मोबाईल चोरांमुळे कल्याणमधील तरुणी लोकल ट्रेनमधून पडली, अल्पवयीन मुलाला अटक
मध्य रेल्वेवरील सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल चोरांमुळे एका तरुणीला गंभीर दुखापतींना समोरे जावे लागले आहे. लोकल ट्रेनमध्ये दरवाजाजवळ बोलत असताना मोबाईल चोराने हातावर काठी मारल्याने २३ वर्षांची तरुणी ट्रेनमधून खाली पडली. यात त्या मुलीला डाव्या हाताची काही बोटं आणि उजव्या पायाचा काही भाग गमवावा लागला. सध्या द्रवितावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना फाईव्ह डे वीक
सरकार आणि प्रशासन व्यवस्था ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. या दोघांनीही एकमेकांना सहकार्य करत पुढे जाण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत सरकार सकारात्मक असून या दोन्ही गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचार्‍यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
सोन्याचे दागिने लंपासप्रकरणी पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल
वडगाव पोलिसांनी जप्‍त केलेल्या तीन किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी एका पोलिसासह पोलिसमित्र व त्याच्या चालकावर वडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. या प्रकाराने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने खून
प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कोयत्याने वार करुन मित्राची हत्या
मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात घडली आहे. येथील पिराळे गावात दोन मित्रांनी कोयत्यानं वार करुन आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश कारंडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून हे सगळे समता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.
'त्या' निर्दयी हत्येचा अखेर उलघडा
गेल्या आठवड्यात टिटवाळा- मांडा परिसरात गळयापासून मुंडके व कमरेपासून खालचा भाग कापून गोणीत बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. या हत्येचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ठाणे ग्रामीण क्राईम शाखेने या हत्येचा अखेर छडा लावला.
9 तासांत पार केलं 47 कि.मीचे अंतर
राजस्थानच्या एका 14 वर्षीय मुलीनं सलग 47 तास पोहत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राजस्थानमधील उदयपूरस्थित 14 वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी 1: 32 वाजता पोहोचली. हे 47 किलोमीटरचे अंतर नऊ तास आणि 23 मिनीटांमध्ये यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला
पुणे-सांगली आता अवघ्या पावणे पाच तासात
पुण्याहून सांगलीला अवघ्या 4 तास 37 मिनिटांत पोहोचणे शक्य झाले आहे. हबिबगंज-धारवाड एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आली असून ती पुणे सांगलीमार्गे धावणार आहे.
पैसे किंवा दागिने नाही तर कपडे चोरणारा चोर मुंबईत सक्रीय
कांदिवली पोलीस सध्या एका अशा चोराचा शोध घेत आहेत जो घर आणि दुकानांमधून हजारो रुपये नाही तर शर्ट आणि पँट चोरी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एस व्ही रोडवरील ज्ञानदर्शन बिल्डिंगमध्ये राहणा-या कापड व्यवसायिक कुणाल सोमानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुणाल सोमानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुकानातून 100 शर्ट, 150 जिन्स आणि 40 टी-शर्ट गायब झाले आहेत. चोरांनी इमारतीमधील दुकान क्रमांक 2,3,4 आणि 5 मधून ही चोरी केली आहे.
पहिल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित गजाआड
भारतातील पहिली खासगी महिला गुप्तहेर रजनी शांताराम पंडित (55) यांना शुक्रवारी ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने दादर येथून अटक केली. गेली 27 वर्ष खासगी गुप्तहेर एजन्सी चालविणार्‍या पंडित यांना दिल्लीतील कॉल डिटेल्स रेकॉडर्स अर्थात सीडीआर विकणार्‍या टोळीकडून बेकायदेशीरपणे सीडीआर विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाइन’
शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये 12 जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे शालार्थ प्रणाली बंद पडली आहे. शालार्थ प्रणाली दुरुस्त करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्या ही प्रणाली सुरू करणे शक्यच नाही. याचसाठी राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑफलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेश राज्याच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांना दिले आहेत. त्याला अनुसरून माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना शिक्षकांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत.
मिरजजवळ दुर्मिळ मांडूळ साप जप्त बाजारातील किंमत 47 लाख रुपये
मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे. हुसेन कोंडीबा तांबोळी (वय 64 वर्ष), लतीफ हुसेन जमादार (वय 65) अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावं आहेत.
विद्यार्थी पळवल्यामुळे शिक्षकाने केली शिक्षकाची हत्या
मालाडमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या दोन शिक्षकांमधील वादाने शुक्रवारी रक्तरंजित वळण घेतले. विजय हरिजन या ट्यूशन टिचरने अरुप बिश्वास यांची हत्या केली असून हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलिसांना शरण गेला.
अर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली : सेना
'मागील तीन-चार वर्षांत हे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. सरकारच्या एककल्ली आणि आततायी धोरणामुळेच अर्थव्यवस्थेची 'कासवछाप' अगरबत्ती झाली हे जगजाहीर आहे. त्याचे दडपण अर्थसंकल्पीय भाषणात जाणवत होते,' असा टोला लगावतानाच 'केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे 'तेच ते नि तेच ते..!' असा हा अर्थसंकल्प आहे,' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पुण्याची श्रुती श्रीखंडे कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत देशात पहिली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतलं आहे.
सीमा भागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून ईबीसी सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
लोयांच्या दोन न्यायाधीश मित्रांचीही हत्या : बी. जी. कोळसे-पाटील
“न्यायमूर्ती बी.एच.लोया यांना नियोजनपूर्वक मारलं आहे. इतकंच नाही तर लोया यांना न्यायनिवाड्यासाठी शंभर कोटींची ऑफर होती. त्याची माहिती मला देणाऱ्या लोयांच्या दोन जिल्हा न्यायाधीश मित्रांचीही अशीच हत्या झाली आहे, ", असा गौप्यस्फोट माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला. ते अहमदनगरमधील शब्दगंध साहित्य संमेलनात बोलत होते.
मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांनी सांगितले आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीत बस कोसळली; 13 जणांचा मृत्यू, तिघे गंभीर
पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरून एक 17 सीटर मिनी बस 100 फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विषमुक्त शेती कॅन्सरमुक्त भारत हेच लक्ष्य
पारंपरिकतेच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय शेतीला आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व मूलभूत ज्ञान देण्याची गरज आहे. ते केले तर आपण एक-दोन वर्षांत भारताचे शेती उत्पन्न दुप्पट करू शकतो. ‘विषमुक्त शेती’ आणि ‘कॅन्सरमुक्त भारत’ ही आपली घोषणा घेऊन ती यशस्वी करू शकतो, असा विश्‍वास भारतीय विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी येथे व्यक्त केला.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.