अमेरिकेत भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या
कान्सास: अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अच्युत रेड्डी असे डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्या रुग्णालयातील एका रुग्णानेच त्यांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रेड्डी यांची बुधवारी हत्या झाली आहे. कान्सासमध्ये यावर्षी आतापर्यंत दोन भारतीयांच्या हत्या झाल्या आहेत. श्रीनिवास यांची याच वर्षी फेब्रुवारीत हत्या झाली होती. अच्युत रेड्डी आणि श्रीनिवास हे दोघेही मूळचे तेलंगणाचेच रहिवासी आहेत.
ओडिसातील २३० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा
कालाहंडी: ओडिशातील मलकानगिरी आणि कालाहंडी जिल्ह्यातील विविध शाळांमधील २३० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. यामध्ये एका सरकारी निवासी शाळेतील दीडशे मुलींचा समावेश आहे. उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
लंडनमधील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट
लंडन : लंडनमधल्या पार्सन्स ग्रीन या भुयारी मेट्रो स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी स्फोट झाला. लंडनमधील वेळेनुसार सकाळी 8.15 वाजता हा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जणांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
दिल्ली विद्यापीठावर NSUI चा झेंडा
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत संघाशी संबंधित, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपला (ABVP) झटका बसला आहे. कारण तब्बल चार वर्षानंतर काँग्रेसप्रणित NSUI कडे अध्यक्षपद गेलं आहे. रॉकी तुसीद नवा अध्यक्ष असेल.
इरमा वादळानं अमेरिकेच्या मियामीत 10 लाख घरांना फटका
वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या इरमा चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका मियामी शहराला बसला असून, वादळामुळे 10 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर तब्बल साडे सहा कोटी नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.
चौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूंची कुकर्म एकापोठापाठ एक उघड होत असताना अखिल भारतीय आखाडा परिषदेनं देशातील ढोंगी बाबांची यादी जाहीर केली आहे. गुरमित रामरहीम, आसाराम, नारायण साई, रामपाल, राधे मां यांच्यासह १४ जणांचा समावेश या यादीत आहे. जनतेनं या बोगस बाबा-बुवांपासून सावध राहावं, असं आवाहन संत परिषदेनं केलं आहे.
आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर
अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी अशा बाबांची यादी जारी केली, ज्यांच्याकडून धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जाते.
अडीच महिन्यात पेट्रोलच्या दरात 16 रुपयांनी वाढ!
मुंबई : गेल्या अडीच महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल 16 रुपये प्रती लिटरने वाढले आहेत. 1 जुलै 2017 रोजी पेट्रोलचा दर 63 रुपये लिटर होता आणि 10 सप्टेबर 2017 रोजी पेट्रोलचा दर 79 रुपये लिटर आहे. म्हणजे गेल्या 72 दिवसात पेट्रोलमध्ये 16 रुपयांची दरवाढ झाली आहे.
गुरुग्राममध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येमुळे लोकांचा भडका
नवी दिल्ली : दिल्लीजवळील गुरुग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलविरोधात आजही जोरदार निर्दशनं झाली. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही केला. तर काही संतप्त लोकांनी शाळेजवळचं एक दारुचं दुकानही पेटवून दिलं.
माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर सीबीआयचा छापा
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा मारला. सीबीआयनं पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका नटराजन यांच्यावर ठेवला आहे. कलम 120 बी नुसार एफआयआरही सीबीआयनं दाखल केली आहे.
वीरपत्नी स्वाती महाडिक भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी दाखल
काश्मीरच्या कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक शनिवारी भारतीय लष्करात दाखल झाल्या. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अकरा महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर आज सकाळी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत (ओटीए) होणाऱ्या दिमाखदार दीक्षांत समारंभात स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू झाल्या.
हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; शांतता क्षेत्रातही दणदणाट
अनंत चतुर्दशीनिमित्त निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांचे लाऊडस्पीकर आता सायलेन्स झोनमध्येही वाजणार आहेत. ध्वनी प्रदूषणाला चाप लावण्यासाठी मुंबई हायकोर्टानं निर्धारित केलेल्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान सध्याच्या काही शांतता क्षेत्रातही लाऊडस्पीकर वाजवण्याची मुभा मिळाली आहे. गणपती विसर्जनाच्या निमित्ताने लाऊडस्पीकर वाजवून गोंगाट करण्याची तयारी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शांतता क्षेत्रांमध्येही लाऊडस्पीकर वाजवण्याची मुभा मिळाली आहे.
ब्रिक्स शिखर संमेलनात पहिल्यांदाच पाकिस्तानी दहशतवादी संघटनांची यादी जाहीर
बीजिंग: चीनमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर संमेलनात पहिल्यांदाच पाकिस्तानी दहशतवादी संघटनांची यादी जाहीर करण्यात आली. ब्रिक्सच्या घोषणापत्रात लष्कर ए तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आला.
2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
बेनझीर भुट्टो हत्याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना १७ वर्षांचा कारावास
रावळपिंडी: पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणाचा निकाल गुरूवारी न्यायालयाकडून देण्यात आला. यावेळी न्यायालयाने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले तर अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. दोषी पोलिस अधिकाऱ्यांना १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर या प्रकरणात आरोपी असणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने फरार घोषित केले. यावेळी न्यायालयाने मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले.
मार्क झुकरबर्गला कन्यारत्नाची प्राप्ती; नाव ठेवलं ‘ऑगस्ट’
मुंबई: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा मुलीचा पिता बनला आहे. झुकरबर्गने फेसबुकवर त्याबाबतची घोषणा केली. त्याने आपल्या पोस्टसोबत फॅमिली फोटो शेअर करुन, ही बातमी चाहत्यांना दिली. या फोटोत स्वत: झुकरबर्ग, पत्नी प्रिसिला चैन आणि दोन्ही मुली दिसतात.
बाबा राम रहीमनंतर आता संत रामपालचा हिशोब
चंदीगड : साध्वी बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमनंतर आता संत रामपालचा हिशोब चुकता होणार आहे.
दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा !
बाबा राम रहीमला दोन बलात्कार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10-10 वर्षे म्हणजे एकूण 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. तर दोन्ही पीडितांना प्रत्येकी 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून दीपक मिश्रा यांची नियुक्ती
नवी दिल्ली : भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस दीपक मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्यासोबतच साहित्य आणि अध्यात्म यांची जाण असलेले जज अशी मिश्रा यांची छबी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. जे. एस. खेहर यांच्यानंतर सरन्यायाधीशपदाची सुत्रं मिश्रांच्या हाती देण्यात आली.
बवाना विधानसभा मतदारसंघात आपचा दणदणीत विजय
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीकारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार रामचंद्र यांचा विजय झाला आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.