर्षांची विजयी परंपरा खंडित करताना जेतेपद पटकावले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.