‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’
'1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे.
मी माझा भाऊ गमावला : बिग बी
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर प्रियांका चोप्रा म्हणते...
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.
फाळणीपूर्व भारत-पाकिस्तानवर प्रकाश टाकणारा 'व्हाईसरॉय हाऊस'
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.
रिचा चड्डाला स्वाईन फ्लू
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तिने एक आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘फुकरे रिटर्न्स’ ट्रेलर लॉन्च प्रसंगी ती उपस्थित होती. मास्क लावलेला एक फोटो रिचाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन भडकले, कुमार विश्वास यांनी पाठवले ३२ रुपये !
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आप नेता कुमार विश्वास यांना कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
'कॉमेडी शो'वरून कोर्टाने सिद्धूला खेचले
चंदीगड: पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूला टीव्ही शो करणं महागात पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कॉमेडी शोमध्ये सहभागी का होता? असा प्रश्न विचारत चंदीगड कोर्टाने सिद्धूला फटकारलं. सोनी टीव्हीवर प्रसारीत होत असलेल्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये सिद्धू पुढे बसलेला असतो.
अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर झालं.
नव्या पिढीच्या कलाकारांवर संतापला ऋषी कपूर
मुंबईः अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी बॉलिवूडच्या नव्या पिढीतीली एकही कलाकार उपस्थित नव्हता. त्यांनी ट्विट करुन लिहिले, की नव्या पिढीचा एकही अभिनेता किंवा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता, हे
रामगोपाल वर्माविरोधात अटक वॉरंट
औरंगाबाद: औरंगाबाद खंडपीठाने दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
अभिनेता विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने उफाळलेला वाद अद्याप कायम आहे. मात्र बॉलिवूडचा आणखी एक गायक सोनू निगमच्या पाठिशी उभा राहिला आहे. अदनान सामीने सोनू निगमचं समर्थन केलं आहे.
ऋषी कपूरला मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूरला नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे.
चेक बाउन्स प्रकरणी संजय दत्तविरोधात अटक वॉरंट
मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. चेक बाउन्सप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदा इलेक्ट्रिक बोर्डमुळे अनुष्का शर्माला नोटीस
मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अडचणीत आली आहे. मुंबई महापालिकेने अनुष्का शर्माला बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुष्का
पाकमध्ये 'दंगल' प्रदर्शित न करण्याचा आमिरचा निर्णय
मुंबई : पाकिस्तानने बॉलिवूडसाठी आपली दारं पुन्हा खुली केली असली, तरी काही बाबतीत पाकची भूमिका आडमुठी आहे. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ‘दंगल’ चित्रपटातील तिरंग्याच्या
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्नाचा फोटो व्हायरल
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आजारी आहेत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मागील आठवड्यात शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम
मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यापासून कपिल शर्माचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर शोचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीनंही शोचा 106 कोटींच्या कराराला नुतनीकरण करण्यास नकार दिला. आता शोचा टीआरपीही घसरल्याने सोनी टीव्हीने कपिलला एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे.
ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी याच्याविरोधात ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.