मिस्टर रामराजेंच्या बालहट्टामुळे उदयनराजे नाही, तर राष्ट्रवादी 'बॅकफूटवर' !
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.
हृदयातील महाराज !
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.
सामान्यांचा डि.एन.ए. असलेले, शिवरायांचा थेट वारस उदयनराजे..
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.
अरेरे... शेवटी कबुतराच्याबाबतीतही आम्ही 'बांडगुळच' ठरलो ?
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.
महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविणारा सोशल मीडिया ‘महामित्र'
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
वंचितांना शैक्षणिक प्रवाहात आणणार्‍या फलटणच्या 'मॅक्सीन' मावशी राज्य शासनाच्या अनास्थेमुळे उपेक्षित !
"भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा केली. पद्म, पद्विभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे पुरस्कार देशातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्यांना लोकांना दरवर्षी देण्यात येतात. यंदा महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर, विजया लक्ष्मी नवनिता कृष्णन, अरविंद गुप्ता तसेच विदर्भामध्ये काम करणार्‍या अभय बंग व राणी बंग यांना जाहीर झाले. दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना यापूर्वी पुरस्कार मिळालेले आहेत. परंतू फलटणसारख्या निमशहरी भागात उपेक्षित, वंचित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना साक्षर करणार्‍या अमेरिकन विदुषी मॅक्सीन मावशी उर्फ मॅक्सीन बर्नसन मात्र यंदाही या सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित राहिल्या आहेत.
ऐतिहासिक सातारा झाले 'मॅरेथॉनचे' गाव !
" नैसर्गिक वरदान लाभलेले सातारा हे सात डोंगरांच्या कुशीत दडलेले महाराष्ट्रातील एक टुमदार शहर. याला धड शहरही म्हणता येत नाही, आणि खेडही. शिवछत्रपती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपतींची राजधानी म्हणून लौकिक पावलेली, एकेकाळचा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेली ही भूमी आता मॅरेथॉनचे गाव म्हणून जगभरात ओळखले जावू लागले आहे. सातारकर आरोग्याच्या दृष्टीने किती सजग झाले आहेत.याची प्रचीती साताऱ्यात आल्यावर आपल्याला येईलच.
शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे राज्यात उदंड पीक ; आर्थिक गणितांसाठी घसरतोय दर्जा
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.
निखिल वागळेजी खा. उदयनराजेंची सरंजामी संज्ञांची मात्रा मिस्टर रामराजेंना लागू होईल काय ?
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.
विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेवून, विद्यार्थी घडविणारी अनोखी शाळा…!!
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.
भिलार गावाला नवी ओढ ..... स्ट्रॉबेरीजच्या गोडीला ... साहित्याची जोड ..... !!
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!
सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम ...!!
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशाल दिशा देण्याचे काम केले आहे. राज्य व केंद्र शासन लोकांच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. शासनच्या योजना राबविण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो, प्राथमिक शिक्षण यासह अनेक योजनांमध्ये सातारा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यात जलसंधारण, शिक्षण, स्वच्छतेत जिल्ह्याने विकासाचा नवा आयाम निर्माण केला आहे. यावर टाकलेला थोडक्यात प्रकाश…
माणुसकीच्या बंधातून गवसली रक्ताची नाती...!
सातारा: "सुखाच्या चिरंतन ओढीपोटी माणसाला जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी अधिक महत्त्वाची वाटते, परंतू अधिक सूख सुद्धा माणसाला कधीकधी मानवत नाही. सुखाच्या सारीपाटावर भूतकाळाची गडद छाया पसरु लागताच जन्मभूमीच्या दिशेने उलटप्रवास सुरु होतो. माणूस हा प्राणीच मुळात भूतकाळाच्या कुंचल्याने वर्तमानातील चित्र रेखाटत असतो. भल्याभल्यांनी मातृभूमीच्या ओढीपोटी वर्तमानातील सुखाच्या साम्राज्याचा त्याग केला आहे.
कासची काळजी घ्याच; पण सातार्‍यातील प्रदूषणही पहा !
सातारा(गजानन चेणगे) : युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यामुळे सातारा शहराजवळचे कास पुष्पपठार जगाच्या नकाशावर आले. कासचे पुष्पवैभव पाहण्यासाठी जगातून पर्यटक येत असतात. कासचे हे महत्व लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कासच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. ही बाब स्वागतार्हच असली तरी, देशविदेशातील पर्यटकांना कासला ज्या सातारा शहरातून जावे लागते, त्या सातार्‍यातील प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष दिसत नाही. त्यामुळे ’कासचे पहाच, पण खाली जरा सातार्‍यातही पहा’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.
औषध कंपन्या, विक्रेत्यांची मनमानी
सातारा(गजानन चेणगे) : औषधांच्या आवाक्याबाहेरच्या किमती व औषधविक्रेत्यांचा मनमानीपणा यामुळे नियमित औषधोपचार घ्यावे लागणार्‍या रूग्णांची आर्थिकदृष्ट्या कोंडी होत आहे. त्यातच औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनी काही औषधांच्या दहाऐवजी पंधरा गोळ्यांच्या स्ट्रिप्स तयार करून नवीन संकट निर्माण केले आहे. विक्रेत्यांकडून मागणीप्रमाणे गोळ्यांऐवजी संप्ूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. रूग्णांची ही लूट थांबवण्यासाठी औषध प्रशासन काहीच करत नसल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे.
रेशीम धाग्याचे 'वाई ' ऋणानुबंध ......!!
तलम वस्त्र म्हटल की डोळ्याच्या समोर येत ते रेशीम ...... ते रेशीम भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.... याचे दाखलेच द्यायचे झाले तर अगदी सातवाहन काळापर्यंत मागे जाता येते. भारतातून ग्रीक आणि रोमन या सभ्यतेला आपल्या कडून हे अतिउच्च प्रतिचे वस्त्र पुरविले जायचे ...... सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान नगरीतून पैठणीची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याचे उल्लेख आहे तसेच कोसल्याचेही काम कापड विनकामासाठी व्हायचे त्यामुळे रेशमाला अनन्य साधारण महत्व सुरुवाती पासूनच होते. औद्योगिक क्रांतीनंतर कापड निर्मितीत मोठी क्रांती झाली मानवी बळावर करायची कामे अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने होवू लागली त्यामुळे कमी मनुष्य बळात भरपूर काम होवू लागल्यामुळे या व्यवसायाचे सूत्र बदलले. वाई आणि परिसरात जुन्याकाळापासून रेशीम काढण्याचे काम होत असे ..... आता राज्य शासनाने वाईत रेशीम पार्क तयार केला आहे..... त्या पार्कचा लेखाजोखा या लेखात मांडण्यात आला आहे.
विघ्न टाळावे वीज अपघाताचे...
विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीज अपघाताचे विघ्न टाळण्याची.
सरंजामशाही संज्ञांचे खूळ आतातरी डोक्यातून उतरणार काय ?
ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि पुण्यात कृषी आयुक्त पदावर कार्यरत असणारे सुनील केंद्रेकर यांनी पत्रव्यवहार, संचिका आणि मोबाईल मॅसेजमध्ये नावाच्या अगोदर सर, माननीय, साहेब अशा विशेष व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणार्‍या संज्ञा वापरु नयेत, असे परिपत्रक काढून भारतीय राज्यघटनेचा खर्‍या अर्थाने सन्मान केला आहे.
दाऊद... छोटा राजन... आणि 'आर्मस्ट्रॉंग'
वाढलेली पांढरी शुभ्र दाढी... दगदगीने दमलेले शरीर... डोक्यावर घातलेली कानटोपी... एकेक पाऊल संभाळत चाललेले एकेकाळी तोर्‍यात राहिलेला माणूस शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना आव्हान देणारा... निधड्या छातीचा वाघ गलितगात्र, हवालदिल झालेला पाहून काळजात चर्रर झाले.
अन्... पानिपतकारही झोपु'त झोपले !
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबई नगरी परिघाच्या बाहेर जसजशी वाढू लागली, तसतशी पोटापाण्यासाठी राज्यासह देशभरातून विस्थापितांचे लोंढे मुंबई नगरीमध्ये धडकू लागले.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.