लॅमिनेटेड आधारकार्ड ठरणार बिनकामाचे
आधारकार्डला लॅमिनेशन केले असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असेल, तर ते कार्ड बिनकामाचे ठरणार आहे, असे आता ‘यूआयडीआयए’ने स्पष्ट केले आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डचा क्यू आर कोड काम करणे बंद होऊ शकते किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय यूआयडीआयएने घेतला आहे.
जगातिल सर्वात शक्तिशाली रॉकेटचे प्रक्षेपण
अमेरिकेची खासगी रॉकेट कंपनी स्पेस एक्सने हे रॉकेट प्रक्षेपित केले. ही कंपनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांची आहे. 'फाल्कन हेवी' असे या रॉकेटचे नाव आहे.
फरार दहशतवाद्याच्या गोळीबारात पोलिस जवान मृत
जम्मु काश्‍मीर पोलिस दलाच्या ताब्यातून फरार झालेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात एका पोलिस जवानाचा मृत्यु झाला.
मागासवर्गीयांसाठीचा निधी घटविला
केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठी घसघशीत तरतूद केल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दावे केले असले, तरी प्रत्यक्षात अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यामध्ये सरकारने हात आखडता घेत फसवणूक केली, असे टीकास्त्र दलित संघटनांनी सरकारवर सोडले आहे.
10 कोटी कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला मिळणार 5 लाख
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासंबंधी मोठी घोषणा केली आहे. सरकारने राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली आहे. त्याचा 10 कोटी गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत सरकारने आरोग्य सुरक्षा कवच प्रदान केले आहे.
रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर वायफाय
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. 2018 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 48 हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
पाकच्या गोळीबारामुळे राजौरीत 71 शाळा बंद
जम्मु काश्‍मीर राज्यातील नौशेरा (राजौरी जिल्हा) येथील लाम भागामध्ये पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या प्रचंड गोळीबारामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत असल्याने या भागातील 71 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ४४ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.
चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित अजून एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चैबासा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांवरही दोष सिद्ध झाले आहेत.
भारतीय महिला पहिल्यांदाच उडवणार मिग विमाने!
येत्या महिनाभरात भारतीय महिला सुपरसॉनिक फायटर जेट मध्ये एकटीच बसून आकाशात उंच भरारी घेणार आहे. भारतात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ही जेट विमानं उडवणार आहेत. भारतीय हवाई दलातील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशा तीन महिला वैमानिकांनी फायटर पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
आसाराम बापूला जामीन नाही
गुजरातच्या गांधी नगर येथील बलात्कार प्रकरणी आसाराम बापू अटकेत असून, आज (सोमवार) झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. बलात्कार पीडितेची साक्ष नोंदविल्या नंतरच जामीनावर विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
भारतातल्या लादेन ला अटक
गुजरातमध्ये 2008साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अब्दुल सुभान कुरेशी याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष दलासोबत झालेल्या चकमकीनंतर कुरेशीला अटक करण्यात आले. त्याच्यावर बॉम्ब तयार केल्याचा आरोप आहे.
आता विमानातही मिळणार 'कॉलिंग'ची सुविधा
विमान प्रवासादरम्यान फोनला नेटवर्क मिळत नसे. त्यामुळे फोनवरून संभाषण होत नसे. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीही दिली जात नव्हती. मात्र, आता भारतीय दूरसंचार नियामक मंडळने (ट्राय) याबाबत परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे. तसेच विमानात वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे.
भगतसिंगांच्या सर्वोच्‍च गौरवाची पाकमध्ये मागणी
पाकिस्तानमधील एका संघटनेने ‘शहीद-ए-आजम’ पुरस्कारप्राप्‍त शहीद भगत सिंग यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे 6 वर्षांपूर्वी भगत सिंग यांना लाहोरमधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आली तेथे त्यांचा पुतळा उभारावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पाकची आगळीक: भारताच्या ३० चौक्यांवर हल्ला
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शुक्रवारी रात्रीपासून सीमारेषेवरील जवळपास ३० भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात सांबा सेक्टरमध्ये हेडकॉन्स्टेबल जसपालसिंग आणि लान्स नाईक सॅम अब्राहम हे जवान शहीद झाले असून २ नागरिकांचाही मृत्यू झाला.
२९ वस्तूंवरील जीएसटी हटवला
जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू
सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शुक्रवारी पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सांबा, अरनिया, कठुआ, आर एस पुरा सेक्टर येथील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांना पाकने लक्ष्य केले. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्रीपासून सीमा रेषेवर गोळीबार सुरु असल्याने सीमेलगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जवानांच्या हाती आधुनिक शस्त्रे
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही शेजारी देश प्रत्यक्ष नियंत्रण रेषांनजिक आगळिक करत असताना, तसेच पाकिस्तानकडून वारंवार शत्रसंधीचे उल्लंघन होत असताना भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या लष्करी जवानांना अत्याधुनिक शत्रांनी सज्ज करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
एका नव्या युगाची सुरुवात, भारत: इस्रायलमध्ये 8 करार
सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली
वीस लाखांपर्यंतची 'ग्रॅच्युइटी' आता 'टॅक्स फ्री'
मोदी सरकारकडून नोकरदारांना दिलासा देण्यात आला आहे. कारण निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच आता 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात येणार आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.